agriculture news in Marathi, possibilities of rain increased in Kokan, Maharashtra | Agrowon

कोकणात पाऊस वाढण्याचा अंदाज
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

पुणे : पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याने शुक्रवारपासून (ता. ३) कोकणात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा आहे, तर रविवारपर्यंत (ता. ५) उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता. १) दुपारनंतर मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. 

पुणे : पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याने शुक्रवारपासून (ता. ३) कोकणात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा आहे, तर रविवारपर्यंत (ता. ५) उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता. १) दुपारनंतर मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते. 

पावसाने उघडीप दिल्यानंतर ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात चढ- उतार होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वर सरकला असून, मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती; तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या सरींनी हजेरी लावली. 

पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. पुढील दोन ते तीन दिवस उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दक्षिण भारतात हवेचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र असल्याने शुक्रवारपासून (ता. ३) कोकणात पाऊस वाढणार आहे. रविवारी (ता. ५) विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.  

बुधवारी (ता. १) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २२.४, नगर ३१.७, कोल्हापूर २५.४, महाबळेश्वर १९.६, मालेगाव ३१.०, नाशिक २८.३, सांगली २६.२, सातारा २७.१, सोलापूर ३२.१, मुंबई ३०.२, अलिबाग ३०.८, रत्नागिरी २९.३, डहाणू ३१.४, आैरंगाबाद ३०.२, परभणी ३३.६, नांदेड ३३.०, अकोला ३३.८, अमरावती ३१.०, बुलडाणा ३०.७, चंद्रपूर ३३.४, गोंदिया ३०.८, नागपूर ३२.०, वर्धा ३२.८, यवतमाळ ३०.५.

इतर अॅग्रो विशेष
सिंधुदुर्गात पाऊस; आंबा, काजूला मोठा...कणकवली, जि. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात...
पीक कर्जवाटपात करा आमूलाग्र बदलराज्यातील काही भागांतील कापूस आणि तूर ही पिके...
आपत्ती निर्मूलनासाठी विद्यार्थ्यांनो...अमेरिकेमधील टेक्सास ए. एम. कृषी विद्यापीठांतर्गत...
अन्नद्रव्यांचा समतोल वापर आवश्यक...जमिनीतील अन्नद्रव्यांचा मोठ्या प्रमाणावर होत...
पाणी चोरी करणाऱ्यांवर फौजदारी कारवाईमुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन...
फुलांवर रुंजन रोबो मधमाश्‍यांचे...नागपूर : विविध आकर्षक रंगसंगतीसह काही वेळ...
कोल्हापूरात कामगार-अडत्यांच्या वादात...कोल्हापूर : येथील बाजार समितीत तोलाइदार, अडते...
चवगोंडा पाटील, सौरभ कोकीळ, मारुती शिंदे...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची...
जेजुरीत कुलधर्म कुलाचारासाठी भाविकांची...जेजुरी, जि. पुणे : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त...
नाशिक जिल्ह्यातील माती परीक्षणासाठी ‘...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील शेती, गावतळे, जलसंपदा,...
राज्यात थंडीत चढउतारपुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग, तेलंगणा आणि...
दोन टप्प्यांत ‘एफआरपी’ला विरोधसातारा : साखरेचे दर कोसळल्याने उसाचा पहिला हप्ता...
पीककर्जासाठी उपोषणकर्त्या शेतकऱ्याचे...पाथरी, जि. परभणी  : पीककर्जाच्या मागणीसाठी...
कांदाप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांकडून आढावानाशिक : हवालदिल झालेल्या कांदा उत्पादक...
केळीच्या विलियम्स वाणाचा आश्वासक प्रयोग...परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील वसंतराव कदम...
वालाच्या शेंगा, मेहरुणी बोरांची ...दुष्काळी स्थितीत खानदेश व लगतच्या भागातील शेती...
मका भुशाला तीन हजारांचा भावजायखेडा, जि. नाशिक : यंदा तालुक्‍यात अत्यल्प...
ऐन दुष्काळात राज्याला सहकार आयुक्त नाही पुणे  : तीव्र दुष्काळाकडे राज्याची सुरू...
कात्रज मिठाईसाठी वापरणार नायट्रोजन...पुणे  : पुणे जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात...
कुलगुरू निवड प्रक्रियेतील विलंब ...मुंबई : राज्यातील कृषी विद्यापीठांच्या...