agriculture news in Marathi, postal department will gave wi-fi service in villages | Agrowon

खेड्यात टपाल खाते देणार वाय-फाय सेवा
टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

पुणे ः राज्यातील दुर्गम खेडी आणि वाड्या-वस्त्या आता वाय-फाय हाेणार आहे. पी.सी.आे.च्या धर्तीवर पी.डी.आे. (पब्लिक डाटा आॅफिस) आता गावागावांत कार्यान्वित करण्यात येणार असून, दुर्गम भागातील नागरिकांना या माध्यमातून राेजगारदेखील उपलब्ध हाेणार आहे. टपाल खात्याच्या माध्यमातून ही सेवा लवकरच खेड्यांमध्ये हाेणार आहे.

पुणे ः राज्यातील दुर्गम खेडी आणि वाड्या-वस्त्या आता वाय-फाय हाेणार आहे. पी.सी.आे.च्या धर्तीवर पी.डी.आे. (पब्लिक डाटा आॅफिस) आता गावागावांत कार्यान्वित करण्यात येणार असून, दुर्गम भागातील नागरिकांना या माध्यमातून राेजगारदेखील उपलब्ध हाेणार आहे. टपाल खात्याच्या माध्यमातून ही सेवा लवकरच खेड्यांमध्ये हाेणार आहे.

माेबाईल क्रांतीमुळे संवाद आणि संपर्काची साधने वाढली आणि जग जवळ आले. मात्र अद्यापही अनेक दुर्गम गावांंमध्ये माेबाईलची रेंज नसल्याने अनेक खेडी, वाड्या-वस्त्या संपर्काच्या साधनांअभावी जगापासून दूर आहेत. यासाठी टपाल खात्याच्या वतीने पीसीआेच्या धर्तीवर पीडीआे सेवा देण्यात येणार आहे. पुणे विभागाचे पाेस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्‍वर यांनी या याेजनेची माहिती ‘ॲग्राेवन’ला दिली. 

सावळेश्‍वरकर म्हणाले, की माेबाईल क्रांतीनंतरही अनेक दुर्गम, डाेंगरी खेडी, वाड्या-वस्त्या संपर्काच्या साधनांमुळे विविध सेवा सुविधांपासून वंचित आहेत. या दुर्गम खेड्यातील नागरिकांसाठी पब्लिक डाटा आॅफिस टपाल खात्याच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी माेबाईल रेंज नाही अशा ठिकाणी विशेष केबल देऊन किंवा उपग्रहाद्वारे डेटाबेस देऊन दाेन- तीन किलाेमीटरच्या परिघामध्ये वाय-फाय देण्यात येणार आहे.

विशिष्ट रक्कम भरून वाय- फाय वापरता येणार आहे. हे पीडीआे स्थानिक बेराेजगरांद्वारे चालविण्यात येणार असून, या माध्यमातून राेजगारदेखील उपलब्ध हाेणार आहे. बंगळुरु येथे प्रायाेगित तत्त्वावर पीडीआे कार्यान्वित करण्यात आली असून, याच धर्तीवर पुणे विभागातील एका खेड आणि त्याच्या वाड्या- वस्त्या वाय- फाय करण्यात येणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
अंदाजाच्या पलीकडे...हवामान बदलामुळे कधीही न संपणाऱ्या विघ्नांची...
रोजगार निर्मितीसाठी वाढवा शेतकऱ्यांचे...कारखान्यातील वेतनाला प्रमाण मानून शेतकरी...
साखर निर्यात अनुदानासाठी हालचालीपुणे : साखरेचे भाव कोसळल्यामुळे अडचणीत...
‘ॲग्रोवन’ आमचा..! आम्ही ‘ॲग्रोवन’चे..!!पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
वर्धापन दिनानिमित्ताने ‘अॅग्रोवन’वर...पुणे : कृषी पत्रकारिता आणि ग्रामविकासात दीपस्तंभ...
भारतासह दक्षिण आशियात यंदा सामान्य पाऊसपुणे : भारतासह दक्षिण आशियातील देशांच्या बहुतांशी...
चंद्रपूरला अजूनही उच्चांकी तापमानपुणे : पावसाने उघडीप दिल्यानंतर राज्यातील ऊन...
रत्नागिरी, देवगड, अलिबाग हापूसला...मुंबई : हापूस ‘कोणा’चा हा गुंता आता सुटण्याच्या...
‘ॲग्रोवन’चे आज चौदाव्या वर्षात पदार्पण !पुणे ः राज्यभरातील प्रगतिशील शेतकऱ्यांच्या...
कृषी विज्ञान केंद्रांमध्ये हवामान...पुणे : ‘‘देशातील शेतकऱ्यांना मोबाईलवरून हवामान...
चंद्रपूरमध्ये देशातील उच्चांकी...पुणे : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
३२०० साखर दराची अंमलबजावणी व्हावी :...कोल्हापूर : केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने...
केसर आंबा संकटातचऔरंगाबाद :  सुरवातीला मोहराच्या काळात...
त्रस्त शेतकरी वाटणार ३ मेपासून मोफत दूधनगर/औरंगाबाद  : गतवर्षी शेतकरी संपानंतर...
पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा केला वापरप्रभाकर चौधरी हे १९७६ पासून शेती करतात. त्यांची...
खडकाळ, हलक्या जमिनीतही आणली सुपीकताकोणतेही पीक येईल की नाही, अशा खडकाळ जमिनीचे संजय...
नैसर्गिक शेतीतून राखले जमिनीचे आरोग्यअमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा (संभू)( ता. भातकुली...
जमिनीवरील अत्याचार थांबवा !पुणे : एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे...
दुग्ध व्यवसायाला २८०० कोटींचा फटकापुणे : उत्पादन खर्चात वाढ आणि नफा घटल्यामुळे...
मुदत संपलेल्या जिल्हा बँकांवर प्रशासक...मुंबई : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण चार...