विदर्भात वादळी पावसाची शक्यता

विदर्भात वादळी पावसाची शक्यता
विदर्भात वादळी पावसाची शक्यता

पुणे : मध्य भारतात होत असलेल्या वाऱ्यांच्या संगामामुळे विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये वादळी वारे, विजांच्या निर्मितीसाठी पोषक हवामान होत आहे. आज (ता. २०) विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात उन्हाचा तापही कायम असून, मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नगर येथे राज्यातील उच्चांकी ४०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. बंगालच्या उपसागरातून होत असलेला बाष्पाच्या पुरवठ्यामुळे विदर्भ, मराठवाड्यात अंशत: ढगाळ हवामान होत आहे. तसेच तापमानातही चढ-उतार होत असल्याचे दिसून आले आहे. परभणी येथे सलग दिवस देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. सोमवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये परभणी येथे तापमानाचा पारा ४१.२ अंशांच्या पुढे गेला होता. तर बीड, वर्धा, अमरावतीमध्ये तापमान ४० पार गेल्याने उन्हाचा चटका वाढला होता. या सर्वच ठिकाणच्या तापमानात अल्पशी घट झाली असून, परभणी येथे तापमान ३९.६ अंशांपर्यंत खाली आले होते. मालेगाव, सोलापूर, बीड, नांदेड येथे ३९ अंशांपेक्षा अधिक तर राज्याच्या बहुतांशी भागात ३७ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद होत आहे. मंगळवारी (ता. १९) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.४ (१.०), नगर ४०.३ (४.०), धुळे ३७.०, जळगाव ३८.० (-१.०), कोल्हापूर ३६.९ (१.०), महाबळेश्वर ३२.७ (१.०), मालेगाव ३९.२ (१.०), नाशिक ३३.५(-३.०), सांगली ३७.७ (०.०), सातारा ३६.८ (१.०), सोलापूर ३९.१ (१.०), अलिबाग २९.६ (-१.०), डहाणू ३१.३ (०.०), सांताक्रूझ ३४.० (१.०), रत्नागिरी ३२.० (०.०), औरंगाबाद ३६.६ (०.०), बीड ३९.३ (३.०), नांदेड ३९.५ (२.०), परभणी ३९.६ (२.०), अकोला ३७.५ (-०.५), अमरावती ३८.८ (१.७), बुलडाणा ३४.५ (-०.३), बह्मपुरी ३७.४ (०.२), चंद्रपूर ३८.२ (०.०), गडचिरोली ३७.०, गोंदिया ३०.८ (-५.९), नागपूर ३४.३ (-२.८), वर्धा ३६.० (-०.९), वाशिम ३७.६, यवतमाळ ३८.० (१.३).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com