agriculture news in marathi, poultry market rate, broilers | Agrowon

ब्रॉयलर्सचा बाजार उंचावला, अनपेक्षितरीत्या तेजी
दीपक चव्हाण
सोमवार, 4 डिसेंबर 2017

सध्या अति वजनाचा माल बाजारात शिल्लक नाही. सध्याचे वातावरणदेखील पक्ष्यांच्या वाढीसाठी अनुकूल नाही. पुरवठा संतुलित राहत असल्याने बाजार उंचावला आहे.
- डॉ. अनिल फडके, नाशिक.

पुणे : आठवड्याच्या शेवटी (शनिवार, ता. 2 डिसेंबर) बेंचमार्क नाशिक विभागात प्रतिकिलो ७३ रुपये दराने ब्रॉयलर पक्ष्यांचे ' फार्म लिफ्टिंग' झाले. आठवडाभरात ६० रुपयांवरून ७३ ते ७४ रुपयांपर्यंत बाजार उंचावला आहे. या दरम्यान खाण्याच्या अंड्यांच्या बाजारात मात्र उच्चांकी पातळीवरून घसरण सुरूच आहे. पुणे विभागात शनिवारी ४२० रुपये प्रतिशेकडा दराने फार्म लिफ्टिंग झाले. आठवडाभरात दहा टक्क्यांनी बाजार नरमला आहे, तर उच्चाकांवरून तीस टक्क्यांनी बाजारात घसरण झाली.

ब्रॉयलर्सच्या बाजारासंदर्भात नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, "ऑक्टोबरमध्ये बाजारात मंदी होती. नोव्हेंबरमध्ये मार्गशीर्षचा प्रभावामुळे सर्वांनी बाजारात नरमाई गृहीत धरली होती. परंतु बाजाराने चांगली सुधारणा नोंदवली आहे. सध्या अति वजनाचा माल बाजारात शिल्लक नाही. सध्याचे वातावरणदेखील पक्ष्यांच्या वाढीसाठी अनुकूल नाही. गेल्या महिन्यात थंडीमुळे पक्ष्यांच्या वाढीसाठी जशी अनुकूलता होती, तशी ती आता नाही. शेजारील गुजरात-मध्य प्रदेशाकडून बाजाराला आधार मिळतोय. रविवारी दत्तजयंतीमुळे खप कमी होता. मात्र, पुढील खालात मार्गशीर्ष समाप्तीनंतर नाताळ, ३१ डिसेंबर असे खपाचे मोठे इव्हेंट आहेत. त्याने मालास उठाव मिळेल."

तज्ज्ञांच्या मते, दरवर्षी ब्रॉयलर्सची मागणी आठ ते दहा टक्क्यांनी वाढत असते. आधीच्या वर्षातील सरासरी विक्रीदरापेक्षा पुढील वर्षांतील दर नेहमी अधिक असतो. अशा परिस्थितीत मागणीत सुधारणा होताच बाजार किफायती पातळ्यांवर जातो. सद्यस्थिती मार्गशीर्ष महिना डोळ्यासमोर ठेऊन संतुलित पुरवठ्याचे नियोजन झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष अडचणीचा ठरतो म्हणून उत्पादन कमी ठेवले आहे. त्यामुळे पुरवठा नियंत्रित होताना दिसत असून, यापुढे बाजार किफायती राहण्यासारखी परिस्थिती आहे. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून पुढे खपामध्ये मोठी वाढ होईल. त्यामुळे काही अंशी सध्याचा माल 'होल्ड' होण्याची शक्यता दिसत आहे.

हॅचिंग एग्ज आणि चिक्सचे दर उच्चांकी पातळीवर स्थिर आहेत. ब्रॉयलर्सचा बाजार असाच उंचावत राहिला. या दोन्हींचे भाव तेजीतच राहतील. कच्च्या मालाच्या दरात खालील पातळीवरून सुधारणा झाली आहे. तथापि, गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक कमी दरात कच्चा माल सध्या उपलब्ध आहे. यामुळे आजघडीला ज्यांच्याकडे स्वत:चे ब्रिडर्स आहेत ते इंटिग्रेटर्स शेतकरी व लेअर्स उत्पादकांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत किफायती मार्जिन मिळत आहे.

श्रावणाप्रमाणेच ऐन मार्गशीर्ष या कमी खपाच्या महिन्यामध्ये ब्रॉयलर्सच्या बाजारात अनपेक्षितरीत्या सुधारणा दिसली आहे. गेल्या आठवडाभरात बाजार तब्बल वीस टक्क्यांनी वधारला. दुसरीकडे अंड्यांच्या बाजारात दहा टक्क्यांची घट झाली आहे.
 

प्रकार भाव परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर ७३ प्रतिकिलो नाशिक
अंडी ४२० प्रतिशेकडा पुणे
चिक्स ४२ प्रतिनग पुणे
हॅचिंग एग्ज ३३.५० प्रतिनग मुंबई
मका १२५० प्रतिक्विंटल सांगली
सोयामिल २२३०० प्रतिटन इंदूर

 

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...