agriculture news in marathi, Prahar and Sharad joshi vichar manch protest against Minister Sadabhau Khot | Agrowon

कृषी राज्यमंत्र्यांच्या प्रतिमेला दहा आण्याचा भाव
टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 मे 2018

पुणे : शेतकऱ्यांनो हमीभाव कशाला मागता, मार्केटिंग करा, असा सल्ला देणाऱ्या कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेचा कांद्यासह आंदोलकांनी लिलाव केला. या लिलावात खोत यांच्या प्रतिमेला दहा आण्याचा (साठ पैसे) भाव मिळाला. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनक्रांती पक्ष आणि शरद जोशी विचार मंचातर्फे गुलटेकडी माकेट यार्डात रविवारी (ता. २०) हे आंदोलन करण्यात आले. 

पुणे : शेतकऱ्यांनो हमीभाव कशाला मागता, मार्केटिंग करा, असा सल्ला देणाऱ्या कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतिमेचा कांद्यासह आंदोलकांनी लिलाव केला. या लिलावात खोत यांच्या प्रतिमेला दहा आण्याचा (साठ पैसे) भाव मिळाला. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनक्रांती पक्ष आणि शरद जोशी विचार मंचातर्फे गुलटेकडी माकेट यार्डात रविवारी (ता. २०) हे आंदोलन करण्यात आले. 

प्रहार जनक्रांती पक्षाचे संपर्क प्रमुख गौरव जाधव, संघटक नयन पुजारी, धनंजय भोसले, शहाध्यक्ष उमेश महाडिक, राहुल जाधव, अजिंक्य बारणे, शरद जोशी विचार मंचाचे विठ्ठल पवार, नंदा जाधव, लता गायकवाड, हिराताई पवार, पकज खटाने, अभय पवार, संतोष नांगरे, राष्ट्रसेवा समूहाचे अमोल मानकर, प्रवीण लांडगे आदी या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना आंदोलकांनी, ‘एक रुपयांची लायकी नसणाऱ्या सदाभाऊंनी फुकाचे सल्ले देऊ नयेत, मंत्री होण्यापेक्षा मार्केटिंग व्यवस्थापक व्हा,’ अशा भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांना शेतीमालाची विक्री करण्यासाठी पुणे आणि वाशी येथे ‘कॉमन सेल हाॅल’ उपलब्ध करून देण्याची मागणी विठ्ठल पवार यांनी केली. सदाभाऊ खोत यांचा निषेध व विविध मागण्यांसाठी बाजार समिती प्रशासनाकडे या वेळी निवेदन सादर केले. 

इतर ताज्या घडामोडी
बोंड अळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी...परभणी : सद्यःस्थितीत पाणी दिलेल्या कपाशीच्या...
नागपूरला होणार रेशीम कोष मार्केटनागपूर   ः राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम...
खानदेशातील रब्बी पाण्याअभावी संकटातजळगाव  : अत्यल्प पावसामुळे खानदेशात...
साखर कारखान्यांच्या ताबेगहाण कर्जाला...मुंबई  ः साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या ‘...
नगरमधील शेतकऱ्यांना मिळणार शेळीपालन,...नगर   : पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकऱ्यांना...
जळगावात सीताफळाला प्रतिक्विंटल २५०० ते...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी (ता...
संग्रामपूर खरेदी केंद्रावर अाॅनलाइन...बुलडाणा   : अाधारभूत किमतीने शेतीमाल...
एफआरपी थकवलेल्या ११ कारखान्यांवर कारवाई...मुंबई  : राज्यातील ११ साखर कारखान्यांनी...
गोंदिया जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल धान...गोंदिया  ः शासनाच्या वतीने नाफेडच्या...
मदत, पुनर्वसन समितीच्या अहवालानंतर...अकोला  ः कमी तसेच अनियमित पावसामुळे निर्माण...
सातारा जिल्ह्यात रब्बीसाठी आतापर्यंत...सातारा : जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच सहकारी...
‘उजनी`चे २० टीएमसी पाणी सोलापूर, अऩ्य...सोलापूर : सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या...
मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रणशास्त्रीय नाव ः स्पोडोप्टेरा फ्रुजीपर्डा  ...
बेणापूर ग्रामपंचायतीने केली गायरानावर...खानापूर तालुक्यातील बेणापूर ग्रामपंचायतीने आपल्या...
भुरीच्या प्रादुर्भावावर लक्ष ठेवासर्व द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठ...
नगर जिल्ह्यात ११५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठानगर   : जिल्ह्यातील गाव-शिवारातील...
साताऱ्यात सोयाबीनच्या दरात सुधारणासातारा   ः जिल्ह्यात सोयाबीनच्या दरात...
गुंजवणी प्रकल्पाच्या ‘सुप्रमा’मधील अटीत...मुंबई   : पुणे जिल्ह्याच्या वेल्हे...
खपली गहू लागवडीचे सुधारित तंत्रगेल्या काही दशकांमध्ये कमी उत्पादकतेमुळे खपली गहू...
सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परभणीत भजन आंदोलनपरभणी  ः महावितरणच्या बोबडे टाकळी (ता. परभणी...