agriculture news in marathi, poultry analysis | Agrowon

सातत्यपूर्ण तेजीनंतर बाजारात नरमाई शक्य
दिपक चव्हाण
सोमवार, 18 जून 2018

सध्याच्या भावपातळीवरून यापुढे नरमाईचा कल दिसू शकेल. तथापि, पक्ष्यांची वजने आजही नियंत्रणात असून, ही जमेची बाजू आहे.
- कृष्णचरण, संचालक, कोमरला समूह.
 

मागील दोन आठवड्यांत ब्रॉयलर्स पक्ष्यांना उच्चांकी दर मिळाला असून, या पुढील दिवसांत अनुकूल वातावरणामुळे पुरवठा वाढेल आणि बाजारभावात नरमाई येण्याची चिन्हे आहेत.

नाशिक विभागात शनिवारी (ता. १६) ९६ ते ९७ रुपये प्रतिकिलो दरम्यान ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. याबाबत नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, की पुरवठ्यात घट असल्यामुळे मागील आठवड्यात ब्रॉयलर मार्केटने १०० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. चालू आठवड्यापासून बाजारात हळूहळू नरमाई येईल आणि ९० रुपयांच्या दरम्यान बाजार फिरू शकतो. तापमान घटले आहे. पक्ष्यांच्या वजनवाढीसाठी सध्याचे थंड वातावरण अनुकूल ठरेल. एकूणच मागील दोन आठवडे हे मार्केटसाठी स्वप्नवत तेजीचे होते. रमजान ईद, दीर्घ सुटीचा आठवडा आणि थंड वातावरणामुळे किरकोळ खपात जोरदार वाढ झाली. त्याने बाजाराला चांगला आधार दिला.

कोमरला समूहाचे संचालक कृष्णचरण म्हणाले, की दक्षिण भारतात ब्रॉयलर मार्केट ९२ ते ९५ या रेंजमध्ये फिरत आहे. रमजान ईदमुळे महाराष्ट्रातील खपात लक्षणीय सुधारणा होती. त्यामुळे बाजार ९० च्या वर टिकला. तथापि, आता सध्याच्या भाव पातळीवर अडथळा दिसत आहे. गेल्या दोन दिवसांत खप थोडा मंदावला आहे. सर्वत्र शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सहली-पर्यटनादी माध्यमातून होणारी मागणी कमी होईल. त्यामुळे बाजारात यापुढे नरमाईचा कल दिसू शकेल. तथापि, पक्ष्यांची वजने आजही नियंत्रणात असून, ही जमेची बाजू आहे.

मे महिन्यातील कडक उन्हातून तावून-सुलाखून निघालेल्या ब्रॉयलर्स पक्ष्यांच्या बॅचेसना जून महिन्यात किफायती बाजारभाव मिळाला आहे. लहान-मोठ्या सर्वच कंपन्या व ओपन फार्मर्सना या तेजीमुळे चांगला दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यांत बाजारभाव सातत्याने मंदीत होते. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तेजी उशिरा सुरू झाली. मे आणि जून महिना मिळून साठ दिवसांतील सरासरी विक्री दर किफायती राहील. परिणामी, फेब्रुवारी - मार्चमधील नुकसान भरून निघाले आहे.

टेबल एग्जच्या दरातही सातत्यपूर्ण तेजी आहे. पुणे विभागात शनिवारी (ता. १६) ४१९ रुपये प्रतिशेकडा दराने लिफ्टिंग झाले. मागील आठवडाभरात चार टक्क्यांनी बाजार सुधारला. हॅचिंग एग्जचे भाव दोन रुपयांनी तुटले तर चिक्सचे भाव मात्र दोन रुपयांनी वधारले आहेत. श्रावणात निघाणाऱ्या प्लेसमेंटच्या वेळी चिक्सचे दर २५ रुपयांपर्यंतच्या पातळीवर नरमण्याची शक्यता आहे. चालू आठवड्यातील प्लेसमेंट ही आषाढी एकादशी आणि गुरुपाैर्णिमा या कमी खपाच्या कालावधीत येईल. त्यामुळे ओपन फार्मर्सनी प्लेसमेंट संतुलित ठेवावी, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
 

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ९६ प्रतिकिलो नाशिक
चिक्स ३२ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज १८ प्रतिनग मुंबई
अंडी ४१९ प्रतिशेकडा पुणे

 

टॅग्स

इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याच्या मागणीत वाढ; दरही...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादेत बटाटा प्रतिक्‍विंटल १००० ते...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
जळगावात डाळिंब प्रतिक्विंटल २००० ते...जळगाव ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत वांग्याला प्रतिक्विंटल १५०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
राज्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ५०० ते...पुण्यात प्रतिक्विंटल १००० ते २५०० रुपये पुणे ः...
जळगाव जिल्ह्यात मूग, उडदाच्या दरात...जळगाव : जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २७०० ते...अकोला ः सोयाबीन हंगाम या भागात जोमाने सुरू...
पितृपक्षामुळे नाशिकला पालेभाज्यांना...नाशिक : पितृपंधरवडा, सर्वपित्री अमावास्या,...
जळगावमधून प्रतिदिन २२०० टन केळीची...जळगाव ः जिल्ह्यात कांदेबाग केळीची आवक सुरू झाली...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दरांमध्ये...पुणे ः पावसाने दिलेल्या माेठ्या खंडामुळे...
परभणीत टोमॅटो प्रतिक्विंटल ५०० ते ७००...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
सांगलीत गूळ प्रतिक्विंटल २७०० ते ३५३०...सांगली ः येथील बाजार समितीत गुळाची आवक कमी अधिक...
अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २८०० ते...अकोला ः या मोसमातील सोयाबीनचा हंगाम सुरू होताच...
गणेशोत्सवात फुलांची ८ कोटी २३ लाखांची...पुणे ः यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात पुणे बाजार...