agriculture news in Marathi, possibilities of increased in rain, Maharashtra | Agrowon

कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधारेची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 ऑगस्ट 2018

पुणे: राज्यात गेले काही दिवस विश्रांती घेणारा पाऊस सुरू होण्यास पोषक हवामान तयार होत आहे. आजपासून (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आहे. तर मंगळवारपासून (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस वाढण्याची, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे: राज्यात गेले काही दिवस विश्रांती घेणारा पाऊस सुरू होण्यास पोषक हवामान तयार होत आहे. आजपासून (ता. ५) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आहे. तर मंगळवारपासून (ता. ७) कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस वाढण्याची, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. घाटमाथ्यासह धरणांच्या पाणलोटात पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी सकाळपासूनच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होते. बांग्लादेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, या वाऱ्यामुळे पश्‍चिम बंगाल आणि परिसरावर सोमवारपर्यंत (ता. ६) कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे माॅन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा सोमवार ते गुरुवार या काळात अधिक सक्रीय होण्याची शक्यता आहे. यामुळे मध्य भारतासह, पश्‍चिम किनारपट्टीवर पाऊस वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

शनिवारी (ता. ४) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलीमीटमध्ये - स्राेत कृषी विभाग) :

कोकण : खारबाव ३५, कर्जत ३३, कडाव ३१, खोपोली ३०, माणगाव ३३, गोरेगाव ३५, लोनेरे ३०, निझामपूर ४२, पोलादपूर ५१, कोंडवी ५१, वाकण ३५, रामपूर ४०, वाहल ३०, असुर्डे ६५, कळकवणे ३८, शिरगांव ६८, कुलवंडी ३५, तलवली ४२, पटपन्हाले ३२, अबलोली ४०, मंडणगड ५३, म्हाप्रल ५८, देव्हरे ४७, कडवी ४४, मुरडव ३५, माखजन ४५, फुंगुस ५२, फनसावणे ४७, अंगवली ३०, कोडगाव ६६, देवली ४०, देवरुख ४६, तुलसानी ३८, माभले ४७, तेरहे ४२, सवंडल ५२, लांजा ४४, भांबेड ४५, विलवडे ३६, अंबोली ७०, कसा ६७, जव्हार ४७, साखर ५४, मोखडा ४२, खोडला ५२, तलवड ६०.

मध्य महाराष्ट्र : इगतपुरी ३६, धारगाव ३६, वेळुंजे ३२, हर्सूल ३१, शेंडी ३२, मुठे ३१, केळघर ३४, हेळवाक ९१, महाबळेश्‍वर ९५, तापोळा ६५, लामज ७२, कोकरुड ४२, शिराळा ३०, चरण ३०, करंजफेन ३८, मलकापूर ४६, आंबा ४६, साळवण ३२.

इतर अॅग्रो विशेष
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...
खारपाणपट्ट्यात पावसाच्या खंडाने खरीप...पावसात कुठे १७ दिवस तर कुठे २२ दिवसांचा खंड...
केळी उत्पादक कंगाल; व्यापारी मालामालजळगाव ः जिल्ह्यात केळीचे जे दर जाहीर होतात,...
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचे धूमशानपुणे : अनेक दिवसांच्या खंडानंतर राज्यात गेले तीन...
`मोन्सॅन्टोला नुकसानभरपाईचे आदेश हे...युरोपियन संघ ः मॉन्सॅन्टो या बलाढ्य बहुराष्ट्रीय...
कामगंध सापळ्यांमध्ये होतेय ‘बनवाबनवी’अकोला ः बोंड अळीमुळे गेल्या हंगामात झालेले नुकसान...
वर्षभर १५ भाजीपाल्यांसह फळबागांची...रसायन अंश विरहीत आरोग्यदायी अन्नाची निर्मिती करून...
लौटकर आऊँगा...! अटलजींना साश्रू नयनांनी...नवी दिल्ली : प्रखर देशभक्त, भारतरत्न, माजी...
धन जोप्या पाऊस, पीक मरू देईना अन्‌ वाचू...झळा दुष्काळाच्या : जि, परभणी यंदा पावसात कसा जोर...
राज्यात सर्वदूर पाऊसपुणे ः राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (...
बेबाकी प्रमाणपत्राशिवाय राष्ट्रीय...मुंबई: पाऊस न पडल्याने आधीच त्रस्त असलेल्या...
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर सर्वदूर पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर...
अजातशत्रूदेशाच्या राजकारणात आपल्या शालीन, सभ्य राजकारणाने...
बोंड अळी नियंत्रणासाठी...पुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची...
‘अटलपर्वा’चा अस्तनवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...
शेततळी झाली, शेती बागायती झालीसध्या राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...