ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्यता

ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्य
ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांचे सदस्यत्व रद्द होण्याची शक्य

सोलापूर : निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पण राज्य शासनाने ही मुदत पुन्हा सहा महिन्यांनी वाढवून देऊनही वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर केले नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या ८०० सदस्यांना आपल्या सदस्यत्वावर पाणी सोडण्याची वेळ येणार आहे. त्यात शंभराहून अधिक सरपंच आणि काही उपसरपंचांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते.

राखीव मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या सरपंच वा सदस्यांना उमेदवारी अर्जासोबत जातप्रमाणपत्र द्यावे लागते. पण त्याची वैधता पडताळून देण्यासाठी पुढे सहा महिन्यांची मुदत देण्यात येते. त्यानुसार सहा महिने संपले. पण तरीही जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सहा महिने मुदत वाढवून दिली होती. राज्य शासनाची मुदत २४ ऑक्टोबर रोजी संपली. त्यानंतरही जिल्ह्यातील ८०० हून अधिक ग्रामपंचायत सदस्यांनी तहसील कार्यालयाकडे जातवैधता प्रमाणपत्र सादरच केले नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सदस्यत्व रद्द होणाऱ्या सदस्यांची संख्या २७०० होती. मुदतीत १८०० सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्र सादर केले आहे. पण अद्यापही ग्रामपंचायत हे प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांची संख्या ८०० वर बाकी आहे. 

त्याशिवाय अन्य शंभर सदस्यांमध्ये सरपंच आणि काही उपसरपंचांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, महसूल विभागाकडून सध्या तालुकानिहाय अशा सदस्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंततर सदस्य रद्दची कारवाई करण्ययात येणार आहे, असे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com