मुंबई : चालू हंगामात अवकाळी पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे नु
अॅग्रो विशेष
नागपूर ः सरकारने कृषिपंपांचे आठ हजार कोटींचे दंड व्याज माफ केले आहे. तसेच थकबाकीदारांसाठी ३ आणि ५ हजार रुपये भरून योजनेत सहभागी होण्याची योजना आणली आहे. वीजबिले काहींना चुकीची आल्याची कबुली देत येत्या वर्षभरात वीजबिलांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विजेच्या संदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना सांगितले.

ते म्हणाले, की राज्यात ३५ हजार कोटींची वीज थकबाकी आहे. त्यापैकी २२ हजार कोटी कृषिपंपांची थकबाकी आहे. थकबाकी वसूल झाल्याशिवाय महावितरण कंपनी चालणार नाही असे सांगत त्यांना आमदारांसह राज्यातील शेतकऱ्यांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले. येत्या दोन महिन्यात २ लाख १८ हजार कृषिपंपांना वीजजोडणी देणार आहे. शेतकऱ्यांना बारा तास वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी सुरू केली आहे. याअंतर्गत येत्या दोन वर्षांत पाच लाख कनेक्शन सौरवर आणणार आहे. छोटे ट्रान्सफॉर्मर बसवून एक ते दोन शेतकऱ्यांना वीजपुरवठा केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच शेतकऱ्यांचे अल्पभूधारक, कोरडवाहू अशा पाच प्रकारचे वर्गीकरण केले जाणार आहे. अटल सौरपंप कृषी योजना पाच हजार पंपांवरच गुंडाळली असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी या वेळी मान्य केले. ही योजना गुंडाळली असल्याचे वृत्त अॅग्रोवनने काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केले होते. या वेळी आमदार जयकुमार गोरे यांनी गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना वीजबिल आले नसल्याचे सांगत आता ५० ते ७० हजार रुपये इतकी चुकीची बिले काढली असल्याकडे लक्ष वेधले.
- 1 of 129
- ››