Agriculture News in Marathi, powerlooms owner will get interst subsidy on loan, Maharshtra | Agrowon

साध्या यंत्रमागधारकांना व्याजदरात पाच टक्के सवलत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

मुंबई : राज्यातील यंत्रमाग उद्योगाला चालना देण्यासाठी साध्या यंत्रमागधारकांनी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय मंगळवारी (ता. २१) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुंबई : राज्यातील यंत्रमाग उद्योगाला चालना देण्यासाठी साध्या यंत्रमागधारकांनी बँका किंवा वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या व्याजदरात पाच टक्के सवलत देण्याचा निर्णय मंगळवारी (ता. २१) मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

या निर्णयाचा लाभ राज्यातील ८५ टक्के यंत्रमागधारकांना होणार अाहे. प्रतिवर्ष ५४ लाख रुपयांप्रमाणे पाच वर्षांसाठी २ कोटी ७१ लाख रुपयांची तरतूद करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यात देशाच्या सुमारे ५० टक्के (१२ लाख ७० हजार) यंत्रमाग आहेत. यापैकी ८५ टक्के (१० लाख ७९ हजार ५००) यंत्रमाग साध्या स्वरूपाचे, जुन्या बनावटीचे किंवा स्थानिक उत्पादकांनी तयार केलेले आहेत.

या यंत्रमागावर देशात आवश्यक असणाऱ्या साधारण कापडाचे उत्पादन केले जाते. उर्वरित १५ टक्के स्वयंचलित यंत्रमागावर निर्याताभिमुख व दर्जेदार कापडाचे उत्पादन केले जाते. राज्यात यंत्रमागावर उत्पादित होणाऱ्या कापडापैकी केवळ १० टक्के कापडाची राज्याला आवश्यकता असून, उर्वरित ९० टक्के कापडाची इतर राज्यांत किंवा परदेशांत विक्री केली जाते. यंत्रमाग व्यवसायातून राज्यातील सुमारे ३० लाख लोकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होत आहे.

शासनाच्या उद्योग विकास धोरणाला अनुसरून राज्यातील कापडनिर्मितीला चालना देणे आवश्यक होते. त्याचप्रमाणे यंत्रमाग उद्योगासमोर प्रामुख्याने कापसाचे वाढलेले भाव, सुताची वेळीच उपलब्धता न होणे, सुताच्या किमतीत झालेल्या वाढीच्या तुलनेत कापडाला भाव न मिळणे आणि तुलनात्मक महाग वीजदर इत्यादी अडचणी आहेत.

त्यामुळे यंत्रमागधारकांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच कापड उत्पादन, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीमध्ये वाढ करण्यासाठी या उद्योगाला व्याजात सवलतरूपी प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार साध्या यंत्रमागधारकांनी या निर्णयापूर्वी घेतलेल्या कर्जाच्या पाच टक्के व्याज राज्य शासनामार्फत ५ वर्षांसाठी भरण्यात येणार आहे. ही व्याजदर सवलत पुढील पाच वर्षे अथवा संबंधित यंत्रमागधारकांच्या कर्जाच्या परतफेडीपैकी आधी येणाऱ्या कालावधीपर्यंत राहील, असे स्पष्ट करण्यात अाले अाहे.

मनरेगाच्या अाॅडिटसाठी सोसायटीची स्थापना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) राज्यात हाती घेण्यात आलेल्या कामांचे स्वतंत्र यंत्रणेमार्फत सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) करण्यासाठी स्वतंत्र सामाजिक अंकेक्षण सोसायटीची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

महावितरण पायाभूत आराखडा योजनेस मुदतवाढ
वीज वितरण प्रणालीच्या आधुनिकीकरण व सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या महावितरण कंपनीच्या पायाभूत आराखडा-२ योजनेस मार्च २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील ग्राहकांना योग्य प्रमाणात खात्रीशीर वीजपुरवठा करणे शक्य होणार आहे.

‘जलयुक्त’च्या कामांची महामार्ग
विकास कार्यक्रमांशी सांगड

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात येत असलेल्या मृद व जलसंधारणाच्या कामांमधून उपलब्ध होणारी मुरूम, माती, दगड इत्यादी गौण खनिजे केंद्र शासन विकसित करत असलेल्या महामार्गाच्या बांधकामासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आला. या निर्णयामुळे जलयुक्त शिवार अभियानातून होणाऱ्या कामांची महामार्ग विकास कार्यक्रमांशी सांगड घातली जाणार आहे.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...