राज्यात डाळिंब प्रतिक्विंटल २०० ते ५००० रुपये

अामच्या बागेतून १८ टन माल निघाला. परंतु या हंगामात अपेक्षित दर मिळाला नाही. सरासरी ४० रुपये भाव पडला. माल चांगला असूनही थंडी तसेच वादळामुळे तयार झालेल्या वातावरणाचा फटका बसला. - दत्तराव नरवाडे, मोप, ता. रिसोड जि. वाशीम
2016 मधील दराचा आढावा
2016 मधील दराचा आढावा

पुणे ः राज्यातील डाळिंब हंगाम सुरू झाला असून, बाजारातील आवक वाढत आहे. सध्या पुणे, अकोला, कोल्हापूर आणि औरंगाबाद बाजारात डाळिंबाची आवक थोडी जास्त आहे. सांगली आणि पुणे बाजारात डाळिंबाला सर्वाधिक ५००० रुपयांपर्यंत तर सोलापुरात सर्वात कमी किमान २०० आणि औरंगाबादमध्ये ३०० रुपये दर मिळत आहे. गुरुवारी (ता. २१) सरासरी किमान २०० आणि कमाल ५००० रुपये दर मिळाला. 

अकोल्यात १५०० ते ४००० रुपये येथील बाजार पेठेत दररोज तीन ते चार गाड्या डाळिंबाची अावक असून सध्या १५०० ते ४००० रुपयांपर्यंत क्विंटलला दर मिळत अाहे. थंडीमध्ये बाजारात तितकासा उठाव नसल्याने दर कमी असल्याचे व्यापारी सूत्रांचे म्हणणे अाहे. सद्यस्थितीत स्थानिकसह परजिल्ह्यातून तीन ते चार गाड्या डाळिंब विक्रीसाठी येत अाहे. उच्च प्रतीचे डाळिंब ३००० ते ४००० दरम्यान विकत अाहे. तर हलक्या प्रतीचे डाळिंब १५०० ते २००० रुपये क्विंटल विकले जात अाहे. किरकोळ बाजारात ग्राहकांना ३० ते ६५ रुपयांदरम्यान डाळिंब विकत घ्यावा लागत आहे. 

सोलापुरात २०० ते ४००० रुपये येथील बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात डाळिंबाची आवक वाढली. पण मागणीत काहीशी तूट आल्याने दरात किरकोळ चढ-उतार वगळता डाळिंबाचे दर टिकून राहिले. गतसप्ताहात डाळिंबाची आवक रोज २ ते ३ टनापर्यंत राहिली. जिल्ह्यासह नजीकच्या सांगली, उस्मानाबाद जिल्ह्यातूनही डाळिंबाची आवक होते आहे. या आधीच्या आठवड्यात १४ डिसेंबरला डाळिंबाची आवक प्रतिदिन ४००० किलो, त्या आधी ७ डिसेंबरला ती ५ हजार किलो आणि त्यापूर्वी ३० नोव्हेंबरला ४ हजार किलोपर्यंत होती, पण दरामध्ये फारसा फरक झाला नाही. डाळिंबाला प्रतिक्विंटलला २०० ते ४००० व सरासरी २५०० रुपये दर मिळाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.  पुण्यात १५०० ते ५००० रुपये यंदाचा सततच्या पावसामुळे फूलगळ झाल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांना न धरता आल्यामुळे बाजारातील डाळिंबाची आवक निम्म्याने घटली आहे. तर गुजरात आणि राजस्थानमधून आवक सुरू असल्याने डाळिंबाचे दर तुलनेने कमी आहेत. पुणे बाजार समितीमध्ये सध्या सरासरी दर्जा असलेल्या डाळिंबाला १५ ते २० रुपये प्रतिकिलाे तर चांगल्या दर्जाच्या फळांना ४० ते ५० रुपये दर आहेत. बुधवारी (ता. २०) डाळिंबाला दर्जा व वाणानुसार ५०० ते ७००० रुपये दर मिळाला. मंगळवारी (ता. १९) हाच दर ५०० ते ६००० रुपये आणि सोमवारी ५०० ते ७००० रुपये दर मिळाला. 

परभणीत ५०० ते २००० रुपये  येथील बाजार समितीअंतर्गत फळे-भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २१) डाळिंबाची ३५० कॅरेट आवक झालेली असताना प्रतिक्रेट १०० ते ४०० रुपये (प्रतिक्विंटल ५०० ते २००० रुपये) दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. पंढरपूर परिसरातून डाळिंबाची आवक येत आहे. गेल्या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी डाळिंबाची सरासरी २०० ते ४०० क्रेट (४० ते ८० क्विंटल) आवक होत आहे. किरकोळ विक्री प्रतिकिलो १० ते ४० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी अब्दुल खदिर म्हणाले.

