agriculture news in marathi, potato growers In double trouble | Agrowon

बटाटा उत्पादक दुहेरी संकटात
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 नोव्हेंबर 2017

उदापूर, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील बटाटा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. परतीचा पाऊस, तसेच विविध रोगांमुळे एकरी उत्पादन कमी मिळत आहे, तर बाजारभावही कमी मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

उदापूर, जि. पुणे : जुन्नर तालुक्‍यातील बटाटा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. परतीचा पाऊस, तसेच विविध रोगांमुळे एकरी उत्पादन कमी मिळत आहे, तर बाजारभावही कमी मिळत आहेत. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे.

वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव, प्रतिकूल हवामान, धुके, पाऊस यामुळे जुन्नर तालुक्‍यात यंदा बटाटा उत्पादनात घट होण्याची शक्‍यता शेतकरी व्यक्त करीत आहेत. उत्पादन खर्चात मात्र वाढ होत आहे. त्यात मजूर टंचाई आणि वाढत्या मजुरीचा प्रश्‍नही आहेच. परतीच्या पावसामुळे बटाट्यावर करपा, दांडी करपा, काळा करपा, डावणी, भुरी, माथेसूळ अशा वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात घट झाली आहे, तर दुसरीकडे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे.

दीपावलीनंतर शेतातील कामे असतात. त्यात प्रामुख्याने कांदे लागवड, कांदा रोपाची निंदणी, चाळीतील साठवणूक केलेला कांदा भरणे, बटाटा काढणी व इतर पिकांची तोडणी वगैरेची कामे एकत्र येतात, त्यामुळे शेतमजुराचा मोठा तुटवडा जाणवत असून मजुरीही वाढली आहे. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या सुरवातीला तालुक्‍यात बटाट्याची लागवड झाली आहे.

मात्र, या वर्षी लागवडीनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यातच पडलेल्या विविध रोगांमुळे बटाट्याच्या गुणवत्तेत सुधारणा झालीच नाही. बटाटा चांगल्या प्रकारे पोसलाच नाही, त्यामुळे प्रतवारीनुसार बाजारभाव कमी मिळत आहे. सध्या बटाट्यास प्रतवारीनुसार चार रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. एकरी पन्नास ते साठ हजार रुपये खर्च होऊनही उत्पादन कमी निघाल्याने उत्पादकांना खर्च वजा जाता हाती काहीच शिल्लक राहत नाही.

इतर ताज्या घडामोडी
परभणीत भेंडी प्रतिक्विंटल ३००० ते ४०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
कोकणात चांगल्या पावसाची शक्यतामहाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर १००४...
ढगाळी वातावरणात द्राक्ष बागेचे...बागेत कमी झालेले तापमान, निघालेल्या बगलफुटीमुळे...
खरीप नियोजन : सोयाबीन उत्पादन वाढीसाठी...सोयबीनच्या झाडाचा पालापाचोळा, अवशेष  जमिनीवर...
नाशिक जिल्ह्यात मेंढपाळांची चारा-...नाशिक : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत चारा-...
तिसगाव येथे ऊस वाढ्यांचे भाव...तिसगाव, जि. नगर : ऊस चाऱ्याचे भाव अचानक तिसगाव (...
पुणे झेडपी : भाकड कालावधीत...पुणे : जिल्हा परिषदेच्या अनुसूचित जाती, जमातीच्या...
मराठवाड्यात शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची...औरंगाबाद : जूनच्या पहिल्या आठवड्यात काही ठिकाणी...
केळी दरप्रश्‍नी रावेर येथे शेतकऱ्यांचा...जळगाव ः केळीची खानदेशात जाहीर दरांनुसारच खरेदी...
मका, हळद, हरभरा किमतीत वाढमक्याच्या बाजारातील स्पॉट किमती सध्या हमी...
पावसाळ्यात टाळा विजेचे धोकेओलसर हातांनी वीज उपकरणे हाताळू नयेत. त्यात...
डाळिंब बागेतील मर रोगाचे नियंत्रणडाळिंब लागवड शक्यतो गादी वाफ्यावर करावी, त्यामुळे...
खानदेशात लाल कांद्याची आवक घटली; दर...जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत १२२९...नागपूर ः लागवड ते कापणीपर्यंत तंत्रशुद्ध शेती...
बुलडाणा येथे महिलांनी गिरविले बीज...बुलडाणा ः कृषी विभागाची कृषी तंत्रज्ञान...
येवला तालुक्यात कापूस लागवडीला सुरवातनाशिक : मृग नक्षत्रात पावसाने जिल्ह्यात विविध...
सांगली : शनिवारपासून पीकविमा खात्यात...सांगली ः पीकविमा योजनेअंतर्गत आंबिया बहर...
नगर : खरिपात साडेपाच लाख हेक्‍टरवर...नगर : गतवर्षी पावसाने दडी मारल्याने खरीप, रब्बी...
बीडसाठी भरणार मुळा धरणातून टॅंकरराहुरी, जि. नगर : ‘‘मराठवाड्यातील बीड जिल्ह्याची...
रत्नागिरी जिल्ह्यात पेरणीच्या कामाला वेगरत्नागिरी ः वायू चक्रीवादळाचा परिणाम सलग तिसऱ्या...