Agriculture News in Marathi, Power Minister of state R K Singh said NTPC will float a tender to buy farm stubble, India | Agrowon

पीक अवशेषाची होणार खरेदी
वृत्तसेवा
शनिवार, 18 नोव्हेंबर 2017
नवी दिल्ली ः पीक अवशेष शेतात जाळल्याने प्रदूषण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रदूषण कमी करणे अाणि त्यावर पर्याय म्हणून पीक अवशेषचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जाणार अाहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून पीक अवशेषाची प्रतिटन ५,५०० रुपयाने खरेदी केली जाणार अाहे. यासाठी नॅशनल थर्मल पाॅवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) पीक अवशेष खरेदीसाठी निविदा मागविणार अाहे. याबाबतची माहिती केंद्रीय वीज राज्यमंत्री अार. के. सिंह यांनी दिली अाहे.
 
नवी दिल्ली ः पीक अवशेष शेतात जाळल्याने प्रदूषण निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रदूषण कमी करणे अाणि त्यावर पर्याय म्हणून पीक अवशेषचा वापर वीजनिर्मितीसाठी केला जाणार अाहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून पीक अवशेषाची प्रतिटन ५,५०० रुपयाने खरेदी केली जाणार अाहे. यासाठी नॅशनल थर्मल पाॅवर कॉर्पोरेशन (एनटीपीसी) पीक अवशेष खरेदीसाठी निविदा मागविणार अाहे. याबाबतची माहिती केंद्रीय वीज राज्यमंत्री अार. के. सिंह यांनी दिली अाहे.
 
पीक अवशेष जाळण्याएेवजी त्याची विक्री केल्याने शेतकऱ्यांना प्रतिएकर ११ हजार रुपये मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले अाहे. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश अाणि राजस्थानमध्ये भात पीक कापणीनंतर पिकांचे अवशेष शेतातच जाळले जातात. यामुळे दिल्ली एनसीअारमध्ये प्रदूषणाचे प्रमाण वाढले अाहे.
 
या पार्श्वभूमीवर पीक अवशेष जाळण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी कृती अाराखडा तयार केला जात अाहे. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने ‘एनटीपीसी’ला नोटीस बजावून तुम्ही कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सबलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पीक अवशेष का घेऊ शकत नाही, अशी विचारणा केली होती. त्यावर अाता कार्यवाही करण्यात येत अाहे.
 
एक एकर क्षेत्रातील पिकातून सरासरी दोन टन अवशेष शिल्लक राहते. हे पीक अवशेष खरेदी करण्यासाठी लवकरच निविदा जारी केली जाणार असल्याचे वीज राज्यमंत्री सिंह यांनी सांगितले. 
 
वीज प्रकल्पात १० टक्के पीक अवशेषाचा वापर करणे शक्य अाहे, असेही त्यांनी नमूद केले. याबाबत माहिती देताना वीज सचिव ए. के. भल्ला यांनी सांगितले, की शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या पीक अवशेषाचा वापर तूर्त यंदा वीज प्रकल्पात होणार नाही; मात्र पुढील काही दिवसांत त्याचा वापर वीज प्रकल्पात करण्यासाठी पीक अवशेष खरेदीची कार्यवाही केली जाणार अाहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.
 
शेतकऱ्यांकडून पीक अवशेषाची खरेदी केली जाणार अाहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रतिएकर ११ हजार रुपये मिळतील. त्यासाठी नॅशनल थर्मल पाॅवर कॉर्पोरेशनकडून (एनटीपीसी) निविदा जारी केली जाणार अाहे.
- अार. के. सिंह, केंद्रीय वीज राज्यमंत्री

इतर ताज्या घडामोडी
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ७५००...नागपूर   : राज्यातील वीज वितरण करणाऱ्या...
परभणीतील पीकविमा परतावाप्रश्नी ठोस...परभणी : पीकविमा परतावाप्रश्नी ठोस तोडगा निघत...
किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध...नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा,...
मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप...कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व...
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची...पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये...
कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७...औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या...