गटशेतीतून भरघोस उत्पन्न घेणे शक्‍य ः मारिया अप्रेइसाइड

गटशेतीतून भरघोस उत्पन्न घेणे शक्‍य ः मारिया अप्रेइसाइड
गटशेतीतून भरघोस उत्पन्न घेणे शक्‍य ः मारिया अप्रेइसाइड

म्हसवड, जि. सातारा : शेतजमिनीची धूप होऊ न देता माती परीक्षण करून आवश्‍यक त्याच कमीत कमी रासायनिक खतांसह पाण्याचा वापर करून माण तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान व त्यावर आधारित साधनांचा वापर करून जर एकत्रितपणे गट शेतीचा प्रयोग केला तरच अल्प खर्चात पिकांचे भरघोस उत्पन्न घेणे माणसह इतर दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना शक्‍य होईल, असे प्रतिपादन अर्जेंटिना येथील प्रगतिशील महिला शेतकरी मारिया अप्रेइसाइड यांनी केले. 

येथील माण देशी चारा छावणीत सुमारे आठ हजार जनावरांसोबत मुक्कामी राहिलेल्या तीन हजार शेतकरी कुटंबांना अर्जेंटिना देशामधील शेतकऱ्यांनी ‘अल्प पाणी व खर्चात मनुष्यबळाविना शेती व पीकपद्धत व पशुपालना’बाबत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. या वेळी येथील माण देशी फाउंडेशन व माण देशी महिला बॅंकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा, विजय सिन्हा, वनिता पिसे इत्यादी उपस्थित होते. 

अप्रेइसाइड म्हणाल्या, ‘‘अर्जेंटिनामध्ये माझी पाच हजार एकर शेतजमीन व त्यासोबत चार हजार जनावरे आहेत. आमच्याही देशात पाऊस अत्यल्प पडतो. वादळी वारे खूपच वाहत असते. त्यामुळे जमिनीची धूप होऊन त्यामधील पीक वाढीस आवश्‍यक असलेली मूलद्रव्ये कमी होतात. यामुळे अधुनिक तंत्रज्ञान वापरून प्रगत शेती पद्धत अवलंबवली. पाच हजार एकर शेतीसाठी फक्त सातच माणसे कामे करीत असतात. प्रत्येक पीक लागवडी पूर्वी माती परीक्षण करून घेत असतो. गहू, मका, सोयाबीन इत्यादी पिके आलटून पालटून घेत आहोत. संबंधित पीक वाढीस गरजेची असलेली खते ही जमिनीतील मूलद्रवे माती परीक्षण करून पाहत असतो व जी नाहीत तीच व तेही पाहिजे तेवढीच रासायनिक खताच्या माध्यमाने देत असतो. यामुळे पीक जोमात, वेळेत हाती लागते व उत्पादनही अपेक्षित असेच मिळवितो.’’

या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समाधानकार उत्तरेही दिली. अर्जेंटिनामधील पाच हजार एकरांतील आधुनिक शेतीचे छायाचित्रे, खत मात्रा, पालापाचोळा आच्छादन व बियाणे पेरणी, आधुनिक व छोटीशी शेती अवजारे याची सचित्र माहिती व्हिडीओ प्रोजेक्‍टच्या साह्याने समजून सांगितली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com