agriculture news in marathi, The possibility of banana plantation in Kolhapur is less likely | Agrowon

कोल्हापुरात केळी लागवड कमी होण्याची शक्‍यता
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या लागवडीत घट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पुरेसा पाऊस नसल्याने कांदे बाग केळीच्या लागवडीसाठी अद्याप शेतकरी उत्सुक नसल्याचे चित्र आहे. केळीला चांगला दर मिळत असला तरी पाण्याची समस्या ही अनेक ठिकाणी असल्याने नव्या लागवडी फारशा होत नसल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर : पुरेशा पाण्याअभावी जिल्ह्यात केळीच्या लागवडीत घट होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. पुरेसा पाऊस नसल्याने कांदे बाग केळीच्या लागवडीसाठी अद्याप शेतकरी उत्सुक नसल्याचे चित्र आहे. केळीला चांगला दर मिळत असला तरी पाण्याची समस्या ही अनेक ठिकाणी असल्याने नव्या लागवडी फारशा होत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत उसानंतर केळीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. पाण्याची उपलब्धता जिथे मुबलक आहे त्या ठिकाणी केळीच्या क्षेत्रात वाढ होत होती. यंदा जून, जुलै महिन्यात केळीच्या लागवडी झाल्या. सध्या जिल्ह्यात सरासरी तीनशे ते चारशे एकर क्षेत्रांवर केळीची लागवड करण्यात आली आहे. तरी नोव्हेंबरनंतर होणाऱ्या केळीच्या लागवडी मंदावल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात पश्‍चिम भाग वगळता अन्य कुठेही समाधानकारक पाऊस झाला नाही.

गडहिंग्लज, शिरोळ, हातकणंगले तालुक्‍यांत बहुतांशी करून केळीच्या बागा आहेत. पण, पुरेसा पाऊस नसल्याने उपलब्ध पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी झटापट करावी लागली. नोव्हेंबर महिन्यात ज्या लागवडी होतात त्यांना पाण्याचा स्त्रोत असणे महत्त्वाचे असते. यामुळे ज्यांच्याकडे बारमाही नदी व विहिरीचे पाणी उपलब्ध अशाच शेतकऱ्यांनी केळी लागवडीबाबत उत्सकता दाखविली. यामुळे परिसरातील रोपवाटिकांमधून ही फारशी मागणी नसल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले.

कोल्हापूरबरोबर खानदेशातूनही अद्याप केळी लागवडीला अनुकूल वातावरण नसल्याने सध्या अगदी नाममात्र स्वरूपात मागणी येत असल्याचे रोपवाटिका चालकांनी सांगितले. येणाऱ्या काळात केळीला चांगला दर मिळण्याची शक्‍यता असली तरी उन्हाळा हा महत्त्वाचा घटक ठरणार असल्याचे याचा अंदाज घेऊनच उसाच्या हंगामानंतर शेतकरी केळीच्या पिकाला प्राधान्य देतील, अशी शक्‍यता केळी उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केली.

राज्यभरात दुष्काळी परिस्थिती असल्याने केळी रोपांची मागणी घटली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही अपेक्षित मागणी आली नाही. ऊसतोड सुरू झाल्यानंतर किती लागवड होईल, याचा अंदाज करता येऊ शकेल.
- विश्‍वास चव्हाण, सीमा बायोटेक, तळसंदे, जि. कोल्हापूर

इतर ताज्या घडामोडी
पुणे जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा...पुणे ः पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप...
उष्णतेचे कारण देऊन पपईच्या दरात अडवणूकनंदुरबार : जिल्ह्यातील पपई उत्पादकांना अपेक्षित...
नांदेड जिल्ह्यात साडेअकराशे हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात गुरुवार (ता. १४) पर्यंत...
नगर जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणी मोहिमेची...नगर : जनावरांच्या छावण्या सुरू केल्या. मात्र,...
वऱ्हाडात हळद काढणीला सुरवातअकोला : वऱ्हाडात दुष्काळी परिस्थिती, तसेच पाणी...
परभणीतील पशुवैद्यक विद्यार्थ्यांचे भीक...परभणी ः पशुसंवर्धन विभागांतर्गंत पशुधन सहायकांना...
नाशिक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळनाशिक : नाशिक शहर व जिल्ह्यात बिबट्याच्या...
सोलापूर कृषी विज्ञान केंद्राला...सोलापूर : भारतीय कृषी व संशोधन परिषदेअंतर्गत...
नगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळपनगर ः जिल्ह्यातील २३ सहकारी व खासगी साखर...
सोलापूर जिल्हा दूध संघाचे पैसे...सोलापूर : दूध अनामत रक्कम, पशुखाद्य व गायी...
शेतकऱ्यांचे नाही, तर श्रीमंतांचे...प्रयागराज, उत्तर प्रदेश : "गेल्या काही...
नगरला चिंच प्रतिक्विंटल ८३०० ते ११९००...नगर ः नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भुसार...
शिरवळला पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचे...सातारा : सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या...
स्वाभिमानीसोबत दिलजमाईसाठी बुलडाण्यात...बुलडाणा ः लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने...
जळगावात गव्हाची आवक रखडत; दर स्थिरजळगाव ः जिल्ह्यात गव्हासाठी प्रसिद्ध असलेल्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक टिकून;...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
I transfer my JOSH to you...पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी...
जीवलग मित्र गेला...मनोहर गेला. हे जरी सत्य असले तरी ते मान्य होणे...
जबरदस्त, प्रभावी इच्छाशक्तीचे केंद्र :...लहानपणापासूनच कुठलीही गोष्ट एकदा ठरवली की, तो ती...
तळपत्या सूर्याचा अस्त !राजकारणी माणसाला यश आणि अपयशाचा सामना रोजच करावा...