सौर कृषिपंप योजनेसाठी ऑनलाईन स्वीकारणे सुरु...

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी पोर्टलची सुविधा
मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेसाठी पोर्टलची सुविधा

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ घेता यावा यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलची सुरुवात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आली. 

या वेळी मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, मराविम सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक आदी उपस्थित होते. या वेळी ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, की शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे सोयीचे व्हावे व वीजजोडणीच्या प्रक्रियेत पारदर्शकता असावी या उद्देशाने महावितरणच्या https://www.mahadiscom.in/solar/  या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

या पोर्टलवर शेतकऱ्यांना सौर कृषिपंपासाठी अर्ज करणे, अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय या वेबपोर्टलवर मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेची संपूर्ण माहिती, ऑनलाइनद्वारे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सौर कृषिपंपाची क्षमता ठरविणे, अर्जाची सद्यःस्थिती बघणे आणि शेतकऱ्यांकडून नेहमी विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती, मराठी व इंग्रजी या भाषेतील ऑडिओ-व्हिडिओ उपलब्ध असणार आहेत.

तसेच या योजनेमध्ये सौर कृषिपंपासाठी कंत्राटदार निवडण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली असून, शेतकरी या पोर्टलद्वारे कंत्राटदाराची निवड करून त्यांच्याकडून सौर कृषिपंप बसवून घेऊ शकतात. या सौर कृषिपंप योजनेमुळे शेतीला दिवसा सिंचन करणे शक्य होणार असून अपारंपरिक ऊर्जेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. तसेच शेतकऱ्यांचा वीजबिलांचा खर्च वाचेल. शेतकऱ्यांच्या शेतात दोन एलईडी बल्ब, मोबाईल व बॅटरी चार्जिंगसाठी इलेक्ट्रिक सॉकेट बसवून देण्यात येणार आहे, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com