agriculture news in marathi, poultry analysis | Agrowon

छोटा माल मंदीत तर मोठा माल नव्वदीच्या पार
दिपक चव्हाण
सोमवार, 7 मे 2018
चालू आठवड्यातही बाजारभाव टिकून राहील. ओपन फार्मर्सनी दुपारच्या वेळेत फार्मवर थांबून उन्हाळी नियोजन काटेकोरपणे करावे आणि पक्षी मोठे करून विकावेत.
- संजय नळगीकर, संचालक, खडकेश्वर हॅचरीज, औरंगाबाद.
संपूर्ण भारतात ब्रॉयलर पक्ष्यांचे बाजारभाव ८५ रुपये प्रतिकिलोंवर पोचले आहेत. उन्हाळ्यातील उत्पादनघटीचा प्रभाव देशभरातील बाजारावर दिसला आहे. खासकरून दोन किलो वजनावरील पक्ष्यांच्या बाजार जोरदार तेजीत आहे.
 
नाशिक विभागात शनिवारी (ता. ५) ९१ रुपये प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारभावात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिनाभरातील नीचांकी पातळीवरून बाजार ८० टक्क्यांनी सुधारला आहे. 
 
खडकेश्वर हॅचरिजचे संचालक संजय नळगीरकर यांनी सध्याच्या बाजाराबाबत पुढीलप्रमाणे निरीक्षणे मांडली आहेत. १. लहान पक्ष्यांचा बाजार ७० रुपयांनी खालावला आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांची वाढ न होणे, वाहतुकीदरम्यान वजन घटणे आदी कारणांमुळे लहान मालास कमी मागणी आहे. मोठ्या प्रमाणावर लहान मालाचा होत असलेला पुरवठा हा येत्या दिवसांतही तेजी लांबण्यासाठी पुरक ठरणार आहे. 
 
२. दक्षिण भारतात - कर्नाटकातील निवडणुकांमुळे ब्रॉयलर्सच्या खपाला चालना मिळाली आहे. शिवाय, तेथे उत्पादन घटीची समस्या अधिक तीव्र आहे. दुसरीकडे, उत्तर-पूर्वेतील बाजार १०० रुपये प्रतिकिलोंवर तर दिल्ली - उत्तर प्रदेशात १०० रुपयांच्या आसपास बाजार उंचावला आहे. एकूणच संपूर्ण भारतातील बाजार ८५ रुपयांवर आहे.
 
३. मधल्या काळात हॅचिंग एग्ज आणि चिक्सचे दर समान पातळीवर होते. त्यामुळे अंड्यांना मागणी घटून आता त्यांचे बाजारभाव चिक्सच्या तुलनेत ११ रुपयांनी कमी झाले आहेत. सामान्यपणे चिक्सच्या तुलनेत हॅचिंग एग्जचा बाजार २० ते २५ टक्क्यांपेक्षा कमी राहत नाही. 
 
४. चिक्सचा बाजारभावात फार मोठी वाढ अपेक्षित नाही. उत्तर भारतात १८ ते २८ या रेंजमध्ये चिक्सची उपलब्धता आहे. मात्र, उन्हाळ्यामुळे वाहतूक करण्यात जोखीम असल्याने महाराष्ट्रातील बाजारावर मोठा प्रभाव पडणार नाही.
 
५. चिकनची किरकोळ विक्री सामान्य आहे. रविवारी अपेक्षेप्रमाणे विक्री झाली आहे. ६.चालू आठवड्यातही बाजारभाव टिकून राहील. ओपन फार्मर्सनी दुपारच्या वेळेत फार्मवर थांबून उन्हाळी नियोजन काटेकोरपणे करावे आणि पक्षी मोठे करून विकावेत.
 
आठवडाभरात टेबल एग्जच्या बाजारभावात १२ टक्क्यांनी वाढ झाली. दरवर्षी १५ मे नंतर अंड्याच्या बाजारभावात तेजीचा कल दिसतो. या वर्षीही त्याची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. अमरावती येथील पोल्ट्री उद्योजक रवींद्र मेटकर म्हणाले, की तापमानवाढीचा मोठा फटका लेयर उद्योगाला बसला आहे. अशावेळी पक्ष्यांची प्रतिकारक्षमता कमी होऊन विषाणूजन्य प्रादुर्भाव वाढतो. सध्या एकूणच उत्पादन १५ टक्क्यांनी कमी झाले आहे.
 
तथापि, उन्हाळ्यात अंड्यांना मागणी कमी असते. त्यामुळे उत्पादनघटीचे रूपांतर भाववाढीत दिसलेले नाही. यापुढील काळात घटता पुरवठा लक्षात घेता बाजारात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
 
प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ९१ प्रतिकिलो नाशिक
चिक्स ३६ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज २५ प्रतिनग मुंबई
अंडी ३५२ प्रतिशेकडा पुणे

 

 
टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...
व्यवस्थेनेच शेतकऱ्यांना ओरबडले : राजू...कोल्हापूर ः ‘देशात अनेक राजवटी आल्या; पण या...
चारा छावण्या सुरू न केल्यास आंदोलन :...नगर : दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकाने...
आंबा मोहर सल्ल्यासाठी तज्ज्ञ बांधावर जालना : हवामानाचा बदलता अंदाज पाहता फळ संशोधन...
मापाडींच्या प्रश्नांबाबत सरकार...सोलापूर  : राज्यातील बाजार समित्यातील हमाल-...
तीन वर्षांपूर्वीचा हरभरा बियाणे घोळाचा...अकोला ः २०१६-१७ च्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना...
उन्हाळ कांद्याच्या सिंचनाबाबत अडचणी जळगाव  ः उन्हाळ कांदा लागवडीसंबंधी खानदेशात...
पाकमधून होणाऱ्या सर्व आयातीवर जबर शुल्कनवी दिल्लीः पुलवामा येथील हल्ल्याच्या...
हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना ५० लाख...बुलडाणा ः तीन दिवसांपूर्वी काश्‍मीरमधील...
रविवार विशेष : दावणत्या दाव्यानं असे किती जीव ओढत नेले असतील...
केंद्रीय कृषी विद्यापीठे ही काळाची गरज...देशात वातावरणावर आधरित १५ झोन आहेत. या...
श्रीमंत रानातला ‘गरीब’ प्रतिभावंत !ठकाबाबांनी जगण्यावर, कलेवर भरभरून प्रेम केले. कला...
तूर, हरभरा अनुदान मिळण्यासाठी अचूक...मुंबई : शेतकऱ्यांचे आधार क्रमांक बँक खात्यास...