agriculture news in marathi, potato plantation start, pune, maharashtra | Agrowon

सातगाव पठार परिसरात बटाटा लागवडीस सुरवात
सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

सातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बटाटा लागवडीला सुरवात केली आहे.

गेली दोन वर्षे या परिसरातील खरीप हंगामातील बटाटा पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. गतवर्षी बटाटा काढणीपूर्वी अतिवृष्टी झाल्याने बटाटा उत्पादकांचा बटाटा शेतातच सडला. परिणामी, बटाटा खरेदीच्या बाजारभावात वाढ होऊन तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल असा दर मिळाला.

सातगाव पठार, जि. पुणे : काही गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बटाटा लागवडीला सुरवात केली आहे.

गेली दोन वर्षे या परिसरातील खरीप हंगामातील बटाटा पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे. गतवर्षी बटाटा काढणीपूर्वी अतिवृष्टी झाल्याने बटाटा उत्पादकांचा बटाटा शेतातच सडला. परिणामी, बटाटा खरेदीच्या बाजारभावात वाढ होऊन तीन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटल असा दर मिळाला.

या परिसरातील शेतकरी खरीप हंगामात ७५०० हेक्‍टर क्षेत्रात वेफर्ससाठी बटाटा लागवड दरवर्षी करतात. कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ व पारगाव तर्फे खेड या सात गावांमध्ये चालू खरीप हंगामात पावसाने काही गावामध्ये वेळेवर हजेरी लावल्याने बटाटा उत्पादक शेतकऱ्यांची बटाटा लागवडीची तयारी केली आहे. एका खासगी
कंपनीच्या माध्यमातून वेफर्ससाठी बटाटा खरेदी करार झालेला आहे. याद्वारे गेली सोळा वर्षे बटाटा बियाणे व उत्पादित झालेला बटाटा पिकास योग्य हमीभाव दिला जातो.
 
शेतीला अजून कोणतीही सिंचन व्यवस्था नाही. परिसरातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांचे वार्षिक आर्थिक गणित बटाटा पिकावर अवलंबून असते. या परिसरातील सुमारे शंभर शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत राष्ट्रीय फलोत्पादन व राज्य सरकारचा कृषी विभाग मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत तीस लाख लिटर ते एक कोटी बारा लाख लिटर क्षमतेची शेततळी बांधली आहे. यापैकी काही शेतकऱ्यांना अनुदान मिळाले असून, काही शेतकऱ्यांना अनुदान अद्याप मिळाले नाही.

इतर ताज्या घडामोडी
...तर जिनिंग मिल मालकांविरोधात कारवाई ः...वर्धा   ः गुलाबी बोंड अळी नियंत्रणासाठी...
अकोले तालुक्‍यात पावसाचा जोर कायमनगर  : अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
स्वाभिमानीचा सर्जिकल स्ट्राईक,...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून...
सातारा जिल्ह्यात दूध दरप्रश्नी तिसऱ्या...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखीचे सोलापूर...सोलापूर : पिटू भक्तिचा डांगोरा । कळिकाळासी दरारा...
कोयना, कण्हेर धरणांतून विसर्गसातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. बुधवारी...
कर्नाटकातून येणारे दूध आंदोलकांनी अडवलेसोलापूर :  दुधाच्या वाढीव दरासाठी स्वाभिमानी...
किणी टोल नाका येथे पोलिसांची जबरदस्ती;...कोल्हापूर- : स्वाभिमानीने शेतकरी संघटनेने पुणे...
कनिष्ठ सहायकाची एक वेतनवाढ बंदनाशिक  : जिल्हा परिषदेची सभा असो की मुख्य...
भेंडीची वेळेवर लागवड आवश्यकभाजीपाला पिकांमध्ये भेंडी पिकाची लागवड वाढत आहे....
दूध दरप्रश्‍नी राज्य सरकार दोषी : राज...पुणे  ः दूधदराचा प्रश्न गंभीर होत आहे....
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये १०६ टीएमसी...पुणे  : जिल्ह्यातील पश्‍चिम भागात असलेल्या...
बुलडाणा, वाशीममध्ये दूध दरप्रश्‍नी...अकोला  ः दुधाला प्रतिलिटर पाच रुपये दर...
पोषक घटकांनीयुक्त शेळीचे दूधभारतामध्ये प्रामुख्याने गायीच्या व म्हशीच्या...
मराठवाड्यात तिसऱ्या दिवशीही दूध...औरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या गेलेल्या...
कोल्हापुरात हिंसक वळणकोल्हापूर : दूध आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी...
चंद्रकांतदादांच्या आश्वासनानंतर उपोषण...परभणी  ः पीकविमा परताव्यापासून वंचित...
शेतकऱ्यांना बोंड अळीची नुकसानभरपाई...नाशिक  : गेल्या वर्षी बोंड अळीमुळे कापूस...
खानदेशात ८० टक्के पेरणी उरकलीजळगाव : खानदेशात जवळपास ८० टक्के क्षेत्रावर पेरणी...
हाँगकाँग येथे जांभळ्या रताळ्यापासून...हाँगकाँग येथील एका खासगी साखळी हॉटेल उद्योगाने...