agriculture news in marathi, post vacant in agri department, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यातील कृषी विभागात १०६ पदे रिक्त
अभिजित डाके
गुरुवार, 21 जून 2018

सांगली ः जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, आणि वर्ग दोनमधील १०६ पदे रिक्त आहेत. यामुळे कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. रिक्त पदांमुळे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकांसह विविध कामे केवळ कागदावर होत असल्याचे यावरून स्पष्ट होते आहे.

सांगली ः जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी, आणि वर्ग दोनमधील १०६ पदे रिक्त आहेत. यामुळे कृषी विभागाच्या विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. याचा फटका शेतकऱ्यांना बसू लागला आहे. रिक्त पदांमुळे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकांसह विविध कामे केवळ कागदावर होत असल्याचे यावरून स्पष्ट होते आहे.

शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती देण्याचे काम कृषी विभागाच्या माध्यमातून होते. मात्र, जिल्ह्यातील कृषी विभागात सुमारे १०६ पदे रिक्त आहेत. यामुळे शासनाच्या मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, पीकविमा, यासह अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खरीप हंगामाची लगबग सुरू आहे. या दरम्यान शेतकरी शेतातमध्ये करीत असलेल्या पिकांच्या पेरणीबाबतचा अहवाल कृषी विभागामार्फत तयार केला जात असतो.

कृषी सहाय्यक आणि मंडल अधिकारीस्तरावर तयार केलेला अहवाल तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे येतो. पीक नोंद करत असताना कृषी सहाय्यकांनी थेट शेतात जाऊन पीक पाहणी करूनच नोंद घ्यावी असा नियम आहे. पण ही पदे रिक्त असल्याने हा अहवाल केवळ कार्यालयात बसून आणि अंदाज बांधून बनवला जात असल्याचे चित्र आहे. अधिकारी बांधापर्यंत पोचतच नाहीत, असे शेतकऱ्यांनी सांगितले.

गाव पातळीवर जाऊन पीक आराखडा तयार करण्याचे काम कृषी सहाय्यकांकडे असते. गाव पातळीवर प्रत्येक शेतकऱ्यांकडे जाऊन आराखडा तयार केला जातो. मात्र, रिक्त पदे असल्याने प्रत्येक तालुक्‍यात एका कृषी सहायकावर अतिरिक्त गावांची जबाबदारी टाकली आहे.

यामुळे प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांना पीक प्रात्यक्षिक देणे कठीण बनले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना याचे प्रात्यक्षिकेच मिळत नाही. कृषी सहायक प्रत्येक गावात पोचत नसल्याने पीक प्रात्यक्षिक केवळ कागदावरच रंगविले जात असल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये आहे. रिक्त पदे  :  कृषी सहाय्यक ः ८३ , कृषी अधिकारी ः १५ वर्ग २ अधिकारी ः ८

इतर ताज्या घडामोडी
अब आया उंट पहाड के निछे; राजू शेट्टींचा...सोलापूर : शेतकऱ्यांच्या दूध दराच्या प्रश्‍...
सरकार रिलायन्स, पतंजलीच्या दुधाची वाट...नागपूर : एकीकडे समाधानकारक पाऊस पडत असताना...
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस-...नागपूर : कधी देणार कधी देणार...कापूस, धानाला...
पीक सल्ला१६ जुलै ते ३१ जुलैपर्यंत पेरणी लांबल्यास संकरीत...
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...