agriculture news in marathi, Power crisis due to faulty distribution: Sharma | Agrowon

सदोष वितरणामुळेच विजेचे संकट : शर्मा
टीम अॅग्रोवन
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

महानिर्मितीच्या कोराडी वीज केंद्राकडे मुबलक कोळसा आहे. मात्र, तो निकृष्ट दर्जाचा असल्याने क्रशरमध्ये बारीक पावडर होत नाही. त्यामुळे तो कोलयार्डातच बारीक करून पुन्हा क्रशिंगसाठी पाठवला जातो. त्यामुळे वेळ व पैशाचा अपव्यय होतो. उत्पादन खर्च वाढतो.  नाशिकच्या एका संचाचा कोळसा खासगी कंपनीला ८ महिन्यांच्या कालावधीसाठी वळविण्यात आला. तो करार ३० सप्टेंबरला संपला आहे. आता तो कोळसा पुन्हा नाशिकला आला पाहिजे. यासाठी आग्रह धरला जाईल.
- मोहन शर्मा, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशन

नाशिक : राज्यातच नव्हे तर देशभरात कोळशाचा साठा मुबलक आहे. मात्र, कोल इंडियाच्या वितरण प्रणालीत दोष असल्याने कोळशाची टंचाई निर्माण होत आहे. त्यामुळे महानिर्मितीच्या वीज केंद्रांना वेळेत व पुरेसा कोळसा मिळत नाही. महानिर्मितीचे वीज केंद्र सक्षम असूनही केवळ कोळशाअभावी वीजनिर्मितीत वारंवार अडचणी निर्माण होऊन नागरिकांना भारनियमनाला सामोरे जावे लागत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य वीज वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष व जागतिक कामगार संघटनेचे सचिव मोहन शर्मा यांनी दिली.  

नाशिक येथे आयोजित कार्यक्रमात शर्मा आले होते. ते म्हणाले, ‘‘सध्याच्या सरकारचे धोरण सरकारीपेक्षा खासगी उद्योगांचे भले करण्याचे आहे. सरकारी वीज केंद्रांना कमी व खासगी वीज उद्योगाला जास्त प्रमाणात कोळसा पुरविला जातो. त्यामुळे विजेचे दर वाढतील व सर्वसामान्यांना ते परवडणार नाहीत. २ आॅक्टोबर २०१८ रोजी वीज वापराच्या स्पॉट मार्केटमध्ये नोंदवलेल्या पॉवर टेरिफनुसार एका युनिटचा विजेचा दर १८ रुपये झाला आहे. या दिवशी विजेच्या ट्रेडिंगमध्ये या किमतीनुसार २७४ मिलियन युनिट्स विजेची विक्री करण्यात आली. या टेरिफ रेटने मागील १० वर्षांचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत, असे इंडियन एनर्जी एक्स्चेंजतर्फे जाहीर झाले आहे, असे शर्मा म्हणाले. या वेळी केंद्रीय पदाधिकारी विश्राम धनवटे, विनायक क्षीरसागर, हरिभाऊ सोनवणे, ज्योती नटराजन, प्रताप भालके आदी उपस्थित होते.

मोठ्या प्रमाणावर भारनियमन

सद्यःस्थितीत स्थापित क्षमतेच्या ७०० ते ८०० मेगावॉट विजेची कमतरता आहे. येत्या काही दिवसांत विजेची मागणी २३ हजार मेगावॉटपर्यंत जाण्याची शक्यता आहे. वीजनिर्मिती व वितरण यातील तूट भरून काढण्यासाठी उपाय न केल्यास भारनियमनाला सामोरे जावे लागेल, असेही शर्मा म्हणाले.

इतर बातम्या
खानदेशात दुष्काळ निवारणात अडचणीजळगाव : दुष्काळी व पिण्याच्या पाण्याची तीव्र...
सरपंच परिषदेची ताकद दाखवू नगर  ः सरकार शहरांचे पोषण करण्यासाठी...
संत्रा, मोसंबी बागांचे नव्याने सर्वेक्षणनागपूर : जिल्ह्यातील काटोल, नरखेड व कळमेश्‍वर...
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
‘अक्कलपाडा’चे पाणी न पोचल्याने...धुळे : अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत...
नानेगावकरांचा ग्रामसभेतून प्रस्तावित...नाशिक : नाशिक पुणे प्रस्तावित रेल्वे महामार्ग...
सोलापूर जिल्ह्यातील खरीप नुकसानीपोटी ३८...सोलापूर : खरीप हंगामातील नुकसानीपोटी जिल्ह्यातील...
नाशिकच्या धरणांत अवघा ४५ टक्के जलसाठानाशिक : यंदा कमी झालेल्या पावसामुळे धरणातील...
द्राक्ष बागा जगविण्यासाठी शेतकऱ्यांची...पांगरी, जि. सोलापूर : बार्शी तालुक्यातील पूर्व व...
नागालँड राज्य बँक राबविणार पुणे जिल्हा...पुणे ः शेती, शेतीपूरक व्यवसायासाठी पुणे जिल्हा...
सातारा जिल्ह्यात ऊस गाळप वेगातसातारा ः जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात सुरू...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
पुणे विभागात दहा लाख हेक्टर क्षेत्र...पुणे ः पाणी टंचाईमुळे रब्बीच्या पेरण्यांच्या...
शेतकरी सन्मान योजनेसाठी सात हजार...उस्मानाबाद ः तालुक्‍यातील २४ गावांतून सात हजार...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
वाहतूक शुल्कासाठी प्रमाणपत्राची अट नको...पुणे : निर्यातीचा कोटा पूर्ण करणाऱ्या साखर...
राष्ट्रीय जल पुरस्कारांत महाराष्ट्र...मुंबई : राज्यातील जलयुक्त शिवार अभियानमध्ये...