agriculture news in marathi, poultry analysis | Agrowon

खप घटल्यामुळे नरमला ब्रॉयलर्सचा बाजार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जानेवारी 2018
विविध कारणांमुळे बाजारात पुरवठा वाढला असून, त्यामुळे बाजारभाव नरमले आहेत. मात्र येत्या दिवसांत मागणीत सुधारणा होऊन सध्याच्या पातळीवर बाजार स्थिरावेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
 
विविध कारणांमुळे बाजारात पुरवठा वाढला असून, त्यामुळे बाजारभाव नरमले आहेत. मात्र येत्या दिवसांत मागणीत सुधारणा होऊन सध्याच्या पातळीवर बाजार स्थिरावेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
 
मागील आठवडाभरात बेंचमार्क नाशिक विभागात ब्रॉयलरच्या प्रतिकिलो लिप्टिंग दरात प्रतिकिलोमागे ५ रुपयांची घट झाली आहे. खासकरून दक्षिण भारतातील बाजारात मोठी घट झाली आहे. तेथील दर उत्पादन खर्चाच्याही खाली उतरले आहेत. गुजरात, मध्य प्रदेशसह उत्तर भारतातून बाजाराला आधार मिळत असून, यामुळे महाराष्ट्रातील बाजारभाव ७० रुपये प्रतिकिलोवर टिकला आहे. तथापि, दक्षिणेतील मंदीमुळे महाराष्ट्रातील बाजारावर दबाव दिसत आहे.
 
जानेवारी महिन्यात ब्रॉयलर्सच्या बाजारभावात उतरता कल दिसत आहे. या संदर्भात कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की जानेवारीसाठी प्लेसमेंट वाढले होते. कोंबड्यांचा खप मंदावला असून, त्यामुळे बाजारात उतरता कल दिसत आहे. सध्याचे तापमान हे पक्ष्यांसाठी प्रतिकूल आहे. त्यामुळे विक्री वाढली आहे. शिवाय, पक्ष्यांची वजनेही वाढली आहेत. सध्याच्या पातळीवर बाजारभाव स्थिरावण्याची अपेक्षा आहे.
 
नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, की दक्षिणेतील मार्केट सुधारत असून, परिणामी महाराष्ट्रातील बाजारभाव ६५ ते ७० रुपये यादरम्यान राहण्याची अपेक्षा आहे. बर्ड फ्लूसंदर्भात सोशल मीडियात खोट्या पोस्ट टाकण्यात आल्याने ग्राहकांत धास्तीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे काहीअंशी विक्रीवर परिणाम झाला. 
 
देशातील बेंचमार्क मार्केट हैदराबादेत अंड्यांचे बाजारभाव नरमले आहेत. आठवडाभरात प्रतिशेकडा २२ पैशांची घट झाली आहे. हॅचिंग एग्जचे दर ३५ रुपये प्रतिनग, तर एका दिवसाच्या पिलांचे दर ४६ रुपये प्रतिनग या पातळीवर स्थिर होते. कच्च्या मालाच्या बाजारभावात खासकरून सोयामीलच्या दरात गेल्या दोन महिन्यांत प्रतिटनामागे हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे खाद्याचे दर व पर्यायाने उत्पादन खर्च वाढला आहे. आधीच चिक्सच्या दरामुळे उत्पादनखर्चात वाढ असताना, आता खाद्याचे दरही वधारल्याने मार्जिन मोठ्या प्रमाणावर घटले आहे, असे ओपन फार्मर्सनी सांगितले.
 

जगात भारतीय ब्रॉयलर पोल्ट्री व्यवसाय अव्वल मानला जातो. अत्यंत उच्च प्रतीचे खाद्य, प्रशिक्षित मनुष्यबळांकडून होणारे व्यवस्थापन आणि स्वस्त दरात चिकनची उपलब्धता ही भारताच्या पोल्ट्री व्यवसायाचे वैशिष्ट्ये आहेत. ग्राहकांना जास्तीत जास्त सुरक्षित असे चिकन पुरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. अशा वेळी सोशल मीडियात जाणीवपूर्वक खोट्या पोस्ट तयार करून गैरसमज पसरवला जात असून, त्यात काहीही तथ्य नाही. या दुष्प्रचाराविरोधात लवकर पावले उचलली जाणार आहेत. भारतीय चिकन पूर्णत: सुरक्षित आहे, असे पोल्ट्री फार्मर्स अॅंड ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार यांनी म्हटले आहे.

देशभरातील ब्रॉयलर्सचे दर : मिरज - ६८, संकेश्वर ६२, हैदराबाद ७०, बंगळूर ५५ रुपये.
 
प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ७१ प्रतिकिलो नाशिक
अंडी ३८० प्रतिशेकडा पुणे
चिक्स ४६ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज ३५ प्रतिनग मुंबई
मका १२७२ प्रतिक्विंटल सांगली
सोयामिल २५,४०२ प्रतिटन इंदूर
 
 
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...