कोल्हापुरात १००० ते ५००० रुपये येथील बाजार समितीत डाळिंबाची दररोज सहाशे ते सातशे कॅरेट आवक होत आहे. डाळिंबास किलोस १० ते ५० रुपये दर मिळत आहे. आटपाडी, जत, सांगोला भागातून बाजार समितीत डाळिंबाची आवक होते. गेल्या पंधरवड्यापासून डाळिंबाची आवक वाढत आहे. येत्या महिन्याच्या कालावधीत डाळिंबाच्या आवकेत आणखी वाढ होण्याची शक्‍यता बाजार समितीच्या सूत्रांनी व्यक्त केली

सांगलीत २००० ते ५००० रुपये येथील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार आवारात डाळिंबाची आवक वाढू लागली आहे. बुधवारी (ता. २०) डाळिंबाची आवक १७८०६ डझन झाली होती. त्यास प्रति दहा किलोस २०० ते ५०० तर सरासरी ४०० रुपये असा दर मिळाला. येथील बाजार समितीत सांगली जिल्ह्यातील आटपाडी, जत, तासगाव, कवठेमहांकाळ, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि कर्नाटकातील अथणी तालुक्‍यातून डाळिंबाची मोठ्या प्रमाणात आवक होत असते. गेल्या महिन्यापासून डाळिंबाचे दर स्थिर आहेत, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबादेत ३०० ते ३००० रुपये येथील बाजार समितीमध्ये बुधवारी (ता. २०) डाळिंबाची ८९ क्‍विंटल आवक झाली. त्यास ३०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. १३ डिसेंबरला ५०० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला होता. ६ डिसेंबरला ५०० ते ३५०० रुपये, २९ नोव्हेंबरला ५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १८ नोव्हेंबरला १८७ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १५० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

जळगावात १५०० ते ४००० रुपये येथील बाजार समितीमध्ये दर शनिवारी डाळिंबाचे लिलाव होतात. गत शनिवारी (ता.१६) डाळिंबाची ३० क्विंटल आवक झाली. त्याला १५०० ते ४००० आणि सरासरी २८०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. मागील महिन्याच्या तुलनेत आवकेत वाढ झाली आहे. सोबत मागणीही वाढली असून, हातोहात डाळिंबाचे लिलाव होतात. नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कसमादे पट्टा, मालेगाव, धुळे, जळगाव जिल्ह्यातील रावेर, यावल, चोपडा तालुक्‍यातून आवक होते. तसेच जळगाव जिल्ह्यानजीकच्या सायगाव, सिल्लोड (जि. औरंगाबाद) येथूनही काही प्रमाणात डाळिंबाची आवक होते.  गुरुवारी (ता. २१) झालेली आवक व दर (प्रतिक्विंटल/रुपये) 

बाजार     आवक     किमान     कमाल 
अकोला   १५०   १५००     ४००० 
सोलापूर    ४०     २००    ४००० 
पुणे  ७००       १५००     ५००० 
परभणी     ७०    ५००   २००० 
कोल्हापूर    १४० १०००     ५००० 
सांगली     ३०    २०००    ५००० 
औरंगाबाद    ८९    ३००  ३००० 
जळगाव    ३०   १५००   ४००० 

प्रतिक्रिया  यंदा सततच्या पावसाने फूलगळ झाल्याने उत्पादन घटले आहे. ५ एकर डाळिंब असून, सध्या राेज २५ ते ३० क्रेट बाजारात पाठवित आहे. क्रेटला (२० किलाे) १००० रुपये अपेक्षित असताना ६०० ते ७०० रुपये दर मिळत आहे.   - विठ्ठल मेरगळ, शेतकरी, रा. भरणेवाडी, ता. इंदापूर

डाळिंबाची आवक हळूहळू वाढू लागली आहे. गेल्या महिन्यापेक्षा चालू महिन्यात डाळिंबाचे दर किंचित सुधारले असून, दर स्थिर राहतील. दोन महिन्यांनंतर डाळिंबाच्या दरात वाढ होण्याची शक्‍यता आहे. - सिद्धेश्वर तोडकर, डाळिंब व्यापारी, सांगली. 

कमी व मध्यम दर मोठ्या प्रमाणातील शेतकऱ्यांना मिळतात. सर्वाधिक दर मात्र मोजक्‍याच शेतकऱ्यांना मिळतात हे बाजाराच्या दरावरून दिसते. - संजय दांडगे, डाळिंब उत्पादक, औरंगाबाद. 

हंगामात १०० रुपयांपर्यंत दर शेतकऱ्यांना अपेक्षित हाेता. मात्र उत्तर भारतात थंडीची लाट असल्याने तेथून हाेणारी मागणी ठप्प झाल्याने मालाला उठाव नाही. - तानाजी चाैधरी, डाळिंब व्यापारी, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com