ऑक्टोबर हीटमुळे वाढली विक्री, बाजार नरमला
दिपक चव्हाण
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

पुणेः गेल्या आठवड्यापासून वातावरणातील चढ-उतार आणि वाढत्या आर्द्रतेमुळे ब्रॉयलर पक्ष्यांची उत्पादकता घटत असल्याने विक्रीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी बाजार आठवडाभरात प्रतिकिलोमागे चार रुपयांनी नरमला आहे.

पुणेः गेल्या आठवड्यापासून वातावरणातील चढ-उतार आणि वाढत्या आर्द्रतेमुळे ब्रॉयलर पक्ष्यांची उत्पादकता घटत असल्याने विक्रीचे प्रमाण वाढले आहे. परिणामी बाजार आठवडाभरात प्रतिकिलोमागे चार रुपयांनी नरमला आहे.

नाशिक विभागात रविवारसाठी ६८ रु. प्रतिकिलो भावाने ब्रॉयलर पक्ष्यांचे फार्म लिफ्टिंग झाले. सध्या ऑक्टोबर हीटमुळे पक्ष्यांची उत्पादकता कमी झालेली दिसते. रात्री २० अंश सेल्सिअस ते दुपारच्या वेळेस ३५ अंशांपर्यंत तापमानात चढ-उतार होत आहे. ज्या वेळी तापमानातील फरक दहा अंशांपेक्षा वाढतो, त्यावेळी खाद्य खाऊन वजनाचा रेशो (एफसीआर) बिघडतो. अशा वेळी तोटा कमी करण्यासाठी शेतकरी आहे तो माल विक्री करण्यावर भर देतात. गेल्या आठवड्यात या पद्धतीने विक्री झाल्यामुळे बाजार नरमला.

‘‘बाजारात फार मोठ्या वजनाचे पक्षी नाहीत. सध्याच्या विक्रीमुळे पुढील काळात पुरवठा आणखी कमी झालेला दिसेल. शिवाय शेजारी राज्यांत ७० रु. प्रतिकिलोच्या वर बाजारभाव आहेत. त्यामुळे चालू आठवड्यात बाजारात सुधारणा अपेक्षित आहे,’’ असे खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीरकर यांनी सांगितले.

‘‘सध्या परीक्षांचा कालावधी सुरू असून, संस्थात्मक मागणी थोडी कमी आहे. रविवारी (ता. ८) संकष्टी चतुर्थी आल्यामुळे नेहमीच्या रविवारच्या तुलनेत चिकनचा खप कमी प्रमाणात झाला आहे. पुढे सुट्या सुरू झाल्यानंतर किरकोळ व संस्थात्मक खपात वाढ अपेक्षित आहे,’’ असे ते म्हणाले.

सध्याची प्लेसमेंट ही मार्गशीर्ष सुरू झाल्यावर बाजारात येईल. त्यावेळी थंडीमुळे चिकनच्या खपात सुधारणा झालेली दिसेल. सध्या हॅचिंग एग्ज आणि एका दिवसाच्या पिलांचे (चिक्स) भाव उच्चांकी पातळीवर स्थिर आहेत. मका, सोयामिलचे दर नरमल्याने खाद्यावरील खर्च कमी झाला असला तरी चिक्सच्या भाववाढीमुळे एकूण उत्पादन खर्च फार कमी झालेला नाही. दीर्घकाळानंतर खाण्याच्या अंड्यांच्या बाजारात सुधारणा झाली आहे. मागील आठवड्यात बाजार प्रतिशेकडा ३० रुपयांनी सुधारला आहे. 

