agriculture news in Marathi, power loom owners warn strike, Maharashtra | Agrowon

यंत्रमागधारकांचा लाक्षणिक बंदचा इशारा
टीम अॅग्रोवन
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

मुंबई : राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक यंत्रमाग बंद पडले आहेत. वस्त्रोद्योग उद्ध्वस्त होत आहेत. यंत्रमाग क्षेत्रातील बेरोजगारी प्रचंड वाढत आहे. अशा परिस्थितीतही राज्य सरकारने जाहीर केलेले निर्णय, धोरण, मागण्या व उपाययोजना याबाबत कोणतीही अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप करीत सरकारला इशारा देण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व यंत्रमागधारकांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंदचा इशारा दिला आहे. 

मुंबई : राज्यातील ६० टक्क्यांहून अधिक यंत्रमाग बंद पडले आहेत. वस्त्रोद्योग उद्ध्वस्त होत आहेत. यंत्रमाग क्षेत्रातील बेरोजगारी प्रचंड वाढत आहे. अशा परिस्थितीतही राज्य सरकारने जाहीर केलेले निर्णय, धोरण, मागण्या व उपाययोजना याबाबत कोणतीही अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप करीत सरकारला इशारा देण्यासाठी येत्या २६ नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व यंत्रमागधारकांनी एक दिवसाचा लाक्षणिक बंदचा इशारा दिला आहे. 

यंत्रमाग बंद ठेवून कामगारांसह मोर्चा, धरणे या मार्गाने प्रत्येक यंत्रमाग केंद्रामध्ये आंदोलन करतील. त्यानंतरही सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर डिसेंबरमध्ये विधानसभेवर किमान १ लाख यंत्रमागधारक व कामगारांचे ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात येईल, असाही निर्णय मुंबई येथे झालेल्या यंत्रमागधारक संघटना राज्यस्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत एकमताने घेण्यात आल्याची माहिती समन्वय समितीच्या वतीने निमंत्रक प्रताप होगाडे यांनी दिली.
यंत्रमागधारकांच्या विविध मागण्यांसाठी राज्यस्तरीय "यंत्रमागधारक संघटना समन्वय समिती"ची बैठक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या मुंबई येथील कार्यालयात पार पडली.

यंत्रमागधारक आणि वस्त्रोद्योग उद्योजकांच्या विविध मागण्यांसाठी या वेळी चर्चा करण्यात आली. येत्या ५ डिसेंबरपर्यंत या मागण्यांबाबत निर्णय न झाल्यास ‘विधिमंडळावर हल्लाबोल’ करण्याचा इशाराही समन्वय समितीकडून देण्यात आलेला आहे. दरम्यान २६ नोव्हेंबर रोजीच्या लाक्षणिक बंदच्या पूर्वतयारीसाठी राज्यातील भिवंडी, मालेगाव, इचलकरंजी, सोलापूर, विटा, येवला, नागपूर, कामठी, माधवनगर, वडगांव, कुरुंदवाड, तारापूर इ. सर्व यंत्रमाग केंद्रांमध्ये जाहीर सभा व मेळावे घेण्यात येणार आहेत. 

या वेळी समन्वय समितीने केंद्र आणि राज्य सरकारकडे विविध मागण्या केल्या आहेत. देशांतर्गत मालापेक्षा कमी दराने परदेशातून आयात होणारे कापड, कपडे यांची आयात कमी किंवा बंद होण्यासाठी आयात कर वाढवण्यात यावा, सुताचे बाजारभाव किमान १ महिना स्थिर राहतील यासाठी अंमलबजावणी करावी, सूत बाजारमध्ये सुताची साठेबाजी आणि काळाबाजार होऊ नये यासाठी अंमलबजावणी करावी इत्यादी मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचे होगाडे यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
वेतन आयोग ठीक; पण शेतकरी आयोगाचे काय?१९४७ ते १९९० आणि १९९० ते २०१८ असे दोन भाग केले,...
वीजवापरातील ‘अंधार’वी ज दरवाढ तसेच शेती पंपासाठीची बिलं दुरुस्त करून...
परोपजीवी मित्रकीटकांची ओळखअळी-कोष-परोपजीवी (Larval-Pupal Parasitoid) या...
सांगलीत वाढली दुष्काळाची दाहकतासांगली : जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे....
साखर कारखान्यांचे बॉयलर लवकर थंडावणारपुणे  : दुष्काळी स्थितीमुळे साखर...
नंदुरबार बाजार समितीत ओल्या लाल मिरचीची...जळगाव  ः खानदेशात एकीकडे थंडीने केळीला मोठा...
ॲग्रोवन स्मार्ट ॲवॉर्डसाठी शेतकऱ्यांचा...पुणे : संकटांपुढे हार न मानता प्रतिकूल...
टंचाईग्रस्त विसापूर झाले पाणीदार सातारा जिल्ह्यातील माण व खटाव कायम तीव्र...
विदर्भात गारपिटीचा इशारा; राज्यात...पुणे : पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (...
‘एफआरपी’ची थकबाकी ४० हजार कोटींपर्यंत...पुणे : साखर उद्योगात तयार झालेल्या संकटामुळे...
गूळ उद्योगाला आर्थिक स्थैर्य देणे...मुंबई : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जपतानाच...
दुधाळ जनावरे वाटप योजनेत देशी गाईंचा...पुणे : देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी संकरित दुधाळ...
बांबूशेतीमध्ये शेतकऱ्यांचे अर्थकारण...सोलापूर : ‘‘बांबू हे गवतवर्गीय पीक आहे....
‘ई-नाम’द्वारे देशातील बाजार समित्या...मुंबई : देशातील सर्व बाजार समित्या ‘ई-नाम’...
वेतन आयोगाने वाढते गरीब-श्रीमंतांतील दरीमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी ४ ...
दूध दरवाढीसाठीही दाखवा तत्परताआंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटीचे (पावडर) दर...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
केळी पट्ट्याला १५० कोटींचा फटकाजळगाव ः डिसेंबर व जानेवारी महिन्यातील थंडीचा...