agriculture news in marathi, post vacant in aatma section, varhad, maharashtra | Agrowon

वऱ्हाडात अधिकाऱ्यांविना ‘अात्मा’ पोरका
टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 जून 2018

अकोला  ः कृषी विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबविणे, शेतकऱ्यांना विस्तार सेवा पुरवताना गरजांवर आधारित आणि शेतकरी सहभागातून तयार झालेल्या कृषी विस्तार कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे अादी महत्त्वाची कामे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा ही संस्था करीत असते. सध्या या यंत्रणेत प्रकल्प संचालक, उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अधिकाऱ्यांविना ‘अात्मा’ पोरका असे उपहासात्मक बोलले जात अाहे.

अकोला  ः कृषी विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबविणे, शेतकऱ्यांना विस्तार सेवा पुरवताना गरजांवर आधारित आणि शेतकरी सहभागातून तयार झालेल्या कृषी विस्तार कार्यक्रमांची अंमलबजावणी करणे अादी महत्त्वाची कामे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा ही संस्था करीत असते. सध्या या यंत्रणेत प्रकल्प संचालक, उपसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अधिकाऱ्यांविना ‘अात्मा’ पोरका असे उपहासात्मक बोलले जात अाहे.

वऱ्हाडात अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही ठिकाणी सध्या अात्मा यंत्रणेला प्रकल्प संचालक नाहीत. अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांचीही अशीच स्थिती असल्याचे सांगितले जाते. शेतकरी आणि शेतीविकासाच्या कार्यक्रमांमध्ये महिला शेतकऱ्यांचा समावेश, शेतकरी मित्रांमार्फत विस्तार सेवा, आधुनिक संवाद माध्यमांचा वापर तसेच प्रशिक्षण, शेतीशाळा, माहिती व संवाद अशी कामे अात्मामार्फत केली जातात. शेतकऱ्यांना सक्षम करणे हा मुळात उद्देश अाहे. सध्या अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने यंत्रणांच्या कामावर परिणाम झाला अाहे. या विभागात कार्यरत असलेल्या काहींना बदल्यांचे वेध लागलेले अाहेत.

अकोला येथील प्रकल्प संचालक ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले. बुलडाणा येथील प्रकल्प संचालक हे बुलडाण्याचेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून रूजू झाले. वाशीममध्ये हे पद रिक्त अाहे. प्रत्येक जिल्ह्यात उपसंचालकाच्या मंजूर पदापैकी एक पद रिक्त अाहे. कार्यरत असलेल्या उपसंचालकांकडे सध्या प्रकल्प संचालक पदाची जबाबदारी दिली गेली अाहे. 

खरीप हंगामाच्या दृष्टीने प्रकल्प संचालकांचे पद भरणे अत्यंत अावश्यक अाहे. हंगामात पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन, कृषी मित्रांच्या माध्यमातून ग्रामपातळीवर नवीन वाण, तंत्राबाबत माहिती पोचविणे अादी कामांचे नियोजन हे महत्वाचे असते. सध्या हंगाम तोंडावर असताना जबाबदार अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात अाल्या. त्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक सध्या तरी करण्यात अालेली नाही.

कृषी विभाग व अात्मा या दोन्ही यंत्रणा स्वतंत्रपणे कार्यरत अाहेत. परंतु ‘अात्मा’ला काम करताना सातत्याने निधीची अडचण जाणवत राहते. या विभागाला जाणीवपूर्वक कमकुवत केले जात असल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत अाहे.

इतर ताज्या घडामोडी
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...
लोकसभेसाठी माढ्यातून तुल्यबळ उमेदवारकऱ्हाड : लोकसभेसाठी माढा मतदारसंघात भारतीय जनता...
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या...नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे...
परभणीतील शेतकऱ्यांचे कोल्हापुरात आंदोलनकोल्हापूर : परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त...
युवकांच्या सहकारी संस्था स्थापणार :...कऱ्हाड : राज्यातील सहकारी संस्थांचे सभासद हे ६०...
बाजार समित्यांमधील...नाशिक : तेलंगण, तमिळनाडू व कर्नाटकच्या धर्तीवर...
पुलवामातील हल्ल्यात बुलढाणा जिल्ह्याचे...बुलडाणा : पुलवामा येथे झालेल्या अतिरेकी ...
हल्ल्या मागे जे आहेत त्यांना शिक्षा...नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा...
आम्ही विसरणार नाही.. माफही करणार नाही...नवी दिल्ली- जम्मू-काश्‍मीरच्या पुलवामा जिल्ह्यात...
काश्‍मीरमधील शेतकऱ्याला थकबाकीची रक्कम...पुणे : काश्‍मीरमधील शेतकऱ्याला सफरचंदाचे पैसे...
बिबट्याच्या दहशतीखाली चोरट्यांकडून...आंबेठाण, जि. पुणे : शिंदे गाव (ता. खेड) येथे दोन...
‘डिंभे’चे पाणी जोड बोगद्याद्वारे ‘...मुंबई : डिंभे डाव्या तीर कालव्यातील गळती...
विदर्भात आज गारपीट, हलक्या पावसाचा अंदाजपुणे : पोषक हवामानामुळे आज (ता. १४) विदर्भात...
कापसासाठी ‘एमसीएक्‍स’कडून गोदामांची...मुंबई : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना समृद्ध...
कर्ज देण्याच्या नावाखाली ७३ शेतकऱ्यांची...गोंदिया : कर्ज देण्याच्या नावाखाली ७३...