पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढीची शक्यता

पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढीची शक्यता
पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढीची शक्यता

पुणे: राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका वाढला असून, कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता अाहे. मंगळवारपर्यंत (ता. ४) बऱ्याच ठिकाणी, तर उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  विषुववृत्ताकडून येणारा मॉन्सूनचा प्रवाह मंदावला आहे. पुढील पाच दिवस हीच स्थिती राहणार असल्याने महाराष्ट्रासह दक्षिण भारतात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. तर माॅन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा पूर्व भाग सक्रिय असल्याने उत्तर आणि मध्य भारताच्या काही भागात पाऊस पडण्यास पोषक हवामान आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पश्‍चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, हरियाना आदी राज्यांमध्ये मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.    मंगळवारपर्यंत कोकणात काही ठिकाणी पाऊस पडणार असून, राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची दडी कायम राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळपर्यंत कोकणात अनेक ठिकाणी मध्य स्वरूपाचा पाऊस पडला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली आहे. पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. नगर येथे सर्वाधिक ३२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली अाहे. विदर्भात तापमानाचा पारा २८ ते ३२ अंश, मराठवाड्यात २९ अंश, कोकणात २९ ते ३१ अंश, तर मध्य महाराष्ट्रात २७ ते ३३ अंशांच्या आसपास आहे.   शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये, स्रोत - कृषी विभाग) : कोकण : चिपळूण ३०, खेर्डी २८, शिरगाव २५, अंबवली २९, गुहाघर २९, फणसोप २०, पाली २३, फुणगुस २३, अंगवली ३६, देवळे २१, देवरुख २७, तुलसानी ७१, माभले २२, पाचल ३२, लांजा २२, विलवडे २७, अंबोली ३३, फोंडा २१, कडवल २०, येडगाव २२, मध्य महाराष्ट्र : रावेर ३४, आंबा ३१, साळवण ३६.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com