agriculture news in Marathi, The possibility of opponents coming together to defeat Raju Shetty | Agrowon

राजू शेट्टींच्या पराभवासाठी विरोधक एकत्र येण्याची शक्‍यता
राजकुमार चौगुले
गुरुवार, 14 मार्च 2019

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांत केवळ मतदारसंघातच नाही तर देशपातळीवर शेतकऱ्यांचे संघटन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांना अडचणीत आणण्यासाठी आता भाजपबरोबरच इतरांनीही व्यूहरचना करण्यास सुरवात केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून श्री. शेट्टी यांनी खासदारकीवर निर्विवाद वर्चस्व राखल्याने आता भाजपा-शिवसेनेसह स्वाभिमानीतून फुटून बाहेर पडलेले घटकही त्यांच्या विरोधात सरसावले आहेत. यामुळे हातकणंगले मतदारसंघातील निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. 

कोल्हापूर : गेल्या काही वर्षांत केवळ मतदारसंघातच नाही तर देशपातळीवर शेतकऱ्यांचे संघटन करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांना अडचणीत आणण्यासाठी आता भाजपबरोबरच इतरांनीही व्यूहरचना करण्यास सुरवात केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून श्री. शेट्टी यांनी खासदारकीवर निर्विवाद वर्चस्व राखल्याने आता भाजपा-शिवसेनेसह स्वाभिमानीतून फुटून बाहेर पडलेले घटकही त्यांच्या विरोधात सरसावले आहेत. यामुळे हातकणंगले मतदारसंघातील निवडणूक राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. 

‘स्वाभिमानी’ने कॉंग्रेस आघाडीकडे राज्यातील इतर जागांची मागणी केली आहे. स्वत: हातकणंगलेची जागा तेच लढणार आहेत. जरी आघाडी झाली नाही तरीही कॉंग्रेस-राष्ट्रवादी पक्षही या जागेवर स्वत:चे उमेदवार उभे करतील ही शक्‍यता कमी आहे. भाजपला विरोध करण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस शेट्टींना बळ देण्याची शक्‍यता आहे. 

गेल्या पाच वर्षांचा इतिहास पाहिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही फुटीरतेने ग्रासले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी लढणारा शेतकरी संघटनांचा एक मातब्बर नेता अशी ओळख मतदारसंघाबरोबर राज्यातही आहे. पण त्यांचे प्राबल्य असणाऱ्या हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातच बंडखोरी त्यांच्या वाट्याला आलेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत उल्हास पाटील यांनी शिवसेनेत जाऊन आमदारकी मिळविली. तर सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानीचा नेता म्हणून राज्य सरकारमध्ये मंत्रिपद मिळविले. पण मंत्रिपद मिळविल्यानंतर ते स्वाभिमानीपासून दूर झाले. याचबरोबर तालुका स्तरावरील काही कार्यकर्तेही त्यांच्यापासून लांब झाले. या घटना शेट्टी समर्थकांना रुचल्या नाहीत. 

माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांची उमेदवारी शिवसेनेकडून पक्की झाली आहे. पण सदाभाऊ खोत यांनाही त्यांच्या विरोधात उतरवता येईल का याबाबत भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. पण माने किंवा खोत यापैकी एकजण नक्की त्यांना टक्कर देण्यासाठी उभा राहू शकतो. शेतकऱ्यांसाठी अनेक प्रश्‍न हाताळल्याने विजयी होण्याचा विश्‍वास श्री. शेट्टी यांना आहे. पण कोणत्याही परिस्थितीत श्री. शेट्टी यांचा पराभव करण्यासाठी शेट्टींचे सर्व विरोधक एकत्र येऊन प्रयत्न होत आहे. यामुळे यंदा शेतकऱ्यांच्या विश्‍वासावर श्री. शेट्टी हे सलग तिसऱ्यांदा बाजी मारणार की विजयी रथ रोखला जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

शेट्टींच्या ‘बॅटिंग’कडे लक्ष
खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला निवडणूक आयोगाने यंदाच्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीसाठी बॅट हे चिन्ह दिले आहे. यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीत खासदार शेट्टी व त्यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना बॅट घेऊनच निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत राजू शेट्टी कोणत्या प्रकारची बॅटिंग करतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

इतर बातम्या
हतबलतेतून फळबागांवर कुऱ्हाड अन्‌...जालना : जीवापाड जपलेली बाग वाचविण्यासाठी रानोमाळ...
विषाणूंद्वारे खोल मातीतही पोचविता येतील...मातीमध्ये खोलवर पिकाच्या मुळावर एखाद्या बुरशी...
मराठवाड्यात महायुतीचा करिष्मा कायमनांदेड : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघांतील...
पुण्यात गिरीश बापट, बारामतीत सुप्रिया...पुणे  : देशभर मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी...
राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभवकोल्हापूर : गेल्या दहा वर्षांपासून...
नगरमध्ये डॉ. सुजय विखे, शिर्डीत...नगर  : विसाव्या फेरीअखेर नगर लोकसभा...
साताऱ्यात उदयनराजे यांची हॅटट्रिक सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे...
जळगाव : शिवारात पाणीबाणी, शेतकरीराजा...जळगाव ः गावात तीन वर्षांपासून पावसाच्या लहरीपणाने...
राज्यात महायुतीची त्सुनामी...मुंबई  ः सतराव्या लोकसभेच्या निवडणुकीत देशभर...
उन्हाचा चटका ‘ताप’दायकपुणे : सूर्य चांगलाच तळपल्याने उन्हाचा चटका...
राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी...कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश...
मोदीच आजच्या महाविजयाचे महानायक : अमित...नवी दिल्ली : देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या...
पुन्हा मोदी लाट, काँग्रेस भुईसपाट नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या...
ये नया हिंदुस्थान है' : पंतप्रधानआज देशातील नागरिकांनी आम्हाला कौल दिला. मी...
...आवाज कुणाचा? लोकसभा २०१९चा आज निकालनवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या...
कृषी विद्यापीठांना नकोय शिक्षण परिषदेचे...नागपूर : भारतीय कृषी संशोधन परिषदेने तयार...
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात...पुणे : उन्हाचा चटका वाढल्याने राज्यातील...
राज्यात कृत्रिम पावसाची तयारी सुरूमुंबई : राज्यातील यंदाच्या भीषण दुष्काळाची...
फळबाग लागवड योजनेवर ग्रामसेवकांचा...चिपळूण, जि. रत्नागिरी ः महाराष्ट्र ग्रामसेवक...
‘रिसॅट-२ बी'चे उपग्रहाचे यशस्वी...श्रीहरीकोट : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो...