agriculture news in marathi, poultry units will be set up in Yavatmal, maharashtra | Agrowon

यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार ८०० पोल्ट्री युनिट
टीम अॅग्रोवन
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा प्रशासन, कृषी समृद्धी प्रकल्प आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून ८०० शेतकऱ्यांना पोल्ट्री युनिट उभे करून दिले जाणार आहेत.

यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत त्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर उंचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा प्रशासन, कृषी समृद्धी प्रकल्प आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून ८०० शेतकऱ्यांना पोल्ट्री युनिट उभे करून दिले जाणार आहेत.

कोरडवाहू क्षेत्रात कापूस व सोयाबीन यांसारखी पारंपरिक पिके घेतली जातात. परंतु शेतीपूरक व्यवसायांचा अभाव असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. हे चित्र बदलावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे. त्याकरिता ८०० शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून पोल्ट्री युनिट उभे करून दिले जाणार आहेत. त्यासाठी कृषी समृद्धी प्रकल्प, टाटा ट्रस्ट यांच्याशी करार करण्यात आला आहे. पोल्ट्री युनिट उभे राहिल्यानंतर कोंबड्यांच्या विक्रीसाठी अमरावती येथील अमृता हॅचरीज सोबत करारही करून दिला जाणार आहे.

या पाच तालुक्‍यांत उभे राहणार युनिट
शेतकऱ्यांसाठीच्या या पोल्ट्री प्रकल्पात दहा कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात यवतमाळ, नेर, दारव्हा, घाटंजी, झरी या पाच तालुक्‍यांत हा प्रकल्प राबविण्यात येईल. जिल्ह्यातील आदिवासी महिलांकरिता ५०० कोंबड्यांचे एक युनिट याप्रमाणे ८०० युनिटची उभारणी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. यासाठी कृषी समृद्धी प्रकल्पातून ७० तर टाटा टस्ट्र २५ टक्‍के निधी देईल. पाच टक्‍के लाभार्थी हिस्सा राहणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
आर. आर. पाटील यांचे स्मारक युवकांना...सांगली   ः आर. आर. पाटील यांनी ग्रामविकास,...
जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज...जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने...
जमीन सुपीकतेसाठी सेंद्रिय कर्बाचे...जमिनीच्या सुपीकतेमध्ये सेंद्रिय कर्ब हे अत्यंत...
खानदेशात कांदा लागवड निम्म्याने...जळगाव : खानदेशात यंदा उन्हाळ कांद्याची लागवड...
सटाणा, मालेगावसाठी सोडणार चणकापूर...नाशिक : सटाणा व मालेगावला भेडसावणाऱ्या...
पुणे विभागात ४८ हजार हेक्टरवर कांदा...पुणे   ः पुणे विभागात आत्तापर्यंत ४८ हजार...
वीजदरवाढीचा शॉक, अनुदानाची फक्त घोषणाचजळगाव ः वस्त्रोद्योगाला चालना मिळावी, उद्योजकांचा...
महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक...कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या...
बुलडाणा जिल्ह्यात रब्बीची ५६ हजार...बुलडाणा  ः कमी व अनियमित पावसामुळे संपूर्ण...
कोल्हापुरात ऊसतोडणीसाठी यंदा पुरेसे मजूरकोल्हापूर  : गेल्या हंगामाच्या तुलनेत...
यवतमाळ जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा ः...वणी, जि. यवतमाळ   ः केंद्र व राज्यातील सरकार...
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी...नाशिक (प्रतिनिधी) : कुटुंबाच्या आर्थिक अडचणीच्या...
पीकनिहाय सिंचनाचे काटेकोर नियोजनपिकांच्या अधिक उत्पादकतेसाठी जमिनीची निवड, मुबलक...
नारळासाठी खत, पाणी व्यवस्थापननारळ हे बागायती पीक असल्यामुळे पुरेसे पाणी...
खानदेशात केळीच्या दरात सुधारणाजळगाव : केळीची आवक सध्या कमी असून, थंडी वधारताच...
नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यात...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील पंधरापैकी आठ तालुके...
‘निम्न दुधना’तून पाणी देण्याचे...परभणी : निम्म दुधना प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी...
सर्वसाधारण सभेचा सत्ताधाऱ्यांना धसकाजळगाव : जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा येत्या २८...
शेतकऱ्यांनी चारा पिकांवर भर द्यावा ः...पुणे  : नव्या वर्षाच्या सुरवातीलाच कृषी...
‘वनामकृवि’ तयार करणार दुष्काळी...परभणी  ः मराठवाड्यात उद्भलेल्या दुष्काळी...