अनुदानित खतविक्रीसाठी ‘पॉस’ बंधनकारक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर : रासायनिक खतविक्रीत पारदर्शकता येण्यास किरकोळ खतविक्रेत्यांना ‘पॉस’ मशिनद्वारे खतविक्री करणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर व इफ्को कंपनीच्या वतीने ९२४ ‘पॉस’ मशिनचे वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा कृषी विकास अधिकारी साहेबराव बेंदगुडे यांनी दिली.

जिल्ह्यातील जे रासायनिक खत दुकानदार अनुदानित खताची विक्री करतात त्यांनी ‘पॉस’ मशिनचा वापर करणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडून ‘पॉस’ मशिनचा वापर न केल्यास त्यांचा खतविक्री परवाना रद्द करण्यात येणार आहे.

ज्या खतविक्रेत्यांना अनुदानित खतांशिवाय इतर पाण्यात विरघळणारी खते, सूक्ष्म मूलद्रव्ये व जैविक खतांचा व्यवसाय करायचा आहे. त्यांनी परवान्यामधून अनुदानित खतांचे स्रोत वगळण्याचा प्रस्ताव संबंधित पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांकडे द्यायचा आहे. एवढेच नाही तर खतविक्री केंद्रात अनुदानित खताची विक्री होत नसल्याबाबतचा बोर्ड लावण्याच्या सूचनाही दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.

खत दुकानदारांकडे पॉस मशिन उपलब्ध असताना मशिनद्वारे खताची विक्री न करता चुकीच्या पद्धतीने विक्री केल्याचे आढळल्यास संबंधित दुकानदाराचा खतविक्रीचा परवाना रद्द करणार आहे. जे घाऊक खतविक्रेते आहेत, त्यांनी किरकोळ खतविक्रेते पॉस मशिनच्या साह्याने खतांची विक्री करतात की नाही हे पाहण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.

...तर कंपन्यांना अनुदान नाही खतविक्री करणाऱ्या कंपनीच्या प्रतिनिधींनी आपल्या खतांची विक्री पॉस मशिनद्वारे होते की नाही, याची खात्री करायची आहे. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास कंपनीला संबंधित खताचे अनुदान मिळणार नाही. त्याला संबंधित कंपनीचे प्रतिनिधी जबाबदार असतील, असे कृषी विकास अधिकारी बेंदगुडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com