agriculture news in marathi, poultry food shortage due to strike, Maharashtra | Agrowon

वाहतूकदारांच्या संपामुळे कोंबड्यांची उपासमार
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 जुलै 2018

पुणे : वाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा पोल्ट्री खाद्य वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. खासकरून, खाद्यासाठी लागणाऱ्या सोया ढेपेच्या गाड्या फीडमीलपर्यंत पोचू न शकल्यामुळे खाद्यटंचाई निर्माण झाली आहे. 

अनेक पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांची उपासमार सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे. गेल्या सात दिवसांपासून वाहतूकदारांचा संप सुरू आहे. सुरवातीचे चार दिवस संपाचा फटका बसला नाही. मात्र, त्यानंतर सोया ढेपेच्या गाड्या येणे बंद झाल्यामुळे खाद्यनिमिर्ती कारखान्यांची चाके थंडावली आहेत. 

पुणे : वाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा पोल्ट्री खाद्य वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. खासकरून, खाद्यासाठी लागणाऱ्या सोया ढेपेच्या गाड्या फीडमीलपर्यंत पोचू न शकल्यामुळे खाद्यटंचाई निर्माण झाली आहे. 

अनेक पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांची उपासमार सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे. गेल्या सात दिवसांपासून वाहतूकदारांचा संप सुरू आहे. सुरवातीचे चार दिवस संपाचा फटका बसला नाही. मात्र, त्यानंतर सोया ढेपेच्या गाड्या येणे बंद झाल्यामुळे खाद्यनिमिर्ती कारखान्यांची चाके थंडावली आहेत. 

या संदर्भात, पुणे येथील ओम चिक्स इंडिया कंपनीचे चेअरमन राजेंद्र थोरात म्हणाले, की पोल्ट्री खाद्यात मका आणि सोयामील यांचा 80 टक्के वाटा असतो. त्यातील मका स्थानिक पातळीवर उपलब्ध होवू शकतो, मात्र सोया ढेप ही इंदूर किंवा धुळ्यासारख्या लांबवरच्या प्रोसेसिंग प्लांटवरून येत असते. येथून सोया ढेपेची पोच मिळण्यास दोन दिवस, त्यानंतर खाद्य तयार होण्याच्या प्रक्रियेत दोन दिवस आणि ते खाद्य पोल्ट्री फार्ममध्ये पोचवण्यासाठी एक दिवस, पाच-सहा दिवसांची प्रक्रिया असते. सध्या हे चक्र ढप्प झाले असून, संप मिटल्यानंतही पुढील पाच दिवसांत खाद्याची मोठी चणचण भासणार आहे.

पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि सांगली हे महाराष्ट्रातील पोल्ट्रीचे प्रमुख विभाग आहेत. त्यापैकी पुणे आणि सांगली विभागात बाहेरील जिल्ह्यातून मक्याची आवक होते, तर सोया ढेपेसाठी सर्वस्वी धुळे आणि इंदूर येथील मार्केटवर पोल्ट्री उद्योग अवलंबून आहे.

पोल्ट्री, पशुखाद्य आणि तेलबिया गाळपाशी संबंधित सर्व संघटनांनी तातडीने सरकारशी बोलून संपावर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सध्या ब्रॉयलर पोल्ट्री उद्योग मंदीच्या तडाख्यात सापडला असून, त्यात खाद्यटंचाई निर्माण झाली आणखी अडचणी वाढतील, असे नाशिकस्थित पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके यांनी म्हटले आहे.

धुळे येथील महाराष्ट्र ऑइल एक्स्ट्रॅक्शन प्रा. लि.चे मनोज अग्रवाल म्हणाले, की पोल्ट्री फीडमिलपर्यंत सोया ढेप पोचवण्यासाठी वाहने उपलब्ध होत नाहीत. दैनंदिन पातळीवर सोयाबीन गाळप करून सोया ढेपे पाठवली जाते. संपामुळे आता सोया ढेपेचा अतिरिक्त साठा निर्माण होत असून, तो ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नाही. यामुळे गाळप प्लॅंट बंद ठेवण्याशिवाय पर्याय दिसत नाही.

इतर अॅग्रो विशेष
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
शेतीसह शिक्षणाबाबतही जागरूक सावखेडाखुर्दसावखेडा खुर्द (ता. जि. जळगाव) या बागायती...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...
बांबू उद्योगात भारताला स्वयंपूर्ण...मुंबई: कागद, कागदाचा लगदा, वस्त्र या विविध...
लाँग मार्च पोलिसांनी रोखला; आज कूच...नाशिक: मागील वर्षी मार्च महिन्यात अखिल भारतीय...
चटका वाढल्याने उन्हाळ्याची चाहूलपुणे : राज्यातील थंडी कमी होऊन उन्हाचा चटका...
निविष्ठांबाबत शासन कठोर: चंद्रकांत...पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना खते, बियाणे,...
हमीभावाने कापूस खरेदीत केंद्राचा हात...जळगाव ः कापूस बाजारात हवी तशी तेजी नसल्याचे...
मराठवाड्यातील भूजल रसातळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील भूजलाची पातळी झपाट्याने...
आर्थिक स्थैर्याचे अनुकरणीय मॉडेलराज्यातील शेतीमधील समस्यांची यादी केली तर ती खूप...
पॉलिहाउस शेडनेट नायकांची करुण कथाउच्च तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीत भरघोस नफा...
पाणी व्यवस्थापनासाठी सूक्ष्मजीवांचा...पाणी व्यवस्थापन म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर ठिबक...
शिवरायांच्या आदर्शावर राज्य कारभार सुरू...पुणे : ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
वनक्षेत्राने वेढलेल्या भागामध्ये...कृषी क्षेत्रानजीक वनक्षेत्र असलेल्या परिसरामध्ये...
चारा छावण्या लांबणीवरमुंबई: राज्यात दुष्काळ तीव्र होत चालला असला...
विदर्भात वादळी पावसाची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ होत...
खरीप पीकविमा परतावाप्रश्नी उच्च...परभणी: परभणी जिल्ह्यात २०१७ च्या खरिपातील...
शेतकरी आठवडे बाजारातून विस्तारताहेत...संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी...
मार्केटच्या अभ्यासातून गुलाब शेतीत...निमगाव (ता. राहाता) येथील हर्षल प्रभात पाटील या...