agriculture news in Marathi, Poutry rates increased, Maharashtra | Agrowon

तीन महिन्यांनंतर परतली तेजी; बाजार उसळला
दिपक चव्हाण
सोमवार, 30 एप्रिल 2018

बाजारात अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली आहे. मागील दोन-तीन वर्षांत मे महिन्यात बाजारात सर्वाधिक उंच पातळीची नोंद झाली आहे.
- संजय नळगीरकर, संचालक, खडकेश्वर हॅचरीज, औरंगाबाद

जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ब्रॉयलर्सच्या बाजारभावात आलेली मरगळ झटकली गेलीय. बाजाराने ८० चा आकडा पार केला असून, यापुढेही तेजीत सातत्य राहण्याचे चित्र आहे. 

नाशिक विभागात शनिवारी (ता. २९) रोजी ८२ रु. प्रतिकिलोने ब्रॉयलर पक्ष्यांचे लिफ्टिंग झाले. मागील आठवड्याच्या तुलनेत बाजारभावात तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासंदर्भात नाशिक येथील पोल्ट्री उद्योजक डॉ. अनिल फडके म्हणाले, ‘‘कडक उन्हाळ्याच्या प्रभावामुळे ब्रॉयलर पक्ष्यांचा वजनरूपी पुरवठा घटला आहे. सध्या बाजारात मोठ्या पक्ष्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे चालू आठवड्यांतही तेजीमध्ये सातत्य राहील. गेल्या तीन महिन्यांच्या मंदीच्या पार्श्वभूमीवर बाजाराला या तेजीची खूप गरज होती. ज्या शेतकऱ्यांनी उत्पादनात सातत्य राखले आहे, त्यांना या तेजीचा नक्कीच फायदा होईल.’’

सप्तशृंगी अॅग्रोचे संचालक मनोज कापसे म्हणाले, ‘‘बाजारभावाच्या वरच्या पातळ्यांवर पुरवठा वाढल्यामुळे गुजरात आणि मध्य प्रदेशातील रेट्स महाराष्ट्राच्या समकक्ष आले आहेत. मात्र पुढील दोन दिवसांत पुरवठा कमी होऊन महाराष्ट्राच्या तुलनेत पुन्हा शेजारी राज्यातील बाजार उंचावेल. उत्तर भारतात ओपन फार्मर्सची संख्या अधिक आहे. त्यामुळे तेथे दीर्घकाळ मंदी टिकत नाही. कारण मंदीत संस्थात्मक क्षेत्राच्या तुलनेत ओपन फार्मर्सची तग धरून राहण्याची क्षमता कमी असते. या पार्श्वभूमवीर, मंदीसह उन्हाळ्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील बाजार यापुढे तेजीत राहण्याची अपेक्षा आहे.’’

बाजार सुधारला, पण... 
तज्ज्ञांच्या मते, बाजारभाव ८० रु. प्रतिकिलोच्या वर टिकला तरच तो किफायती आहे, असे म्हणता येईल. कारण सध्याच्या प्रतिकूल तापमानात ब्रॉयलर पक्षी टिकाव धरत नसून, सरासरी १५ ते २० टक्क्यांपर्यंत वजनरूपी उत्पादकता घटली आहे. यामुळे स्वत:चे ब्रीडर्स असलेल्या इंटिग्रेटर्सचा प्रतिकिलो उत्पादन खर्च ६५ रु. वर पोचला आहे. ओपन फार्मर्स आणि नॉन ब्रीडर्स इंटिग्रेटर्सचा प्रतिकिलो खर्च तर अनुक्रमे ७० आणि ७५ रु. च्या वर पोचला आहे. अशा परिस्थितीत जर ब्रॉयलर्स पक्ष्यांना प्रतिकिलो ८० रु. दर मिळत असला तरी तो किफायती नाही, असे म्हणावे लागेल.

