agriculture news in marathi, Prakruti Mela for Promotion of Deshi seed, Maharashtra | Agrowon

देशी बियाण्यांच्या संवर्धनासाठी रंगणार ‘प्रकृती मेळा’
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी येथील राष्ट्रीय नैसर्गिक चिकित्सा संस्था आणि ‘अन्नदाता : नागरिकांची सुरक्षित अन्नासाठीची चळवळ’ या संस्थेच्या सहयोगाने प्रकृती मेळ्याचे १७ आणि १८ नोव्हेंबरला वाडिया कॉलेज येथे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी यात सहभागी होणार आहेत.

पुणे : देशी बियाण्यांचे संवर्धन आणि प्रसारासाठी येथील राष्ट्रीय नैसर्गिक चिकित्सा संस्था आणि ‘अन्नदाता : नागरिकांची सुरक्षित अन्नासाठीची चळवळ’ या संस्थेच्या सहयोगाने प्रकृती मेळ्याचे १७ आणि १८ नोव्हेंबरला वाडिया कॉलेज येथे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून शेतकरी यात सहभागी होणार आहेत.

शेती समृद्ध माती, पाणी, हवामान आणि बियाण्यांवर अवलंबून असते. यातच देशी बियाण्यांचे महत्त्व अधिक आहे. बदलत्या हवामानाला देशी बियाणे जास्त सुदृढपणे तोंड देऊ शकते. या मेळ्यात राज्यातील देशी बियाण्यांचे संवर्धन करणारे, सुरक्षित भाजीपाला पिकवणारे, पंचगाव्या, सुरक्षित अन्न बनवणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश असणार आहे. देशी बी संवर्धनात लोकपंचायत, कळसुबाई मिलेट, सेंद्रिय शेती अभ्यास गट(पाणी पंचायत), शाश्वत सेंद्रिय गट, बाएफ मित्र, सह्याद्री बी संघ अशी विविध गटही यात सहभागी होत आहेत. सुमारे ३०० पेक्षा जास्त जातीच्या बियाण्यांचा खजिना येथे उपलब्ध असेल.

प्रत्येक गटाची देशी बियांची बँक त्या त्या गावात गेली बरीच वर्ष स्थित आहे. देशी बियांच्या संवर्धनासाठी प्रत्येक शेतकरी स्वत:हून सहभाग घेत आहेत. सेंद्रिय, सुरक्षित शेतीचा प्रसार ह्या सोहळ्याच्या निमित्ताने होणार आहे. महाराष्ट्रातील विविध शेतकरी सोहळ्याला भेट देऊन देशी बियांची खरेदी करू शकतात. पुणेकरांना सोहळ्यात भाजीपाला, फळे, धान्य, कडधान्ये, तृणधान्ये, विविध औषधी वनस्पती, मिलेट, वन्यफळे उपलब्ध होणार आहेत. १८ नोव्हेंबरला राष्ट्रीय नैसर्गिक चिकित्सा संस्थेतर्फे येणाऱ्या पर्यटकांना मिलेट जेवण मोफत देण्यात येणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
उसाला पूरक शर्कराकंदसाखरेचा वाढलेला उत्पादन खर्च, वाढलेले उत्पादन,...
राजकीय अन् आर्थिक उत्पाताची नांदीअखेर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल ...
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये...
कृषी विद्यापीठ संत्रा बाग छाटणी सयंत्र...नागपूर ः संत्रा छाटणी सयंत्राला संत्रा...
ऊसबिल थकल्याने कोलमडले अर्थकारणकोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्रात तोडणी झालेल्या...
केंद्राचा अन्नधान्य उत्पादनाचा 'कृषी...पुणे: अन्नधान्य उत्पादनात देशात सर्वांत चांगली...
कापूस उत्पादन ३४० लाख गाठी होणारमुंबई  ः देशातील महत्त्वाच्या कापूस उत्पादक...
कृषी विद्यापीठ देणार सेंद्रिय कापसाचा...नागपूर ः सेंद्रिय अन्नधान्यासोबतच येत्या काही...
पेथाई चक्रीवादळ आज धडकणारपुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावत असलेल्या ‘पेथाई...
कापूस उत्पादकतेत महाराष्ट्र मागेजळगाव : कापूस उत्पादकतेमध्ये राज्य मागील चार...
मराठवाड्यातील पाणीसाठ्यांत झपाट्याने घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८६८ प्रकल्पांतील...
धोत्रे यांची शेती देते हजार रुपये रोजफळबाग, आंतरपिके, भाजीपाला पिके यांच्या बहुविध...
साखर विक्री मूल्य ३१ रुपये करण्यासाठी...पुणे : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी...
खरीप, केळी पीकविम्याच्या परताव्यापासून...जळगाव  : प्रधानमंत्री खरीप पीकविमा योजनेत...
खोजेवाडीत लोकसहभागातून जनावरांची छावणीनगर : दुष्काळाने होरपळ होत असलेल्या भागात शासनाने...
जमीन सुपीकता, नियोजनातून साधली शेतीमांजरी (जि. पुणे) येथील माधव आणि सचिन हरिलाल घुले...
मोकळ्या माळरानावर हिंडवतूया...चारा द्या...सांगली ः दूध इकून दौन पैकं मिळत्याती म्हणून...
मंगेशी झाली वंचितांची मायउपेक्षितांच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून...
गेल्या वर्षीच्या अवकाळीपोटी साठ लाखांची...मुंबई : गेल्या वर्षी मार्च महिन्यात...
उत्तर प्रदेश, हरियाना, पंजाबप्रमाणे...पुणे : जागतिक साखरेचे बाजार आणि खप विचारात घेता...