agriculture news in marathi, Possibility of decrease in paddy production in Bhandara district | Agrowon

भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादनात घटीची शक्यता
टीम अॅग्रोवन
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

सात ते आठ टक्‍के उत्पादनात घट होऊ शकते. येत्या आठ दिवसांत धान पिकाला पाण्याची अत्यंत गरज आहे. त्यानंतर उत्पादनातील घट होण्याची टक्‍केवारी वाढेल. जास्त ताण पडलेल्या भागात बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.
- हिंदुराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा.

भंडारा : गेल्या वीस दिवसांपासून धानपट्ट्यात पावसाने दडी मारली आहे. आठ दिवसांत पाऊस न आल्यास शेतकऱ्यांच्या हातात केवळ तणसच राहण्याची भीती वर्तविली जात आहे. धानाचे कोठार असलेल्या भंडारा जिल्ह्यात यामुळे शेतकऱ्यांच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आहेत.

भंडारा जिल्ह्यात यावर्षी १ लाख ७४ हजार हेक्‍टरवर धानाची रोवणी करण्यात आली. त्यासाठी सहा जूनपासून पऱ्हे फेकण्यात आले. त्यानंतर १४ ते ३० जूनपर्यंत ७५ टक्‍के रोवणीची कामे पूर्णत्वास गेली. यानंतर पावसाने दीर्घकाळ खंड दिल्याने रोवणीचे काम प्रभावित झाले होते. परंतु, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. सद्या उच्च प्रतीचे धान गर्भार अवस्थेत, तर निम्न प्रतीचे धान पीक नासवले आहे. या अवस्थेत पिकाला पाण्याची आवश्‍यकता आहे. परंतु, तब्बल २० दिवसांपासून पाऊस पडला नसल्याने धान उत्पादनात घट होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. ऊन वाढल्याने जमिनीला भेगा पडल्या आहेत. धानपीक कोमजले असून येत्या चार दिवसांत पाऊस न बरसल्यास निसवलेले धान भरणार नाही. गर्भार अवस्थेतील धान लोंब्या फेकणार नाही. भात पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याचाही उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

डिझेल दरवाढीचाही फटका
काही शेतकऱ्यांकडे ओलिताच्या सोयी आहेत. परंतु, भारनियमनामुळे पाणी उपसा करता येत नाही. त्यातच डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने डिझेलपंपाच्या वापरावरदेखील मर्यादा आल्याच्या प्रतिक्रिया काही शेतकऱ्यांनी दिल्या.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...