agriculture news in marathi, pomogrante gets 250 per kg high rate in Akluj | Agrowon

अकलूजला रविवारी डाळिंब २५० रुपये किलो !
टीम अॅग्रोवन
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

अकलूज, जि. सोलापूर : अकलूज येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून डाळिंबाच्या दरात तेजीचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून डाळिंबाचे दर पुन्हा टिकून राहिले आहेत. सोलापूर, सांगोला बाजारही तेजीकडे चालला आहे. रविवारी (ता.२५) एका दिवसात अकलूज बाजारात ३,६०० क्रेट डाळिंबाची आवक झाली, तर डाळिंबाला प्रतिकिलोला सर्वाधिक २५० रुपये दर मिळाला.

अकलूज, जि. सोलापूर : अकलूज येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या आठवड्यापासून डाळिंबाच्या दरात तेजीचे वातावरण आहे. गेल्या दोन दिवसांपासून डाळिंबाचे दर पुन्हा टिकून राहिले आहेत. सोलापूर, सांगोला बाजारही तेजीकडे चालला आहे. रविवारी (ता.२५) एका दिवसात अकलूज बाजारात ३,६०० क्रेट डाळिंबाची आवक झाली, तर डाळिंबाला प्रतिकिलोला सर्वाधिक २५० रुपये दर मिळाला.

अकलूजच्या बाजार समितीत सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून येथे नुकताच डाळिंब बाजार सुरू केला आहे. रविवारी या बाजारात तीन हजार ६०० क्रेट डाळिंबाची आवक झाली होती. पंढरपूर, सांगोला, माळशिरस यांसह सातारा जिल्ह्यातील फलटण आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्‍यातून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी घेऊन येत आहेत. जिल्ह्यासह मुंबई, कानपूर, बिहार येथील खरेदीदार येथे आले होते.

प्रतिकिलो ५० रुपयाने सुरू झालेली बोली अखेर २५० रुपयांवर गेली. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मंगलमूर्ती फ्रूट कंपनीच्या अडतीवर मोटेवाडी येथील शेतकरी खंडू पिसे यांच्या डाळिंबाला प्रतिकिलो २०० रुपये दर मिळाला. तर महाराष्ट्र ॲग्रो ट्रेडिंग कंपनी या अडत्याकडे हरिदास कणसे (रा. गिरवी, ता. माळशिरस) यांच्या डाळिंबाला २५० रुपये दर मिळाला. या उच्चांकी भावामुळे येथील डाळिंब बाजारात उत्साहाचे वातावरण होते. सोलापूर, सांगोला बाजारातही डाळिंबाच्या दरात तेजी टिकून आहे. सोलापुरात ८० ते १०० रुपये आणि सांगोल्यातही सर्वाधिक २०० रुपयांपर्यंत दर पोचला आहे.

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...