खडकेश्वर हॅजरिचे संचालक संजय नळगीरकर यांची निरीक्षणे पुढीलप्रमाणे : बाजारात अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली आहे. चालू पंधरवड्यात बाजारभाव किफायती राहण्याची अपेक्षा आहे. १५ मेपासून अधिक मासारंभ आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच अधिक मासात उपवास पाळले जातात. मासांहारी पदार्थांचा खप कमी होतो. ही बाब लक्षात घेऊन पोल्ट्री उद्योगाने संतुलित पुरवठ्याचे नियोजन केले आहे. दरवर्षी मेचा पहिला आठवडा बाजारभावाच्या दृष्टीने किफायती असतो. मागील दोन-तीन वर्षांत मे महिन्यात बाजारात सर्वाधिक उंच पातळीची नोंद झाली आहे.

मागील आठवड्यात हॅचिंग एग्जचे दर दोन रुपयांनी कमी झाले, तर एका दिवसाच्या पिलाचे (चिक्स) दर स्थिर होते. अंड्यांच्या (टेबल एग्ज) दरात वर्षातील नीचांकी पातळीवरून दहा टक्क्यांची सुधारणा झाली आहे.
 

प्रकार     भाव    परिमाण बाजारपेठ
ब्रॉयलर   ८२   प्रतिकिलो   नाशिक
चिक्स   ३५     प्रतिनग   पुणे
हॅचिंग एग्ज  २५.५  प्रतिनग मुंबई
अंडी    ३१५     प्रतिशेकडा   पुणे

    
    
   
          
 
 

इतर अॅग्रोमनी
कापसाच्या किमतीत आणखी सुधारणानिवडणुकीमुळे पुढील दोन महिने बहुतेक पिकांच्या...
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसंबंधी तयारी...जळगाव ः जिल्ह्यात शासकीय हरभरा खरेदीसंबंधीची...
सेंद्रिय उत्पादनातून आठ वर्षात तीन...आधी शिक्षण, बहुराष्ट्रीय बॅंकेतील नोकरी यामुळे...
सुधारित जोडओळ पद्धतीमुळे कपाशीतून...सोगोडा (जि. बुलढाणा) येथील विजय पातळे या कपाशी...
कापसाच्या निर्यात मागणीत वाढीची शक्यताया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने सोयाबीन व...
कापूस, हळद, हरभऱ्याच्या भावात वाढया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका,...
बांबू व्यापाराला चांगली संधीयेत्या काळात राज्यातील बांबूचा व्यापार वाढवायचा...
भारतातील पाच कडधान्यांच्या हमीभावावर...वॉशिंग्टन : भारतात पाच कडधान्यांना दिल्या...
भारतीय चवीच्या चॉकलेटची वाढती बाजारपेठकार्तिकेयन पलानीसामी आणि हरीश मनोज कुमार या दोघा...
सुधारित पट्टापेर पद्धतीने वाढले एकरी ३१...पारंपरिक पद्धतीने सोयाबीन तूर हे आंतरपीक अनेक...
चीन, अमेरिकेचे कापूस उत्पादन पुढील...जळगाव : देशात ३१ जानेवारीअखेर सुमारे १८० लाख...
कापूस, गवार बी आणि हरभऱ्याचे भाववाढीचे...या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने साखर वगळता...
हरभरा निर्यात, स्थानिक मागणीत वाढ या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने मका व गहू...
सीताफळाच्या मूल्यवर्धनातून घेतला...`उद्योगाच्या घरी, रिद्धीसिद्धी पाणी भरी`, अशी...
कापसाच्या भावात घसरणया सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने गहू वगळता...
हलव्याच्या कार्यक्रमाने अर्थसंकल्पाची...नवी दिल्ली : नवीन वर्षाची सुरवात झाली की...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
कृषिमालाच्या मूल्यवर्धनालाच खरे भविष्य...२०१८ मध्ये डॅनफॉस इंडिया या कंपनीने उत्तम असा...
वनशेतीसह आंतरपिके ठरतोय फायद्याचा सौदाशाश्वत उत्पादनासाठी पारंपरिक पिकांसोबत वनशेतीचा...
हरभऱ्याला वाढती मागणी या सप्ताहात गेल्या सप्ताहाच्या तुलनेने कापूस, गहू...