कांद्यात अजून दरवाढीचे संकेत

कांदा
कांदा

नाशिक : गत सप्ताहात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांत कांद्याचे दर प्रतिक्विंटल ८०० ते १७०० व सरासरी १३०० असे होते. शुक्रवारी (ता. २) कांद्यावरील एमईपी पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला. सप्ताहाच्या अखेरीस कांद्याच्या दराने उसळी घेतली.   शनिवारी (ता. ३) क्विंटलला १००० ते २००० व सरासरी १५०० रुपये दर मिळाले. कांद्याच्या दरात पहिल्याच दिवशी ३०० रुपयांनी वाढ झाली. दरम्यान दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. ४) कांद्याच्या दरात प्रतिक्विंटलला ५०० रुपयांपर्यंत वाढ झाली. किमान निर्यात मूल्य हटविण्याच्या निर्णयाने बाजारात उत्साह  पसरला. येत्या सप्ताहात कांद्याच्या दरात अजून वाढ होईल, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. केंद्र शासनाच्या निर्णयानुसार शुक्रवार (ता. २)पासून कांद्यावरील किमान निर्यात मूल्य पुन्हा काढून टाकण्यात आले आहे. याचा महत्त्वाचा परिणाम कांद्याच्या बाजारावर झाला आहे. देशभरातून कांद्याची आवक वाढत होती. एमईपीमुळे कांदा निर्यातीला अडथळे निर्माण झाले होते. या स्थितीत दरात सातत्याने घसरण सुरू होती. या पार्श्‍वभूमीवर एमईपी काढण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून होत होती. मागील महिन्यात कांद्याने क्विंटलला तीन हजारांचा टप्पा गाठला होता.  मागील पंधरवड्यात सरासरी दर क्विंटलला १३०० पर्यंत आले होते. राज्यातील उन्हाळ कांद्याचे उत्पादन सुरू होत असताना, दरातील उतरणीने चिंता वाढवली होती. मात्र येत्या सप्ताहात पुन्हा कांदा दर उसळी घेतील, अशी चिन्हे आहेत.  येत्या काळात निर्यातीसाठी तसेच देशांतर्गत बाजारपेठांत मागणी वाढेल. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम होईल, असे लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com