agriculture news in marathi, poultry analysis | Agrowon

सातत्यपूर्ण तेजीनंतर बाजारात नरमाई शक्य
दिपक चव्हाण
सोमवार, 18 जून 2018

सध्याच्या भावपातळीवरून यापुढे नरमाईचा कल दिसू शकेल. तथापि, पक्ष्यांची वजने आजही नियंत्रणात असून, ही जमेची बाजू आहे.
- कृष्णचरण, संचालक, कोमरला समूह.
 

मागील दोन आठवड्यांत ब्रॉयलर्स पक्ष्यांना उच्चांकी दर मिळाला असून, या पुढील दिवसांत अनुकूल वातावरणामुळे पुरवठा वाढेल आणि बाजारभावात नरमाई येण्याची चिन्हे आहेत.

नाशिक विभागात शनिवारी (ता. १६) ९६ ते ९७ रुपये प्रतिकिलो दरम्यान ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. याबाबत नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, की पुरवठ्यात घट असल्यामुळे मागील आठवड्यात ब्रॉयलर मार्केटने १०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. चालू आठवड्यापासून बाजारात हळूहळू नरमाई येईल आणि ९० रुपयांच्या दरम्यान बाजार फिरू शकतो. तापमान घटले आहे. पक्ष्यांच्या वजनवाढीसाठी सध्याचे थंड वातावरण अनुकूल ठरेल. एकूणच मागील दोन आठवडे हे मार्केटसाठी स्वप्नवत तेजीचे होते. रमजान ईद, दीर्घ सुटीचा आठवडा आणि थंड वातावरणामुळे किरकोळ खपात जोरदार वाढ झाली. त्याने बाजाराला चांगला आधार दिला.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की दक्षिण भारतात ब्रॉयलर मार्केट ९२ ते ९५ या रेंजमध्ये फिरत आहे. रमजान ईदमुळे महाराष्ट्रातील खपात लक्षणीय सुधारणा होती. त्यामुळे बाजार ९० च्या वर टिकला. तथापि, आता सध्याच्या भाव पातळीवर अडथळा दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत खप थोडा मंदावला आहे. सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सहली-पर्यटनादी माध्यमातून होणारी मागणी कमी होईल. त्यामुळे बाजारात यापुढे नरमाईचा कल दिसू शकेल. तथापि, पक्ष्यांची वजने आजही नियंत्रणात असून, ही जमेची बाजू आहे.

मे महिन्यातील कडक उन्हातून तावून-सुलाखून निघालेल्या ब्रॉयलर्स पक्ष्यांच्या बॅचेसना जून महिन्यात किफायती बाजारभाव मिळाला आहे. लहान-मोठ्या सर्वच कंपन्या व ओपन फार्मर्सना या तेजीमुळे चांगला दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत बाजारभाव सातत्याने मंदीत होते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तेजी उशिरा सुरू झाली. मे आणि जून महिना मिळून साठ दिवसांतील सरासरी विक्री दर किफायती राहील. परिणामी, फेब्रुवारी - मार्चमधील नुकसान भरून निघाले आहे.

टेबल एग्जच्या दरातही सातत्यपूर्ण तेजी आहे. पुणे विभागात शनिवारी (ता. १६) ४१९ रुपये प्रतिशेकडा दराने लिफ्टिंग झाले. मागील आठवडाभरात चार टक्क्यांनी बाजार सुधारला. हॅचिंग एग्जचे भाव दोन रुपयांनी तुटले तर चिक्सचे भाव मात्र दोन रुपयांनी वधारले आहेत. श्रावणात निघाणाऱ्या प्लेसमेंटच्या वेळी चिक्सचे दर २५ रुपयांपर्यंतच्या पातळीवर नरमण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यातील प्लेसमेंट ही आषाढी एकादशी आणि गुरुपाैर्णिमा या कमी खपाच्या कालावधीत येईल. त्यामुळे ओपन फार्मर्सनी प्लेसमेंट संतुलित ठेवावी, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
 

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ९६ प्रतिकिलो नाशिक
चिक्स ३२ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज १८ प्रतिनग मुंबई
अंडी ४१९ प्रतिशेकडा पुणे

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...