agriculture news in Marathi, possibilities of increased in temperature, Maharashtra | Agrowon

तापमानात वाढ होण्याची शक्यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 मार्च 2018

पुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज अाहे. आकाशही मुख्यत: निरभ्र राहणाार असल्याने राज्याच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मंगळवारी मध्य महाराष्ट्रात तर बुधवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

पुणे : राज्यात मंगळवारपासून बहुतांशी ठिकाणी कोरड्या हवामानाचा अंदाज अाहे. आकाशही मुख्यत: निरभ्र राहणाार असल्याने राज्याच्या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर मंगळवारी मध्य महाराष्ट्रात तर बुधवारी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

मागील अाठवड्यात राज्यात ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दोन, ते तीन दिवस पूर्णपणे ढगाळ हवामान असल्याने राज्याच्या कमाल तापमानात मोठी घट झाली होती. अनेक ठिकाणी तापमानात सरासरीपेक्षा ५ ते १२ अंशांपेक्षा अधिक घट होत थंड दिवस अनुभवायला मिळाले. त्यानंतर शनिवारपासून तापमानात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये भिरा येथे राज्यातील उंच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

रविवारी (ता. १८) दुपारनंतर मध्य महाराष्ट्रातील, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सोमवारी उत्तर मध्य महाराष्ट्रात समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार स्थिती होती. या स्थितीपासून मध्य राज्यस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा होता. तर पश्‍चिम किनाऱ्यावर पूर्व-मध्य अरबी समुद्रापासून केरळपर्यंत आणखी एक हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय होता. यामुळे मध्य महाराष्ट्रात मंगळवारी आणि तर विदर्भात बुधवारी तुरळक पावसाचा अंदाज अाहे. तर कोकण, मराठवाड्यात हवामान कोरडे राहणार आहे.

सामवारी (ता. १९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३३.७, जळगाव ३७.६, कोल्हापूर ३२.४, महाबळेश्वर २८.३, मालेगाव ३७.०, नाशिक ३४.९, सांगली ३५.०, सातारा ३४.३, सोलापूर ३६.५, मुंबई ३१.०, अलिबाग ३०.१, डहाणू ३१.६, भिरा ३९.५, औरंगाबाद ३५.४, परभणी ३७.४, नांदेड ३७.०, अकोला ३८.०, अमरावती ३५.६, बुलडाणा ३६.०, ब्रह्मपुरी ३७.०, चंद्रपूर ३६.०, गोंदिया ३५.२, नागपूर ३५.६, वर्धा ३६.५, यवतमाळ ३५.०.

इतर अॅग्रो विशेष
केशर आंबा फळगळीची कारणे अन् उपाययोजना  सद्यःस्थितीत हवामान आंबा झाडांसाठी...
रसदार उन्हाळी काकडी अर्थकारणाला देतेय...जळगाव जिल्ह्यात पाचोरा, जामनेर, यावल, जळगाव आदी...
बॅंक अधिकारी झाला पूर्णवेळ प्रयोगशील...विशाखापट्टण व त्यानंतर हैद्रराबाद येथे खासगी...
स्मार्ट प्रकल्पाचा केंद्रबिंदू शेतमाल ‘...पुणे : राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांना आता पिकवायचे...
पूर्व विदर्भात गारपीटपुणे  ः दोन दिवसांपूर्वी मध्य भारतात तयार...
जनावराच्या आहारात पाणी महत्त्वाचेजनावरांचे योग्य पोषण होण्यासाठी तसेच दुग्धोत्पादन...
राज्यात १७८ तालुक्यांत भूजल चिंताजनकपुणे ः कमी झालेला पाऊस, वाढत असलेला पाण्याचा उपसा...
दरामुळे साखरेचा रंग फिकाकोल्हापूर : साखरेचे विक्री मूल्य वाढविल्यानंतरही...
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...