agriculture news in Marathi, power connection cost will refund | Agrowon

‘महावितरण’कडून वीजजोडणी खर्चाचा परतावा मिळणार : होगाडे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

मुंबई : वीजजोडणीसाठी ग्राहकांनी भरलेल्या रकमा किंवा स्वतः केलेल्या खर्चाचा परतावा ‘महावितरण’कडून देण्यात येणार आहे. ही रक्कम सुमारे पावणेचारशे कोटी रुपये असल्याचे ‘महावितरण’ने म्हटले असून, गेल्या दहा वर्षांच्या व्याजासह या रकमा परत करण्यात येणार असल्याने ही रक्कम सातशे कोटींपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. २००५ नंतर अशा रकमा भरलेल्या सर्व ग्राहकांना वीजबिलांमधून या रकमा वळत्या करून देण्यात येणार आहेत.

मुंबई : वीजजोडणीसाठी ग्राहकांनी भरलेल्या रकमा किंवा स्वतः केलेल्या खर्चाचा परतावा ‘महावितरण’कडून देण्यात येणार आहे. ही रक्कम सुमारे पावणेचारशे कोटी रुपये असल्याचे ‘महावितरण’ने म्हटले असून, गेल्या दहा वर्षांच्या व्याजासह या रकमा परत करण्यात येणार असल्याने ही रक्कम सातशे कोटींपेक्षा जास्त जाण्याची शक्यता आहे. २००५ नंतर अशा रकमा भरलेल्या सर्व ग्राहकांना वीजबिलांमधून या रकमा वळत्या करून देण्यात येणार आहेत.

नवी वीजजोडणी देताना विजेचे खांब उभारणे, वीजवाहिन्या टाकणे किंवा अन्य कामांसाठी निधी नसल्याचे सांगून ‘महावितरण’ने ग्राहकांकडूनच त्याचा खर्च घेतला होता. त्यामध्ये ओआरसी (आउटराइट काँट्रिब्युशन चार्जेस), एसएलसी (सर्व्हिस लाइन चार्जेस) आणि मीटरच्या किमतीचा समावेश होता. महावितरणने ग्राहकांकडून वसूल केलेल्या या रकमांच्या विरोधात महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेने राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका सादर केली होती. 

यावर २००७ मध्ये आयोगाने निकाल दिला आणि संबंधित सर्व ग्राहकांना या रकमांचा व्याजासह परतावा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, महावितरणच्या वतीने या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली होती. अखेर, सुप्रीम कोर्टानेही त्याच निकालावर शिक्कामोर्तब केले आहे. दहा वर्षांच्या या न्यायालयीन लढाईमुळे ग्राहकांना अंदाजे आठशे ते नऊशे कोटी रुपयांचा परतावा मिळेल, असे संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी म्हटले आहे.

इतर अॅग्रो विशेष
औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय सुक्ष्म...औरंगाबाद : औरंगाबाद येथे आयोजित नवव्या...
शेतीपूरक उद्योगातून बचत गट झाले सक्षमचिखली (जि. बुलडाणा) येथील हिरकणी महिला उत्कर्ष...
गोरक्षणासोबतच जपला व्यसनमुक्‍तीचा वसालाठी (ता. मंगरुळपीर, जि. वाशीम) येथील दिलीप बाबा...
अप्रमाणित रोपांमुळे ‘फेल' बागांवर...पुणे : दुष्काळात जीवापाड जपलेल्या बागा अप्रमाणित...
सोयाबीन दराचा आलेख चढताच; लातूरला ३८११...लातूर : येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार...
धान उत्पादकांना बोनस कधी?नागपूर : लगतच्या छत्तीसगड राज्याच्या तुलनेत...
उत्तर भारतात थंडी कायमश्रीनगर : जम्मू-काश्‍मीर, पंजाब, हरियाना व हिमाचल...
राज्यात थंडी झाली कमीपुणे : राज्यात अपवाद वगळता सर्वच ठिकाणच्या किमान...
बांधावर फुलवा ‘हिरवं सोनं’ण्याचा अभाव, मजूरटंचाई, मजूर व निविष्ठांचे...
आधुनिक सेवेसोबत ग्राहकांना हवा विश्‍वास संपूर्ण जगात अग्रेसर असलेल्या आधुनिक बॅंकिंग...
'शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय लवकरच...नवी दिल्ली  : समस्याग्रस्त शेती क्षेत्र आणि...
नंदुरबार, धुळ्यात पपई काढणी बंदनंदुरबार  : पपईच्या दरावरून शेतकरी, व्यापारी...
...त्या दिवशी घरातलं कुणी जेवलं नायसुपे, जि. पुणे : एकच बैल होता. चितऱ्या...
किमान तापमानात वाढ होण्याची शक्यतापुणे  : राज्याच्या किमान तापमानात वाढ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला जगात...पुणे - द टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर...
पीक फेरपालटीवर भर देत श्रीमंती केळीचे...कलाली (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथील योगेश व मनोज...
बळिराजाच्या हाती पुन्हा ‘लोखंड्या नांगर’गणूर, जि. नाशिक : शेतमालाला मिळणारे कवडीमोल भाव,...
दराच्या प्रतीक्षेतील कांद्याला फुटले...वडेल, जि. नाशिक :  आज ना उद्या दर वाढला, की...
पोटदुखीवर कडू कंद उपयुक्त कडू कंद ही वेलवर्गीय वनस्पती असून...
शिरूर ठरले मुगासाठी हक्काची बाजारपेठपुणे जिल्ह्यात शिरूर बाजार समिती ही मुगासाठी...