agriculture news in marathi, potato crop damage due to rain, pune district, maharashtra | Agrowon

आंबेगावमधील दोनशे एकरांवरील बटाटा पिकाला फटका
नवनाथ भेके
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017
निरगुडसर, जि. पुणे  : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरसह जवळे, भराडी परिसरात सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकतेच लागवड केलेले बटाटा पीक सडण्याच्या मार्गावर आहे. साधारण २०० एकरांहून अधिक क्षेत्रावरील बटाटा शेतीला पावसाचा फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
 
निरगुडसर, जि. पुणे  : आंबेगाव तालुक्यातील निरगुडसरसह जवळे, भराडी परिसरात सलग चार दिवस झालेल्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी नुकतेच लागवड केलेले बटाटा पीक सडण्याच्या मार्गावर आहे. साधारण २०० एकरांहून अधिक क्षेत्रावरील बटाटा शेतीला पावसाचा फटका बसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 
 
पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उद्‌ध्वस्त झाली आहेत. यामध्ये उसासह बटाटा पिकाचा समावेश आहे. गेल्या आठ दिवसांत निरगुडसर परिसरातील शेतकऱ्यांनी २०० हून अधिक एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली आहे. त्याकरिता बियाणे, खते, मजुरी यासाठी एकरी २० ते ३० हजार रुपये खर्च केला आहे.
 
परंतु, गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे लागवड केलेल्या बटाटा शेतीच्या सऱ्या पाण्याने तुडुंब भरल्या आहेत. सततच्या पावसामुळे बटाटा बियाणे सडू लागले आहे.
 
निरगुडसर येथील शेतकरी गणपत महादू ढोबळे यांनी मागील महिन्यात २२५ कट्ट्याची १४ एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली होती. परंतु, मागील महिन्यात झालेल्या पावसामुळे बियाणे सडले व त्यातून तीन लाख रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतर त्याच शेतकऱ्याने पुन्हा आठ दिवसांपूर्वी दहा एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केली. परंतु, पुन्हा सलग चार दिवस पावसाने हजेरी लावल्याने बियाण्यांची पुन्हा सड होऊन त्यांचे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे निरगुडसर परिसरासह भराडी, जवळे परिसरातील शेतकऱ्यांचे बटाटा बियाणे सडू लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
 
गणपत ढोबळे यांनी ५ ते १० सप्टेंबर दरम्यान १४ एकरांवर बटाटा बियाण्यांची लागवड केली. त्यानंतर पावसामुळे बटाटा बियाणे सडले. त्यानंतर त्यांनी या महिन्यात आठ दिवसांपूर्वी १० एकरांवर बटाटा लागवड केली. परंतु पावसामुळे पुन्हा नुकसानीला सामोरे जावे लागले. यामध्ये या शेतकऱ्याचे एका महिन्यात एकूण पाच लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. पण हार मानायची नाही हे धोरण ठेऊन पाऊस उघडल्यावर पुन्हा १० एकरांवर बटाट्याची लागवड करणार असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
शेतीत फुलताहेत उद्यमशीलतेची बेटं गेल्या वर्षी ''महाएफपीसी'' आणि शेतकरी कंपन्यांनी...
सुस्त प्रशासन, स्वस्थ शासनराज्यात बीटी कापूस व सोयाबीन पिकांवर कीटकनाशकांची...
दूध संघांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमकनागपूर : राज्यात सध्या अडचणीत आलेल्या सहकारी दूध...
मुंबई बाजार समिती घोटाळ्यातील दोषींवर...नागपूर : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील...
मलकापूरला कापसाचे दर पाच हजारांपर्यंतअकोला : बोंड अळीने या हंगामात पिकाचे एकीकडे...
महाराष्ट्रात हुडहुडी वाढणारपुणे : मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत कमी...
देशभरातील शेतकरी संघटनांचा स्वतंत्र...राष्ट्रीय किसान परिषदेच्या समारोपप्रसंगी...
औरंगाबादला आजपासून हवामानावर...औरंगाबाद : राज्यातील चारही कृषी विद्यापीठे आणि जल...
अमेरिकेच्या विरोधाने ‘अन्नसुरक्षा’...ब्युनाॅर्स अायर्स, अर्जेंटिना : विकसनशील आणि...
रेशीम उत्पादकांनी केली विमानवारीऔरंगाबाद : जिवाची मुंबई करण्यासाठी अनेकजण जातात....
अनुभवावर ठरतो मधमाश्यांचा फुलांपर्यंतचा...अनुभवाने शहाणपणा वाढते, ही बाब माणसांइतकीच...
मूग, उडीद उत्पादकांची पंचाईतपरभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत...
एकात्मिक शेती पद्धतीतून मिळवली अार्थिक...दुर्गम, ग्रामीण अाणि आदिवासी भाग असूनही नंदुरबार...
जलसंधारणाच्या कामांतून बोहाळीचा कायापालटशासनाच्या पाणलोट विकास कार्यक्रमाला लोकसहभाग व...
कर्जमाफी मिळत नसेल, तर सरकारी देणी भरू...नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांना संकटातून बाहेर...
शेतकरी मृत्यूंची माहिती स्थानिक...नागपूर : कापूस आणि सोयाबीन पिकांवर विषारी...
मध्य महाराष्ट्र, कोकणात धुकेपुणे : मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांत...
लातूर जिल्ह्यात सव्वाचारशे शेतकऱ्यांचे...लातूर  ः शासनाने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमी...
विदर्भात सरत्या वर्षात १२०० शेतकरी...नागपूर ः दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे...
फवारणीप्रकरणी नेटिसांना अधिकाऱ्यांचे...यवतमाळ ः कीटकनाशकांच्या फवारणीप्रकरणी...