Agriculture News in Marathi, poultry scheme will be implemented, Said Minister of Animal Husbandry mahadev jankar, maharashtra | Agrowon

‘मागेल त्याला पोल्ट्री’ योजना राबविणार : पशुसंवर्धनमंत्री जानकर
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017
भंडारा  : मागेल त्याला शेततळे योजनेप्रमाणे मागेल त्याला पोल्ट्री व मागेल त्याला गोटफार्म योजना राबविणार अाहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दिली अाहे. 
 
पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने मानेगाव (बा.) येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे अायोजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
 
भंडारा  : मागेल त्याला शेततळे योजनेप्रमाणे मागेल त्याला पोल्ट्री व मागेल त्याला गोटफार्म योजना राबविणार अाहे, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसायमंत्री महादेव जानकर यांनी दिली अाहे. 
 
पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद व पंचायत समिती भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने मानेगाव (बा.) येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्याचे अायोजन करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.
 
या वेळी आमदार डॉ. परिणय फुके, ॲड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे, जिल्हा दुग्ध विकास सहकारी संस्थेचे अध्यक्ष रामलाल चौधरी, पंचायत समिती सभापती प्रल्हाद भुरे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सुरेश कुंभरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, मानेगावचे सरपंच प्रभाकर बोदेले अादी उपस्थित होते.
 
राज्यातील पशुसंवर्धन विभागात अनेक पदे रिक्त अाहेत. परंतु कामाचा व्याप पाहता विभागातील सर्व पदे भरण्यात येतील. त्यामुळे शेतीसोबत पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व मत्स्यशेतीकडे लक्ष घालून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उचावण्यावर भर देण्याचा शासनाचा निर्धार आहे. पशुपालकांना या विभागातील योजनांचा लाभ मिळण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन मंत्री जानकर यांनी केले.
 
भंडारा, गोंदिया व गडचिरोलीचा ‘नॅशनल डेरी डेव्हलपमेंट बोर्ड’मध्ये समावेश नव्हता. आता या तीनही जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल. पोल्ट्रीमध्ये २० लाखांत २ हजार कोंबड्या उपलब्ध करून देण्याची शासनाची योजना आहे.
 
बऱ्याच वेळी अंडी तयार करण्याचे सोडून कोंबडी विक्री करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आढळते. त्यामुळे योजनेचे स्वरूपच बदलते अशा प्रकारे काम करणाऱ्या पोल्ट्रीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे श्री. जानकर म्हणाले. या वेळी पशुपालक व कुक्कुटपालक शेतकऱ्यांचा प्रशस्तिपत्र व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...