agriculture news in marathi, Poss machine stock; Actually scarcity | Agrowon

पॉस मशिनवर स्टॉक; प्रत्यक्षात टंचाई
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

कोल्हापूर : युरिया मुबलक असल्याचे कृषी विभागाचा दावा असला तरी ग्रामीण भागात मात्र युरियाची टंचाईच निर्माण होत असल्याचे चित्र आहे. कंपन्यांकडून विक्रेत्यांनाही युरियाचे लिकिंग होत असल्याने मागणीअभावी लाखो रुपयांचा इतर खतांचा अनावश्‍यक साठा करावा लागत आहे. शेतकऱ्यांनाही युरिया वेळेत मिळत नसल्याचे ऐन हंगामातच युरियासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. कंपन्यांचे होणारे लिंकिंग विक्रेत्यांना जेरीस आणत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

कोल्हापूर : युरिया मुबलक असल्याचे कृषी विभागाचा दावा असला तरी ग्रामीण भागात मात्र युरियाची टंचाईच निर्माण होत असल्याचे चित्र आहे. कंपन्यांकडून विक्रेत्यांनाही युरियाचे लिकिंग होत असल्याने मागणीअभावी लाखो रुपयांचा इतर खतांचा अनावश्‍यक साठा करावा लागत आहे. शेतकऱ्यांनाही युरिया वेळेत मिळत नसल्याचे ऐन हंगामातच युरियासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. कंपन्यांचे होणारे लिंकिंग विक्रेत्यांना जेरीस आणत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आहे.

तांत्रिक अडचणीने त्रस्त विक्रेते
जिल्ह्यात १४०० हून अधिक ठिकाणी पॉस मशिनचे वितरण करण्यात आले आहे; परंतु रेंज व तांत्रिक माहितीअभावी अद्यापही पूर्ण क्षमतेने पॉस मशिनचे कामकाज सुरू नसल्याची माहिती खत विक्रेत्यांनी दिली. जिल्ह्याचा विशेष करून पश्‍चिम भागात वाहतुकीच्या अडचणी आहेत. शेतकऱ्यांना माहिती नसल्याने आधार कार्डाविनाच शेतकरी विक्रेत्यांना खताची मागणी करतात. दुरून आलेल्या शेतकऱ्यांना आधार कार्ड नाही म्हणून परत पाठवता येत नाही. एकदा शेतकरी खते घेऊन गेले की परत लवकर येत नसल्याने शेतकऱ्यांना दिलेले खत पॉस मशिनवर उपलब्ध असलेले दिसते; परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक शेती सेवा केंद्रांत युरियासारखी खते मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

लिंकिंग थांबवा
लिंकिंगवर बंधने नसल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांबरोबर विक्रेत्यांनाही बसत आहे. दुसरी दुय्यम खते शिवाय युरिया मिळणारच नाही, अशी आडमुठी भूमिका अनेक बड्या कंपन्यांनी घेतल्याने विक्रेत्यांचा नाईलाज झाला असल्याचे विक्रेत्यानी सांगितले. दुय्यम खताचा शिल्लक स्टॉकही संपविण्याची गरज असल्याने आम्हालाही नाइलाजास्तव दुसरी खते घेण्याबाबत शेतकऱ्यांना आग्रही राहावे लागत आहे. यामुळे आम्ही लिंकिंग करत असल्याचा आरोपही चुकीचा असल्याचे विक्रेत्यांचे मत आहे. कंपन्यांनाकडून हे प्रकार थांबणे गरजेचे असल्याचे मत विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्याने व्यक्त केले.

पॉस मशिनबाबत जागृती हवी
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रेंजची समस्या, आधार कार्डाच्या समस्या उद्भवत आहेत. अनेक ठिकाणी ठसे घेतानाही ठसे उमटत नसल्याने मशिन वापरताना अडचणी येत आहेत. याबाबत कृषी विभागाने मोहीम तत्त्वावर पॉस मशिन बाबत शेतकऱ्यांतून जागृती करावी, अशी मागणी होत आहे. अद्यापही लहान विक्रेते, शेतकरी यांच्यात याबाबत समस्या निर्माण होत असल्याचे ग्रामीण भागातील विक्रेत्यांनी सांगितले.

कृषी विभाग म्हणतो, मुबलक खतांची उपलब्धता
खताच्या परिस्थितीबाबत जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून माहिती घेतली असता, सर्वच खतांची मुबलकता असल्याचे सांगण्यात आले. एप्रिल ते ऑगस्टच्या मध्यापर्यंत जिल्ह्यातून १ लाख मेट्रिक खतांची विक्री झाल्याची नोंद पॉस मशिनद्वारे झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिली. जिल्ह्यात या कालावधीत युरियाचे ४३५०९, डीएपीचे ७८२३, पोटॅशचे १५२५१, तर संयुक्त खताच्या ३४१६७ मेट्रिक टन खताचे वाटप झाल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.

इतर बातम्या
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...
‘कृष्णामाई’चा कर्नाटकातील काठ तहानला;...कोल्हापूर : कृष्णा नदीवर अवलंबून असणाऱ्या कर्नाटक...
देशभरात ७२४ महिला उमेदवारांचे भवितव्य...नवी दिल्ली : देशात नुकत्याच झालेल्या लोकसभा...
हृदयासाठी आरोग्यवर्धक पदार्थांतून सोया...अमेरिकी अन्न आणि औषध प्रशासनाने हृदयासाठी...
अमरावती : नाफेडने अचानक केली तूरखरेदी...अमरावती : ऑनलाइन नोंदणी केलेल्या दहा टक्‍के...
बुलडाणा जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईबुलडाणा ः गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच...
दुष्काळात संत्रा बागेला टँकरच्या...अकोला ः दुष्काळी परिस्थितीने शेतकऱ्याला चौफेर...
खानदेशात सौर कृषिपंप योजनेतून लवकरच पंप...जळगाव ः सौर कृषिपंपासाठी खानदेशातून ८ हजार ९५०...
मिरज, तासगावसह सिंधुदुर्गात पाऊससिंधुदुर्ग, सांगली : विजांच्या कडकडाटांसह...
लातूर :थकित पैशांसाठी अडत्यांचे उपोषणलातूर : लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजर...
मराठवाड्यात नवीन खासदारांबाबत उत्कंठानांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
कोल्हापूर, सांगलीत निकालाची उत्सुकता...सांगली : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (ता....
सोलापूर, माढ्याच्या निकालाकडे देशाचे...सोलापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या ठरलेल्या...
परभणी जिल्ह्यातील ग्रामीण भागात ७५...परभणी : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे...
सोलापूर : ओसाड रानं अन्‌ जनावरांची पोटं...सोलापूर ः टॅंकरच्या पाण्यासाठी गावोगावी...