agriculture news in Marathi, possibilities of rain in Vidarbha, Maharashtra | Agrowon

विदर्भात वादळी पावसाची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 फेब्रुवारी 2019

पुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असल्याने थंडी कमी झाली आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटकाही वाढला आहे. मंगळवारी (ता. १९) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.७ अंश सेल्सिअस तर ब्रम्हपुरी येथे नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. २०) विदर्भात वादळी वारे, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

पुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत असल्याने थंडी कमी झाली आहे. तर दुपारच्या वेळी उन्हाचा चटकाही वाढला आहे. मंगळवारी (ता. १९) सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५.७ अंश सेल्सिअस तर ब्रम्हपुरी येथे नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पावसाला पोषक हवामान होत असल्याने आज (ता. २०) विदर्भात वादळी वारे, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  

राज्याच्या तापमानात वेगाने बदल होत असून, कधी थंडीची लाट, तर कधी अवकाळी पावसाची हजेरी असे चित्र फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीपासून पहायला मिळत आहे. पहाटे गारठा असला तरी दुपारच्या वेळी उन्हाचा चटका चांगलाच वाढून घामाच्या धारा वाहू लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी राज्यातील दिवस रात्रीच्या तापमानात १५ ते २४ अंशांची तफावत दिसून येत आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी येथे दिवस रात्रीच्या तापमानात तब्बल २४ अंशांची तफावत होती. 

कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वारे वाहत आहेत. यातच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून बाष्पाचा पुरवठा होत असल्याने आज (ता. २०) आणि उद्या (ता. २१) विदर्भात सर्वच जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्हा आणि परिसरात तर मराठवाड्यातील जालना, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांत आज (ता. २०) तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमधील कमाल, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३४.५(१३.०), नगर ३६.४, जळगाव ३३.२(१२.०), कोल्हापूर ३२.७(१७.२), महाबळेश्‍वर ३०.३(१६.१), मालेगाव ३४.८(१४.६), नाशिक ३४.० (१२.१), सांगली ३५.०(१३.४), सातारा ३३.६(१४.७), सोलापूर ३५.७(१७.५), सांताक्रुझ ३१.४ (१६.०), अलिबाग २७.९(१७.४), रत्नागिरी ३०.०(१७.९), डहाणू २९.२(१५.८), आैरंगाबाद ३३.५(१५.२), परभणी ३४.७ (१५.०), नांदेड ३४.५ (१८.०), उस्मानाबाद ३४.७ (१८.८), अकोला ३५.०(१५.१), अमरावती ३५.२(१४.८), बुलडाणा ३२.५ (१७.४),  चंद्रपूर ३२.८(१७.२), गोंदिया २९.२(१५.२), नागपूर ३३.१(१३.२)

इतर अॅग्रो विशेष
‘उजनी’तील पाणीसाठा उणे पातळीत सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी...
राज्यभरात अन्नत्याग आंदोलनमुंबई ः शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रती...
मार्चनंतरही पणन करणार कापूस बाजारात...यवतमाळ ः शेतकऱ्यांच्या घरातील कापूस विकल्या...
मढी यात्रेला बुधवारपासून प्रारंभनगर ः होळीच्या दिवशी सकाळी कानिफनाथांच्या समाधीला...
दर्जेदार ऊसबेण्याची केली निर्मिती काशीळ (ता. जि. सातारा) येथील उच्चशिक्षित व...
मतदानासाठी सकाळी सात ते सायंकाळी...अकोला ः देशात होत असलेल्या लोकसभा...
कोकणातील आंबा अडकला धुक्याच्‍या फेऱ्यातवेंगुर्ले, जि. सिंधुदुर्ग : ऐन हंगामातच कोकणातील...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या...
हळदीचे दिवसातून दोन वेळा सौदेसांगली ः सांगली बाजार समितीत गेल्या दोन ते...
पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद... पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो...
सर्वसामान्यांचा असामान्य नेतामाजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर...
सर्जनशीलतेला सलाम!व र्ष २०१७ च्या खरीप हंगामात कापसावर फवारणी...
प्राणघातक हृदयरोगाचे प्रमाण होतेय कमीगेल्या दोन वर्षामध्ये हृदयरोगाला प्रतिबंध आणि...
अन्नत्याग आंदोलनास प्रारंभ : अमर हबीब,...नवी दिल्ली : शेतकरी आत्महत्यांप्रती सहवेदना आणि...
मच्छीमारी व्यवसायाने आणली समृद्धीगणित विषयात पदवी असूनही बेरोजगार राहणं नशिबी आलं...
काबुली हरभऱ्याने उंचावले अर्थकारण चोपडा तालुक्‍यातील (जि. जळगाव) तापी व अनेर...
जत तालुक्यात द्राक्ष, डाळिंब बागा...सांगली : जत तालुक्यात पश्‍चिम भाग वगळता...
प्रकल्प व्यवस्थापकावर कारवाईचे आदेशपुणे : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन...
सहवेदना :आज अन्नत्याग आंदोलनयवतमाळ: शेतकरी साहेबराव करपे व कुटुंबीयांप्रति...
उन्हाची काहिली वाढलीपुणे: राज्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची...