agriculture news in marathi, Potato prices rise sharply as cold storage supply hits market | Agrowon

बटाट्याच्या दरात २५ टक्के सुधारणा
वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

कोलकाता : गेल्या आठवड्याच्या तुलनेत बटाट्याच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. शहरातील महत्त्वाच्या बाजारातसुद्धा घाऊन किमतीतही वाढ झाली. गेल्या आठवड्यात १४ ते १५ रुपये असलेला दर १८ ते २० रुपये प्रति किलोपर्यंत वाढ झाली आहे. 

पश्‍चिम बंगाल शीतगृह संघटनेचे अध्यक्ष पतीत पबन यांनी ही माहिती दिली. श्री. पबन म्हणाले, ‘‘आतापर्यंत बाजारात होणारी बटाट्याची अावक ही शेतकऱ्यांच्या गोदामातील होती. आता शीतगृहातून बाजारात बटाट्याची आवक सुरू होणार असल्याने दरात वाढ झाली आहे.’’

कोलकाता : गेल्या आठवड्याच्या तुलनेत बटाट्याच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत सुधारणा झाल्याचे अधिकारी सूत्रांनी सांगितले. शहरातील महत्त्वाच्या बाजारातसुद्धा घाऊन किमतीतही वाढ झाली. गेल्या आठवड्यात १४ ते १५ रुपये असलेला दर १८ ते २० रुपये प्रति किलोपर्यंत वाढ झाली आहे. 

पश्‍चिम बंगाल शीतगृह संघटनेचे अध्यक्ष पतीत पबन यांनी ही माहिती दिली. श्री. पबन म्हणाले, ‘‘आतापर्यंत बाजारात होणारी बटाट्याची अावक ही शेतकऱ्यांच्या गोदामातील होती. आता शीतगृहातून बाजारात बटाट्याची आवक सुरू होणार असल्याने दरात वाढ झाली आहे.’’

नजीकच्या ओडिशासह इतर राज्यांत बटाट्याच्या दरात वाढ झाली आहे. शीतगृहातून बाजारात येणाऱ्या बटाट्याच्या दरात प्रति किलो ४ ते ५ रुपये वाढ झाली आहे. यात शीतगृहातील खर्च अंतर्भूत असल्याने ही वाढ झाल्याचे श्री. पबन यांनी सांगितले. पंचायत निवडणुका १४ मे रोजी होत असल्याने शीतगृहातील कामकाजासाठी मजुरांचा तुटवडा भासू लागला अाहे. दर वाढण्यात मजूरटंचाईचाही काही बाजारात परिणाम झाला आहे. 

संघटनेचे माजी अध्यक्ष रामापाडा पाॅल म्हणाले, की मजूरटंचाईमुळे शीतगृहातून सध्या तत्कालिक गरज भागविण्यापुरतेच बटाट्याचा पुरवठा होत आहे. निवडणूक झाल्याशिवाय मजूर येणार नसल्याने बटाटा पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. 
पोस्टा घाऊक बाजारातील कृषी सल्लागार सिबू मालाकर म्हणाले, की जोपर्यंत पुरवठ्यात मोठा खंड अाणि इतर राज्यांतून मागणीत वाढ होत नाही, तोपर्यंत लक्ष्मी बटाटा वाणास २० रुपये प्रति किलो दरम्यान राहील.

दरातील बदल हा पश्‍चिम बंगालमध्ये बटाट्याचे उत्पादन कमी झाले म्हणून नाही, तर इतर राज्यांतील पीक नुकसानीत गेले म्हणून आहे. यंदा पश्‍चिम बंगालमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के कमी उत्पादन झाले असले, तरी १०० लाख टन उत्पादन अाहे. गेल्या वर्षी येथील बटाटा उत्पादक शेतकऱ्यास दराअभावी मोठ्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले होते. 

आमचा विभागाचे बटाट्याच्या सद्यःस्थितीवर लक्ष आहे. कोणत्या प्रकारची साठेबाजी आणि दरात मोठी वाढ झाल्यास योग्य ती पावले उचलली जातील. मात्र बटाटा उत्पादक शेतकरी नुकसानीत जाणार नाही, याचीही काळजी घेतली जाईल.
 - तपन दासगुप्ता, राज्य कृषी पणनमंत्री

इतर ताज्या घडामोडी
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...
कापूस लागवड न करणाऱ्यांना मिळाली मदत;...जळगाव  ः जिल्ह्यात मागील हंगामात बोंड...
पुणे विभागात रब्बीची १८ टक्क्यांवर पेरणीपुणे  ः परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत पुरेशी...