कृषिपंपांना वीजजोडणी देणार

कृषिपंपांना वीजजोडणी देणार
कृषिपंपांना वीजजोडणी देणार

मुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील कृषिपंपांच्या जोडणीचा प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या दृष्टीने सन २०१५-१६ आणि २०१६-१७ जानेवारीपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील ८९ हजार ५०६ कृषिपंपांना वीजजोडणी देण्यात आल्यानंतर आता वर्षभरात ८०,७२९ कृषिपंपांची जोडणी करण्यात येणार आहे. वीज जोडण्याच्या कामासाठी महावितरण कंपनीला आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याच्या महावितरणच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंगळवारी (ता.१०) मंजुरी दिली.

या दोन्ही क्षेत्रात कृषिपंप जोडणीची कामे महावितरण करणार असून विशेष योजनेकरिता सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात कृषी पंप प्रादेशिक असमतोल दूर करणे यासाठी ९१६.२० कोटीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. यापैकी रु. ४२१ कोटीची तरतूद उपलब्ध आहे. या विशेष योजनेसाठी सन २०१७-१८ या वर्षाकरिता आणखी आवश्यक असलेला ४९५.४६ कोटी हा अतिरिक्त निधी देण्याची मागणी ऊर्जा विभागाने केली होती या मागणीला मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

महावितरण २०१६-१७ या वर्षाकरिता विदर्भ मराठवाड्यातील कृषिपंप जोडणीसाठी ९१६.२० कोटींची मागणी केली होती. २०१७-१८ साठी ४२१ कोटी अर्थसंकल्पात तरतूद करून मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर महावितरण कंपनीस वितरित करण्यात येतील. उर्वरित ४९५.४६ कोटी रुपये अतिरिक्त नियतव्यय मंजूर करण्यात येणार आहेत. राज्यात मार्च २०१७ अखेर २ लाख ५ हजार ५९० अर्जदारांनी कृषिपंप वीजजोडणीसाठी पैसे भरले आहेत. त्या शेतकऱ्यांना वीज जोडण्या देण्यात येतील.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com