agriculture news in Marathi, possibilities of gram rates increase in nagpur, Maharashtra | Agrowon

नागपुरात हरभरा दरात तेजीचा अंदाज
विनोद इंगोले
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

नागपूर : कळमणा बाजार समितीत हरभरा दर काहीसे वधारत ४८०० रुपये प्रती क्‍विंटलवर पोचले आहेत. ३० ऑक्‍टोबर रोजी हेच दर ४००० ते ४५०० रुपये प्रती क्‍विंटलवर होते. यापुढील काळात दरात तेजीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. हरभऱ्याची आवक २४५ क्‍विंटलवरून ६२६ क्‍विंटलपर्यंत वाढली आहे.

नागपूर : कळमणा बाजार समितीत हरभरा दर काहीसे वधारत ४८०० रुपये प्रती क्‍विंटलवर पोचले आहेत. ३० ऑक्‍टोबर रोजी हेच दर ४००० ते ४५०० रुपये प्रती क्‍विंटलवर होते. यापुढील काळात दरात तेजीचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे. हरभऱ्याची आवक २४५ क्‍विंटलवरून ६२६ क्‍विंटलपर्यंत वाढली आहे.

बाजार समितीत तुरीची आवक २४० ते ४१८ असून तुरीचे दर ३५५० ते ३९०० रुपये प्रती क्‍विंटल असे आहेत. सोयाबीनची आवकदेखील वाढती असून गेल्या आठवड्यात सोयाबीन आवक ४०४५ क्‍विंटल होती. त्यात वाढ होत १ नोव्हेंबर रोजी ती ६००८ क्‍विंटलवर पोचली. सोयाबीनचे दर सुरवातीला २७०० रुपये प्रती क्‍विंटल होते. सोयाबीनच्या दरात मात्र घसरण झाली आहे.
सोयाबीनचे व्यवहार २ नोव्हेंबर रोजी २६२१ रुपये प्रती क्‍विंटलने झाले.

बाजारात संत्र्याची आवकही सुरू झाली असून यातील मोठी फळे २५०० ते ३००० रुपये प्रती क्‍विंटल, मध्यम १८०० ते २४०० रुपये प्रती क्विंटल तर लहान फळांचे व्यवहार ८०० ते ९०० रुपये प्रती क्‍विंटलने होत आहेत. मोसंबीच्या मोठ्या फळांचे व्यवहार २६०० ते ३२०० रुपये प्रती क्‍विंटल, मध्यम फळे १८०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटल तर लहान फळांचे व्यवहार १२०० ते १४०० रुपये प्रती क्‍विंटलने होत आहेत. संत्रा व मोसंबीच्या दरातही चढउतार होत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

बाजारात संत्रा आणि मोसंबीची आवक तुलनेत कमी आहे. संत्रा व मोसंबीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्यासोबतच फळगळ होत असल्याने फळांची आवक मंदावल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. बाजारात पांढरा कांदा ७०० ते २३०० रुपये प्रतिक्विंटल तर लाल कांदा ६०० ते २३०० रुपये प्रती क्‍विंटल आहे. पांढऱ्या कांदयाची आवक १००० क्‍विंटल तर लाल कांदा आवक ३००० क्‍विंटलच्या घरात आहे.

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...
जळगावमधील शेतकऱ्यांचा परदेश अभ्यास दौरा... जळगाव : परदेशातील शेतीचे तंत्रज्ञान, शेती,...