agriculture news in marathi, poultry analysis | Agrowon

मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने ब्रॉयलर्सचा बाजार सुधारणार
टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 मार्च 2018
मार्चअखेरीपर्यंत बाजारात हळूहळू सुधारणा अपेक्षित आहे. एप्रिल महिन्यात तुलनेने आणखी चांगली परिस्थिती अपेक्षित आहे.
- डॉ. पी. जी. पेडगावकर.
मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत हळूहळू सुधारत जाईल, एप्रिलमध्ये आणखी चांगली परिस्थिती असेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. परीक्षांच्या हंगामासह अन्य हंगामी कारणांमुळे ब्रॉयलर्सला उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळत आहे.
 
शनिवारी (ता. १७) बेंचमार्क नाशिक विभागात ५५ रुपये प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजार स्थिर आहे. पुणे विभागात प्रतिशेकडा अंड्यांचा लिफ्टिंग दर ३२५ रुपये होता. मागील आठवड्याच्या तुलनेत दहा रुपये तर महिनाभरात ५० रुपयांनी अंड्यांचा बाजार नरमला आहे. सध्या, अंड्यांचे दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अंशत: वर आहेत. ब्रॉयलर्सचा बाजार उत्पादन खर्चाच्या तुलनेत ओपन फार्मर्स ते इंटिग्रेटर्सनिहाय दहा ते पंधरा टक्क्यांनी मंदीत आहे.
 
पोल्ट्री फार्मर्स अॅँड ब्रीडर्स असोसिएशनचे सचिव डॉ. पी. जी. पेडगावकर यांनी सांगितले, की मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या बाजारात सुधारणा अपेक्षित होती. तथापि, दक्षिणेकडील राज्यातील मंदीची परिस्थिती, परीक्षांच्या कालावधीमुळे थंडावलेली मागणी आणि दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे वाढलेली विक्री आदी कारणांमुळे बाजारात मोठी घसरण झाली आहे. यापुढील काळात मार्चअखेरीपर्यंत बाजारात हळूहळू सुधारणा अपेक्षित आहे. एप्रिल महिन्यात तुलनेने आणखी चांगली परिस्थिती अपेक्षित आहे.
 
कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की मागणीच्या अभावामुळे सध्या बाजार मंदीत आहे. मंदीच्या खालील पातळीवरून थोडीफार सुधारणा दिसत असली, तरी बाजार उत्पादन खर्चाच्या खूपच कमी आहे. रविवारी (ता. १८) गुढीपाडवा आल्यामुळे त्या दिवशी होणारा चिकनचा खप मंदावला. याशिवाय, पुढील रविवारी ( ता. २५) रामनवमी आहे. मुंबईसारख्या शहरात आठवड्यातील एकूण मागणीचा निम्मा खप रविवारी होत असतो. अशा दिवशी सण आल्यामुळे तेवढ्या प्रमाणात खप कमी झालेला दिसतोय. एकूणच बाजारातील परिस्थिती खराब आहे. पुढील दोन आठवड्यांत हळूहळू सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. दक्षिणेत बंगळूर बाजार ६० रुपये प्रतिकिलो, तर हैदराबाद ६४ रुपये प्रतिकिलोपर्यंत सुधारले असून, बाजाराच्या दृष्टीने ही जमेची बाजू आहे.
 
खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीरकर यांनी सांगितले, की चालू आठवड्यातील प्लेसमेंट ओपन फार्मर्ससाठी किफायती ठरेल. सध्या हॅचिंग एग्ज आणि पिलांचे दर समान पातळीवर आले आहेत. सध्याच्या बाजारभावानुसार किमान आठ रुपये अधिकचा दर पिलांना मिळायला हवा. मात्र, ब्रॉयलर्सचा बाजार मंदीत असल्यामुळे पिलांना उठाव नाही. उत्तर-पूर्वेकडील राज्यांतून हॅचिंग एग्जना चांगली मागणी आहे.
 
हॅचिंग एग्जचे दर हे देश पातळीवरील मागणीनुसार, तर चिक्सचे दर हे राज्यांतर्गत मागणीनुसार ठरतात. एप्रिलपासून ब्रॉयलर्सच्या बाजारात सुधारणा अपेक्षित आहे. यापुढे उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांची वजने नियंत्रणात राहतील, तर सुट्यांच्या हंगामामुळे मागणीत सुधारणा होईल, यामुळे येत्या दिवसांतील प्लेसमेंटमधून मागील दीड महिन्यातील नुकसान भरून निघण्याची अपेक्षा आहे.
 
 
 प्रकार  भाव  परिमाण  बाजारपेठ
 ब्रॉयलर  ५५  प्रतिकिलो  नाशिक
 चिक्स  ३३  प्रतिनग  पुणे
 हॅचिंग एग्ज  ३३  प्रतिनग  मुंबई
 अंडी  ३२५  प्रतिशेकडा  पुणे

 

इतर ताज्या घडामोडी
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...
पाकिस्तानात घुसूनच सर्जिकल स्ट्राइक करा...नवी दिल्ली : दहशतवादाविरोधात सर्व राजकीय पक्षांनी...
शिवजयंतीला शिवनेरी किल्ल्यावर शिववंदनापुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या...
हुतात्मा संजय राजपूत, नितीन राठोड यांना...बुलडाणा  ः काश्मीरमधील पुलवामा सेक्टरमध्ये...
जिवाणूंमुळे होतो फुफ्फुसाच्या...फुफ्फुसाच्या ट्यूमरच्या विकासामध्ये तेथील...
पाणीटंचाईची ऊस लागवडीला झळपुणे :ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या...
नगर जिल्हा परिषदेचे उद्या अंदाजपत्रकनगर : जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा...
सौरपंपांपासून साडेचार हजार शेतकरी वंचितजळगाव : मुख्यमंत्री सौरकृषिपंप योजनेच्या लाभासाठी...
सौर कृषिपंप योजनेच्या लाभार्थ्यांचा...सोलापूर : शेतकऱ्यांना सौरऊर्जेद्वारे दिवसाही...
औरंगाबादेत द्राक्ष प्रतिक्विंटल ३५०० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
शिवसेना-भाजपचे युतीच्या दिशेने पुढचे...मुंबई: लोकसभा निवडणुकीतील युतीसाठी शिवसेना-...
किमान तापमानात वाढ, उन्हाळी हंगामास...महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
पुणे विभागात हरभऱ्याची ४९ टक्केच पेरणीपुणे : पावसाळ्यात कमी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल...
शाळांमधील ४९८ खोल्या धोकादायकपुणे : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने...
मराठवाड्यात रब्बी पिकांची वाढ खुंटलीऔरंगाबाद : पाण्याचा ताण, तापमानातील चढउतार यामुळे...
अमरावतीत तूर, कापसाला मिळेना भावअमरावती : चीनकडून भारतीय सोयाबीनला वाढती...
गुलाब उत्पादकांच्या कष्टाला मिळाले फळ नाशिक : दुष्काळी परिस्थिती, कमी असलेला भाव,...