agriculture news in Marathi, poultry weekly analysis, Maharashtra | Agrowon

जोरदार खपामुळे ब्रॉयलर्सचा बाजार वधारला
दिपक चव्हाण
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

यंदाची दिवाळी ब्रॉयलर पोल्ट्री उद्योगासाठी किफायती ठरली आहे. देशभरात दरवर्षी ब्रॉयलरच्या खपात होणारी सातत्यपूर्ण वाढ ही जमेची बाजू ठरत आहे.
- डॉ. अनिल फडके, पोल्ट्री उद्योजक, नाशिक

पुणे ः दिवाळीतील जोरदार खपामुळे बहुतांश शिल्लक माल निघून गेल्याने ब्रॉयलर्सचा बाजार वधारला आहे. अंड्यांचा बाजारही दीर्घ अवधीनंतर चांगल्या तेजीत स्थिरावला आहे. 

मागील आठवड्यात बेंचमार्क नाशिक विभागात ७६ रु. प्रतिकिलो दराने ब्रॉयलर कोंबड्यांचे लिफ्टिंग झाले. आधीच्या आठवड्याच्या तुलनेत बाजारभावात १५ टक्क्यांनी वाढ झाली. पुणे विभागात खाण्याच्या अंड्यांस प्रतिशेकडा ४०६ रु. लिफ्टिंग दर मिळाला. मागील आठवड्याच्या तुलनेत भावात १२ टक्क्यांनी वाढ झाली.

आनंद अॅग्रो समूहाचे व्यवस्थापक डॉ. मोहन गिरी म्हणाले, की दिवाळीपर्वात पक्ष्यांना विक्रमी मागणी होती. सणापूर्वी २.९ वजनाची सरासरी २.४ पर्यंत खाली आलीय. स्वाभाविकपणे बाजारभावात सुधारणा झाली. ६५ रु. प्रतिकिलोवरील बाजार ७८ रु. पर्यंत सुधारला. चालू महिनाअखेरपर्यंत जोरदार खपामुळे बाजारभाव किफायती राहील.

औरंगाबादस्थित खडकेश्वरा हॅचरिजचे संचालक संजय नळगीकर म्हणाले, की मागील दोन रविवार उपवसाचे होते. एक रविवारी संकष्टी तर दुसऱ्या रविवारी एकादशी आल्यामुळे खप मोठ्या प्रमाणावर रोडावला होता. या दोन्ही रविवारमुळे साचलेला माल दिवाळीच्या पर्वात निघून गेला आहे. दिवाळीपूर्वी साधारपणे चार दिवसांचा जादाचा शिल्लक होता, आता तो एका दिवसावर आला आहे. यापुढील काळात दिवाळीच्या सुट्यांमुळे संस्थात्मक मागणी चांगली राहणार आहे.  

गुजरात राज्यात दिवाळीनंतर पक्ष्यांना चांगली मागणी असते. त्यामुळे दिवाळीनंतरच बाजारभावात सुधारणा अपेक्षित होती, असे आणंद येथील पोल्ट्री उद्योजक अनुभाई पटेल यांनी सांगितले; तर महाराष्ट्रात दिवाळसण हा सर्वाधिक खपाचा असतो. सध्या तर मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने बाजारभावात आणखी तेजी दिसेल, असे नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके यांनी सांगितले. 

सध्या देशभरात प्रतिकिलो ७२ ते ७८ या दरम्यान बाजारभाव आहेत. राज्याराज्यातील बाजारभावात अधिकचा फरक नाही. सध्याची प्लेसमेंट ही मार्गशीर्ष महिन्यानंतर येईल. जोरदार मागणीमुळे एका दिवसांच्या पिलांचे भाव तेजीत आहेत. हॅचिंग एग्जचे दरही उच्चांकी पातळीवर आहेत. मका आणि सोयामिल या प्रमुख कच्च्या मालाचे दर वाजवी पातळीवर असले तरी पिलांच्या किमतींमुळे उत्पादन खर्च जैसे थे राहत असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

नोव्हेंबर महिन्यात मार्गशीर्षमुळे घरगुती मागणी सरासरीच्या तुलनेत कमी प्रमाणात असेल. अनुकूल वातावरणामुळे वजनेही चांगले येतील. या पार्श्वभूमीवर जर पुरवठा नियंत्रित आणि समतोल ठेवला तरच किफायती दर मिळतील, असे दिसते. 

प्रकार     भाव     परिमाण     बाजारपेठ
ब्रॉयलर     ७६     प्रतिकिलो     नाशिक
अंडी     ४०५     प्रतिशेकडा     पुणे
चिक्स     ४२     प्रतिनग     पुणे
हॅचिंग एग्ज  ३३     प्रतिनग     मुंबई
मका     १४८०     प्रतिक्विंटल     सांगली
सोयामिल     २२८००     प्रतिटन     इंदूर

 

इतर अॅग्रोमनी
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...
भात निर्यातीसाठी मागणीबरोबरच भूराजकीय...भारतीय भात निर्यातदारांच्या वाढीसाठी जागतिक...
मका, साखर, हळदीच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन...