agriculture news in Marathi, Popatrao Pawar says growth of organic curb should be strategic scheme, Maharashtra | Agrowon

सेंद्रिय कर्बवाढीला धोरणात्मक रूप द्यावे : पोपटराव पवार
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 जानेवारी 2018

पुढील दशकात शेतीसमोरील सर्वात मोठी समस्या सुपीकता हीच राहील. आपण सध्या केवळ ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ असे म्हणतो आहोत; पण मातीकडे दुर्लक्ष होत आहे. अॅग्रोवनकडून ‘जमीन सुपीकता वर्ष २०१८’ जाहीर होणे ही कौतुकाची बाब आहे. एका दुर्लक्षित विषयाकडे अॅग्रोवनने लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती

राज्यातील शेतकरीवर्गाच्या उत्पन्नवाढीचा मुद्दा जमिनीच्या सुपीकतेवरच अवलंबून आहे. जमीन सुपीकतेचा खरा गाभा असलेल्या सेंद्रिय कर्बवाढीच्या मुद्द्यांना धोरणात्मक रूप देण्याची गरज आहे, अशी सूचना तज्ज्ञांनी केली आहे.

पाण्याप्रमाणेच सेंद्रिय कर्ब हा विषय महाराष्ट्राच्या शेतीविषयक विकासातील धोरणाचा मुख्य भाग झाला पाहिजे. सेंद्रिय कर्बच आपली शेती जीवंत ठेवतो. मात्र, खते आणि कीटकनाशकांचा भडिमार करून आपण कर्ब घटविला आहे. त्यामुळे पिकांना उपयुक्त जिवाणुंची संख्यादेखील घटली आहे. प्रत्येक गावाचा सेंद्रिय कर्ब वाढविण्यासाठी दीर्घकालीन कामाचे आराखडे तयार करावेत.

जमिनीची सुपीकता वाढविणे हेच आता कृषी विद्यापीठे व कृषी विभागासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. माझ्या मते राज्याच्या शेतजमिनीला कॅन्सर झालेला आहे. कॅन्सरग्रस्त शेतजमिनीला आता तत्काळ उपचाराची आणि विश्रांतीची आवश्यकता आहे. तसे न केल्यास भविष्यात शेती उजाड होईल आणि राज्याच्या अनेक भागात स्थलांतर आणि अन्नधान्याचे अपूर्ण उत्पादन अशा समस्या उद्भवतील.

आमच्या मते आधीचा शेतकरी सुक्षिशित नसला तरी जमिनीची काळजी घेणारा होता. वाडवडिलांकडून चालत आलेल्या प्रथापरंपरेनुसार शेतजमिनीची काळजी घेण्याची पद्धत आधी होती. शेणखतांचा भरपूर वापर, पिकांची फेरपालट तसेच सेंद्रिय काडीकचरा शेतीत कुजविण्याची पद्धत होती. त्यामुळे सेंद्रिय कर्ब टिकून राहिला. आधुनिक शेतीमध्ये उत्पादन वाढले पण जमिनीचे आरोग्य आपण बिघडवले आहे.

जमीन सुपिकतेसाठी शेतकऱ्याला पुरेसे मार्गदर्शन होत नाही. जमिनीमध्ये रासायनिक खतांचा वापर करून शेती करणाऱ्या शेतकऱ्याला दोष देता येणार नाही. कृषी विद्यापीठांनी पुढाकार घेत जमीन सुपीक ठेवत चांगले उत्पन्न देणारे तंत्र सतत उपलब्ध राहील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
- पोपटराव पवार, कार्याध्यक्ष, आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समिती
 

इतर ताज्या घडामोडी
शेतकरी सन्मान योजनेत रत्नागिरीतील आठ...रत्नागिरी : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
कीटकशास्‍त्र विभागातर्फे ट्रायकोकार्ड...परभणी ः येत्या हंगामात मराठवाड्यातील औरंगाबाद,...
फळबाग योजनेतील अटी कोकणासाठी शिथिल करू...रत्नागिरी ः भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड...
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाची...नाशिक : मागील वर्षी लाल कांद्याचे भाव पडल्याने...
कपाशीचा नांदेड ४४ बीटी वाण लोकार्पण हा...परभणी  : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
पावसाला उशीर झाल्याने चिंतेचे ढग गडदनांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा...
कृषी विद्यापीठाच्या वाणांच्या...रत्नागिरी ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी...
परभणी, हिंगोलीतील दूध उत्पादकांच्या... परभणी  ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी...
विदर्भातील कृषी विकासाला बाधक ठरतोय...नागपूर   ः सत्ताकेंद्र विदर्भात असताना...
आवक कमी झाल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उदारीकरणाच्या नावाखाली उत्पादन...पुणे   : देशात १९९१ मध्ये...
विधिमंडळाचे आजपासून पावसाळी अधिवेशनमुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी...
दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी...मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर...
दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार, आरक्षण...मुंबई : राज्यात भीषण दुष्काळ आहे, त्यामुळे...
मॉन्सूनची सिक्कीम, पश्चिम बंगालपर्यंत...पुणे : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...