अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के क्षेत्र नापेर राहणार

रब्बीचे ५० टक्‍के क्षेत्र नापेर राहण्याची शक्‍यता
रब्बीचे ५० टक्‍के क्षेत्र नापेर राहण्याची शक्‍यता

अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने या वर्षी रब्बीचे ५० टक्‍के क्षेत्र नापेर राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

यंदा सरासरीच्या २४ टक्‍के पाऊस कमी झाला. जिल्ह्यात चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्‍वर तालुक्‍यातील भुजल पातळीत १० फुटापर्यंत घट झाली आहे. जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. कालव्याद्वारे एकच आवर्तन मिळणार असल्याने रब्बी लागवड कशी करावी, असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.

यंदाच्या हंगामात कृषी विभागाने रब्बीचे १  लाख ६९ हजार ३४१ हेक्‍टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. तुलनेत सद्यःस्थितीत ४६ हजार ९३३ हेक्‍टरवरच पेरणी झाली आहे. पेरणीची ही  टक्‍केवारी अवघी २८ असल्याचे कृषी   विभागाच्या सूत्रांनी सांगितले. मोर्शी, वरुड, धारणी व  चिखलदरा तालुक्‍यात रब्बीची पाच टक्‍केही पेरणी झाली नसल्याने या तालुक्‍यातील ६० टक्‍क्‍यांवर क्षेत्र नापेर राहण्याची भीती वर्तविली जात आहे.

कर्जवाटपही रखडले जिल्हयात रब्बीसाठी ६१ हजार ६५६ शेतकऱ्यांना ४०६ कोटी ८० लाख रुपयांचे कर्जवाटपाचे लक्षांक असताना आजवर केवळ ७६४ शेतकऱ्यांनाच कर्जवाटप करण्यात आले. १३ कोटी ८ लाख रुपयांचेच कर्जवितरण झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अशी आहे रब्बी लागवड

धारणी  निरंक
चिखलदरा  ४,३६७ हेक्‍टरपैकी ३०७ हेक्‍टर
अमरावती  ७,४१० हेक्‍टरपैकी २,९७२ हेक्‍टर
भातकुली   १५,०८७ हेक्‍टरपैकी ४,५३४ हेक्‍टर
नांदगाव खंडेश्‍वर   ९,४५६ हेक्‍टरपैकी २,३७३ हेक्‍टर
चांदूररेल्वे   ५,९४० हेक्‍टरपैकी २,०४४ हेक्‍टर
तिवसा  ९,७९० हेक्‍टरपैकी ४,१५० हेक्‍टर
मोर्शी   २४,३६५ हेक्‍टरपैकी १,७२६ हेक्‍टर
वरुड    ७,४९३ हेक्‍टरपैकी ३५८ हेक्‍टर
दर्यापूर  २४,५६० हेक्‍टरपैकी २,२७० हेक्‍टर
अचलपूर  ८,३७० हेक्‍टरपैकी ३,२८० हेक्‍टर
चांदूर बाजार  ७,९६४ हेक्‍टरपैकी १,०२२ हेक्‍टर
धामणगाव रेल्वे २०,६२२ हेक्‍टरपैकी २,५३१ हेक्‍टर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com