‘‘दसरा सण बाजारभावाच्या दृष्टीने थोडा निराश करणारा होता. या काळासाठी झालेल्या उत्पादनवाढीने बाजारभावावर अंकुश ठेवला असून, त्याच उत्पादनवाढीचा प्रभाव मागील आठवड्यांवरही होता. सध्या महाराष्ट्रासह गुजरात आणि उत्तर भारतात बाजारभाव एकाच रेंजमध्ये आहे. पुढील पंधरवड्यात बाजाराची चाल सध्याच्याच भावपातळीत राहील. दिवाळी या सर्वाधिक खपाच्या आठवड्यात अतिरिक्त पुरवठा कमी होणे अपेक्षित आहे. दिवाळीनंतरचा बाजार आणखी आश्वासक वाटतो, त्यावेळी आजच्या तुलनेत बाजारभाव किफायती राहतील,’’ असे आणंद येथील पोल्ट्री उद्योजक अनुभाई पटेल यांनी सांगितले.

प्रकार भाव परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ६८     प्रतिकिलो     नाशिक
अंडी     ३८०     प्रतिशेकडा     पुणे
चिक्स     ४२ प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज ३२     प्रतिनग     मुंबई
मका     १५००     प्रतिक्विंटल     सांगली
सोयामिल     २२,८००     प्रतिटन     इंदूर
 

        

    
 

 

इतर अॅग्रो विशेष
निशिगंध लागवड तंत्रज्ञान निशिगंधाची फुले अत्यंत सुवासिक व आकर्षक असतात....
बरसीम पीक लागवड बरसीम हे मेथीघासाप्रमाणे बहुगुणी वैरणीचे पीक आहे...
‘जीवनसंगिनी’ची प्रकाशवाटनैसर्गिक आपत्तींचा कहर आणि अनिश्चित बाजार अशा...
बीजी ३ च्या विनापरवाना विक्रीवर...मुंबई : तणनाशक सहनशील (हर्बिसाईड टाॅलरंट)...
रब्बी पिकांचे पाणी व्यवस्थापन महत्त्वाचेरब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात कापूस खरेदी २५ पासूननागपूर : राज्यात बुधवार (ता. २५) पासून पणन...
नेताओं की दिवाली, किसानों का दिवालादोन दिवसांपूर्वी मला अमरावती जिल्ह्यातील शेतकरी...
ऊसावरील कीडींचे एकात्मिक व्यवस्थापन तपशील : पूर्व मशागत     कीड...
वऱ्हाडातील प्रकल्पांची ‘तहान’ कायमअकोला  ः दिवाळीचे पर्व सुरू झाले; मात्र या...
शेतशिवारांत लवकरच 'ड्रायव्हर' विना...पुणे : सर्जा-राजाच्या परंपरेने चालणाऱ्या भारतीय...
कतृर्त्वाचे उजळले दीप घरची शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी. शिक्षण पूर्ण...
‘महाबीज’ करणार २७ जिल्ह्यांत बीजोत्पादनअकोला ः राष्ट्रीय कृषी विस्तार व तंत्रज्ञान...
एक चमचा तेलामुळे शोषली जातील हिरव्या...एक चमचा तेलाचा हिरव्या भाजीसोबत केलेला उपयोग,...
भाजीपाला प्रक्रियेतून उद्योगांना मिळेल...भाजीपाल्यापासून जास्तीत जास्त प्रक्रियायुक्त...
कोल्हापूर जिल्ह्यात सततच्या पावसाने...कोल्हापूर : सततच्या पावसामुळे पिकात पाणी साचून...
मका चारा पीक लगवड तंत्रज्ञान जनावरांच्या आहारात अत्यंत सकस, रूचकर चारा म्हणून...
मुहूर्तालाच खोडाकर्जमाफी शेतकऱ्यांच्या पदरात टाकण्यासाठीचा...
शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग,...पुणे ः ‘‘स्टार्चचे प्रमाण निम्म्यापेक्षा कमी...
उस पिकावरील कीड - रोगांचे नियंत्रणकीड नियंत्रण :  खोड कीड : किडीचा...
आधुनिक बळी जागा झालायदीपावली हा सण भारत वर्षात वेगवेगळ्या रूपात साजरा...