agriculture news in marathi, The possibility of millet record sowing | Agrowon

बाजरीच्या विक्रमी पेरणीची शक्यता
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

जळगाव : खानदेशात रब्बी हंगामात बाजरीची सुमारे २५ ते ३० हजार हेक्‍टरवर पेरणी होण्याची शक्‍यता आहे. ही पेरणी सुरूच असून, बाजरीचे क्षेत्र मागील चार-पाच हंगामांच्या तुलनेत अधिक राहण्याचे संकेत आहेत. 

जळगाव : खानदेशात रब्बी हंगामात बाजरीची सुमारे २५ ते ३० हजार हेक्‍टरवर पेरणी होण्याची शक्‍यता आहे. ही पेरणी सुरूच असून, बाजरीचे क्षेत्र मागील चार-पाच हंगामांच्या तुलनेत अधिक राहण्याचे संकेत आहेत. 

बाजरीची पेरणी धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, धुळे व शिरपूर तालुक्‍यात खरिपात अधिक केली जाते. रब्बी हंगामात खानदेशात हरभरा, दादर (ज्वारी) यांना पसंती दिली जाते. परंतु या हंगामात कोरडवाहू रब्बी पिकांच्या पेरणीसाठी हवी तशी ओल नव्हती. काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू ज्वारी व हरभरा पेरणी जळगाव, चोपडा, शिरपूर भागात झाली. परंतु त्याची वाढ खुंटली आहे. यातच पाण्याची समस्या सातपुडा पर्वतालगत व इतर भागातही येत आहे. दोन तीन वेळेस सिंचन करून कोणती पिके येतील, यावर शेतकऱ्यांनी भर दिला. त्यात काळ्या कसदार जमिनीत बाजरी तीन वेळेस सिंचन करून येते. शिवाय चांगला चाराही मिळेल, यामुळे तिच्या पेरणीवर भर देण्यात आला. खानदेशात मागील हंगामात सुमारे १८ हजार हेक्‍टवर बाजरीची पेरणी झाली होती. या हंगामात मात्र तिचे क्षेत्र सुमारे १० ते १२ हजार हेक्‍टरने वाढून ते ३० हजार हेक्‍टरपर्यंत जात असल्याचे सांगितले जात आहे. 

चारा व धान्य म्हणून मका पिकास मागील हंगामात तापी व गिरणा काठच्या अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिली. परंतु मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पीक मोडावे लागले. नुकसानीच्या भितीने अनेक शेतकऱ्यांनी मक्‍याची लागवड टाळली. मक्‍याऐवजी बाजरीची पेरणी शेतकऱ्यांनी केल्याची माहिती मिळाली. या महिन्यात शिरपूर, चोपडा, जळगाव, यावल व शिंदखेडामधील तापी काठावर बाजरीची पेरणी होईल, असे सांगण्यात आले.

इतर ताज्या घडामोडी
हरभरा चुकाऱ्यासाठी शेतकऱ्यांचा पोलिस...बुलडाणा : गेल्या वर्षात हमीभावाने विक्री केलेल्या...
कमाल, किमान तापमानात चढउतारमहाराष्ट्रावर १०१२ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
सोलापुरात गाजर, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हवामान बदलाशी सुसंगत उपाययोजनांचा शोध...सध्या हवामान बदलाचा परिणाम शेतीवर दुष्काळ, गारपीट...
सोलापूर जिल्ह्यात आठ ग्रामपंचायतींची...सोलापूर : लोकसभेच्या आधी जिल्ह्यातील आठ...
पीकविम्याचा योग्य मोबदला द्यावा : ‘...अकोला : संग्रामपूर तालुक्यात भीषण दुष्काळी...
नांदेड जिल्ह्यात पिकांना गारपिटीचा तडाखाकिनवट, जि. नांदेड : नांदेड जिल्ह्यातील बोधडी बु (...
शिवसेनेच्या २१ उमेदवारांची घोषणा,...मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी...
आनंदी देशांच्या यादीत भारताचे स्थान...न्यूयॉर्क : देशातील आनंदाला ओहोटी लागल्याचे...
केळी पीक सल्लाउन्हाळ्यात अधिक तापमान, तीव्र सूर्य प्रकाश, वादळी...
बॅंक कर्मचाऱ्याच्या दक्षतेमुळे मोदी...लंडन : पंजाब नॅशनल बॅंकेची हजारो कोटींची फसवणूक...
गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी फरदड;...केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूरद्वारे तयार...
नाशिक जिल्हा बँकेने रेणुकादेवी संस्थेचा...नाशिक : जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासमोर...
शेतकऱ्यांचा 'वसाका' प्रशासनाला घेरावनाशिक  : देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी...
मीटर रीडिंगची पूर्वसूचना संदेशाद्वारे...सोलापूर  : ग्राहकांची गैरसोय होऊ नये, मीटर...
दिव्यांग मतदारांना सुविधा द्या :डॉ....सोलापूर : दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी...
कोल्हापुरात २३०० हेक्टरवर उन्हाळी पेरणीकोल्हापूर  : जिल्ह्यात उन्हाळी हंगामाची...
जळगावात गवारीला प्रतिक्विंटल ७५०० रुपयेजळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (...
नंदुरबार जिल्ह्यात पाणीटंचाई गंभीरनंदुरबार  : जिल्ह्यातील पाणीटंचाई वाढत आहे....
पुणे विभागात ४१५ टॅंकरने पाणीपुरवठापुणे : विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस तीव्र...