agriculture news in Marathi, prakash hogade says, complaint against queries of krushi sanjivani yajana, Maharashtra | Agrowon

कृषी संजीवनीतील त्रुटींबाबत तक्रार अर्ज दाखल करा : होगाडे
टीम अॅग्रोवन
रविवार, 12 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर: कृषी संजीवनी योजनेच्या त्रुटींबाबत राज्यातील वीज ग्राहक संघटना, कृषी ग्राहक शेतकरी संघटना व संबंधितांनी तक्रार अर्ज दाखल करण्याची मोहीम सुरू करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केले आहे. 

कोल्हापूर: कृषी संजीवनी योजनेच्या त्रुटींबाबत राज्यातील वीज ग्राहक संघटना, कृषी ग्राहक शेतकरी संघटना व संबंधितांनी तक्रार अर्ज दाखल करण्याची मोहीम सुरू करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केले आहे. 

शासनाने जाहीर केलेल्या नव्या कृषी संजीवनी योजनेत अनेक त्रुटी आहेत. त्या दूर करण्यासाठी या तक्रारी दाखल करणे आवश्‍यक असल्याचे श्री. होगाडे यांनी म्हटले आहे. नव्या योजनेत अंदाजे ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या वीजबिलातील थकबाकी चुकीची आहे. वाढीव जोडभार अथवा वाढीव युनिटस या आधारे थकबाकी अवाजवी फुगविली आहे.
 कंपनीचे बिल शंभर युनिटचे होते. तेव्हा कंपनीचा प्रत्यक्ष वीज पुरवठा ६० युनिट अथवा कमी असतो. याचाच अर्थ वीजबिल १०० रुपये असते. त्यावेळी खरे देणे ६० रुपये असते. त्यामुळे मार्च २०१७ अखेरची खरी थकबाकी निश्‍चित होणे आवश्‍यक असते. तसेच एप्रिल २०१७ पासूनची चालू बिलेही दुरुस्त होणेही आवश्‍यक आहे.

मार्च २०१६ अखेर संपलेल्या कृषी संजीवनी योजनेमध्ये थकीत मुद्दल रकमेत ५० टक्के सूट देण्यात आली होती. ती आता काढून टाकली आहे. ती सूट पुन्हा लागू होणे आवश्‍यक आहे. वरीलप्रमाणे हिशेब केल्यास १०० रुपये थकीत मुद्दल बिलातील खरी थकबाकी ६० रुपये निश्‍चित होइल व ५० टक्के सूट लागू केल्यास तीस रुपये भरावे लागतील. सध्या मात्र शंभर रुपये थकबाकी मान्य करा व पहिला हप्ता भरा अन्यथा वीज तोडू, अशी जाहिरात व अंमलबजावणी सुरू आहे. याचाच अर्थ शेतकरी ग्राहकावर ३० रुपये वसुली योग्य असताना अन्याय शंभर रुपयांची वसुली लादली जात आहे. या विरोधात चळवळ आवश्‍यक आहे.

यासाठी सर्वांनी एकत्रितपणे व मोठ्या प्रमाणात लाखोंच्या संख्येने तक्रार अर्ज एक महिन्याच्या आत वितरण कंपनीच्या कार्यालयांमध्ये दाखल करावेत व त्याची पोच महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेकडे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्या
काँग्रेसमध्ये नवचैतन्य; प्रियंका गांधी...नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
मक्यातील लाग रंग येण्यामागील गूढ उलगडलेमक्यामध्ये काहीवेळा दिसणाऱ्या लाल रंगाच्या...
रब्बीत १०६ कोटींचे पीककर्ज वाटपपरभणी : यंदाच्या रब्बी हंगामामध्ये...
गव्हाची ६५ हजार ५४३ हेक्टरवर पेरणीनांदेड :नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत यंदा ६५...
एफआरपी तुकड्यात घेणार नाही : खासदार...सांगली : राज्यातील साखर कारखाने सुरू होऊन ८० दिवस...
पाणी योजनांचा वीजपुरवठा सुरळीतजळगाव : जिल्ह्यातील सुमारे ९३५ गावांच्या...
पाणीपुरवठ्यांच्या देयकासाठी दोन कोटीअकोला : दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेल्या...
सांगली जिल्ह्यात हळद काढणीला वेगसांगली : जिल्ह्यात हळदीच्या काढणीला प्रारंभ झाला...
अपुऱ्या सदस्यांच्या उपस्थितीत जिल्हा...धुळे : पुरेशी सदस्यसंख्या नसतानाही (कोरम)...
मागण्यांसाठी संग्रामपूर येथे...बुलडाणा  ः जनावरांसाठी चारा नाही, लोकांना...
जतमधील ४२ गावांना कर्नाटकातून पाणीसांगली : जत तालुक्यातील ४२ गावांना कर्नाटकातून...
शेतकऱ्यांनी पाडली तूर खरेदी बंदयवतमाळ : हमीभावापेक्षा ९०० ते १००० रुपये कमी...
कर्जमाफीसाठी पॉलिहाउस शेडनेटधारक...नगर  : पॉलिहाउस शेडनेटधारक शेतकऱ्यांचे...
पाण्याचे प्रस्ताव सादर करा : पालकमंत्रीसोलापूर : पाणीटंचाई भासणाऱ्या गावातील...
व्याज सवलती योजनेबाबत बँकांनी गांभीर्य...सोलापूर : पीककर्जाची नियमितपणे कर्जफेड...
राज्यात १७८६ टॅंकरव्दारे पाणीपुरवठापुणे  : सलग दोन वर्षे पावसाने ओढ दिल्यानंतर...
विदर्भात पाच ठिकाणी होणार ब्रिज कम...अमरावती  ः भूजल पुनर्भरणाच्या उद्देशाने...
सोलापूर जिल्ह्यातील १६२ पाणंद...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पालकमंत्री पाणंद...
खानदेशात मक्याची आवक नगण्यजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मक्...
सातारा जिल्ह्यात ४६ लाख ३५ हजार टन ऊस...सातारा : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम वेगात...